Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे

प्रश्नोत्तरी 3

 कृपया नविन प्रश्न प्रश्नोत्तरी ४ मध्ये टाकावेत,  प्रश्नोत्तरी ३ च्या २०० नोंदी पुर्ण झाल्या त्यामुळे तेथे टाकु नये, टाकल्यास More Information  वर क्लिक करावी.

265 comments:

  1. सर शासकीय कामात एखाद्या केस मध्ये गुन्हा दाखल करावयाचे असल्यास कनिष्ठ लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक यांना प्राधिकृत करून गुन्हा नोंद करता येईल का जर नाही तर त्याचा काही नियम असेल तर कृपया कळवावे हि नम्र विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. वरिष्ठांनी जर आदेश दिले असेल तर त्यांचे तर्फे त्यांचे खालील कर्मचाऱ्यास गुन्हा दाखल करण्यास काहीही हरकत नाही. याची सर्व जबाबदारी ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची असेल आपण फक्त गुन्हा नोंदवीत आहात तपासात आपणास विचारपूस होणार नाही अधिकाऱ्यांना व संबंधीतांना होणार आहे, आपण फक्त शासनाचे वतीने गुन्हा नोंदवित आहात बर ईतकेच.

      Delete
  2. नमस्कार सर,
    १) माझे सद्यस्थितीत वय ५१ सुरु असुन माझी शासकीय तंत्रनिकेतन मधील अधिव्याख्याता म्हणुन शासकीय सेवा २५ वर्ष झाली आहे.VRS घ्यायचे असल्यास तब्बेत ठिक नसल्याचे कारण योग्य होईल कां?
    २) माझे मागील काही वर्षांचे गोपनीय अहवाल 'Outstanding' असे आहेत. त्याचा VRS ची गुणवत्ता ठरविताना उपयोग होतो कां? तसेच माझी संपूर्ण २५ वर्षांची सेवा निष्कलंक अशी आहे.
    ३) उपरोक्त बाबींचा विचार करता मला पेंशन व इतर फायदे मिळण्यास किती कालावधी लागेल?
    ४) VRS मंजूर आदेश येण्यास उशीर झाल्यास काय करावे? आणि VRS मंजूर आदेश दफ्तर-दिरंगाईमध्ये अडकल्यास पेंशन मिळत नाही काय?
    ५) पेंशन मिळेपर्यंत GPF, Gratuity व इतर लाभ मिळत नाही कां?
    ....विनंती की मार्गदर्शन मिळावे.

    ReplyDelete
    Replies
    1. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील नियम ६६ नुसार २० वर्षाची अर्हताकारी सेवा पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती प्राधिकाऱ्यास तीन महीन्याची लेखी नोटीस देवून सेवेमधून केव्हाही सेवानिवृत्त होत येते, त्यामुळे आपणास वैद्यकिय कारणास्तव सेवानिवृत्ती न घेता आपणास या पुढील सेवा करावयाची नसल्यामुळे सेवानिवृत्ती घ्यावयाची आहे अशी नोटीस द्यावी. आपली नोटीस ज्या तारखेस संपते तेव्हा पासुन सेवानिवृत्ती अंमलात येईल.
      सेवानिवृत्ती साठी गोपनीय अहवालाचा संबंध नाही फक्त विभागीय चौकशी नसावी. आपली सेवानिवृत्ती मंजुर झाल्यानंतर आपणास लगेचच रजा रोखीकरण, गट विमा, चे देयक कोषागारात सादर केले जाईल, जीपीएफ चे महालेखापाल यांचे कडे जाईल व यास अंदाजे २ महीने लागु शकते त्यामुळे आपण सेवानिवृत्तीची नोटीस देत असल तर जीपीएफ ची उचल करावी. महालेखाकार यांचे कडुन पेन्शन मंजुर झाल्यानंतर जीपीएफ ग्रॅज्युटी, अंशराशीकरणाचे आपणास सर्व फायदे १ महीन्यात अदा होउू शकते.

      Delete
  3. जिल्हा परिषद कर्मचारी यांना मॅट मध्ये प्रकरण दाखल करता येते काय वर्ग तीन श्रेणी 2 याबाबत काही नियमावली असेल तर त्याबाबत मार्गदर्शन करावे व नियमावली पाठवावी जेणेकरून प्रकरण दाखल करता येईल

    ReplyDelete
    Replies
    1. मॅट मध्ये प्रकरण दाखल करण्याबाबत काहीही नियमावली नसते, आपणावर जर कार्यालयाकडुन काही अन्याय, सेवेचा लाभ, ईतर बाबी बाबत न्यायालयात दाद मागण्याकरीता आहे.

      Delete
  4. शासकीय कामात एखाद्या न्यायालयीन प्रकरणामध्ये शपथ पत्र दाखल करावयाचे असल्यास कनिष्ठ लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक यांना प्राधिकृत करून गुन्हा नोंद करता येईल का कृपया कळवावे हि नम्र विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. शपथपत्र दाखल करणे करीता Gazetted Officer पाहीजे, त्यामुळे वरिष्ठ –कनिष्ठ लिपीक शपथपत्र दाखल करू शकत नाही. या बाबतचा शासन निर्णय कोर्टात आहे.

      Delete
    2. सर
      कृपया शासन निर्णयाची प्रत असल्यास द्यावी ही विनंती

      Delete
    3. http://bombayhighcourt.nic.in/libweb/rules/RulesfortheConductoftheLegalAffairsofGovernment,1984.PDF मधील पान क्रमांक 65 पहावे तेथे सक्षम अधिकारी असे नमुद केले आहे.

      Delete
  5. सर, जर अनुकंपाधारक उमेदवाराचे नाव अनुकंपाच्या यादीमध्ये असेल परंतु विनंतीवरून सदर उमेदवार यांचे जागी त्याचे इतर पाल्याचे नाव समाविष्ट करता येईल का ? कृपया मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
    Replies
    1. नाही, एकदा अनुकंपा यादीत नाव समाविष्ठ झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्याचे नाव टाकता येत नाही

      Delete
  6. मी कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहे परंतु मी आदिवासी भागात काम करतो व तो संपुर्ण तालुका tribals मध्ये आहे. एकस्तर वेतन निश्चित करताना वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी देण्यात यावी असे असताना फक्त ग्रेड पे व एक अतिरिक्त वेतनवाढ दिली आहे. परंतु हे तर अश्वाशित प्रगती योजनेत असे वेतन दिले जाते. मग जर वेतन बॅड बदलला तर मग त्यांना जर 5200-20200/2400 मूळ वेतनश्रेणी आहे. परंतु त्याची वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी 9300-34800/4200 आहे मग त्यांना कुठल्या आधारे 9300-4200 वेतनवाढ दिली जाते. कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. कार्यालयाने केलेली कार्यवाही बरोबर आहे. येथे आपण एकच बाब लक्षात घ्यावी की, जर आपली पदोन्नती झाली असती तर आपणास जशी वेतन निश्चीती झाली असती तशीच एकस्तर वर होते, परंतु जेथे पे बॅन्ड बदलते तेथेच नविन बॅन्ड मधिल कमीत कमी पे बॅन्डवर किंवा जेथे निश्चीती होत असेल ते वेतन मिळते. जसे कनिष्ठ लिपीकाचा एक वेतनवाढ व ग्रेड पे 2400/- तसेच वरीष्ठ लिपीकास ग्रेड पे 4200/- वरिष्ठ लिपीकाचे वेतन जर 9300 पेक्षा कमी असेल तर 9300 व एक वेतनवाढ असे होईल व 9300 पेक्षा जास्त असेल तर त्यावर एक वेतनवाढ व ग्रेड पे 4200 असे होईल.

      Delete
  7. GOOD MORNING SIR, VAYACHI 50 VARSH PURN KARMACHARALA SANGANAK AHARATA MADHE SUT DETA YETA KA? ANI DETA YET AASEL TAR ADHIKAR KONALA AAHE.

    ReplyDelete
    Replies
    1. https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Acts%20Rules/Marathi/Notification%20for%20Requirement%20of%20knowledge%20of%20Computer%20Operation.pdf

      Delete
  8. नमस्ते सर,
    आश्वासित प्रगती योजनेमध्ये लाभ मंजूर करताना एकदा कर्मचा-याला अर्हता परीक्षा उर्तीण आहे व त्याला शासन सेवेमध्ये 12 वर्षे पूर्ण झाली आहेत परंतु संगणक प्रमाणपत्र/सुट नंतरने झाली असेल तर सदर कर्मचा-याला लाभ कधी मंजूर करावा

    ReplyDelete
    Replies
    1. आश्वासित प्रगती योजने करीता संगणक परीक्षेची अट नाही. त्यामुळे त्यांची आश्वासति प्रगती योजना देवू शकता, संगणक परीक्षेचे अनुषंगाने करावयाची कार्यवाहीची पद्धत वेगळी आहे त्या करीता पुढील लिंक चा वापर करावा. https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Acts%20Rules/Marathi/Notification%20for%20Requirement%20of%20knowledge%20of%20Computer%20Operation.pdf

      Delete
  9. नमस्कार सर
    जर एखाद्या कर्मचार्‍याला सक्तीचा रजेवर पाठवले असल्यास त्याचे वेतन कधी काढावे व कसे काढावे. या बाबत gr तसेच नियम असेल तर send Kara Plz.

    ReplyDelete
    Replies
    1. सक्तीची रजा असा प्रकारच नाही. परंतु कर्मचाऱ्याचे वागणूक संशयात्मक असल्यास त्याला कार्यालयास येण्यास मनाई केली जाते. सदर कर्मचारी त्याच्या रजेचे आवेदन जो पर्यंत कार्यालयास सादर करित नाही व रजा मंजुर होत नाही तो पर्यंत त्याचे वेतन काढू नये, कार्यालय पत्राद्वारे सदर कर्मचाऱ्यास रजेवर जा असे सांगत नाही ते तोंडीच असते.

      Delete
  10. नमस्कार सर,
    माझा प्रश्न असा आहे की, जर एखाद्या वर्ग-ड मधील कर्मचा-याचे लाचखोरीमुळे निलंबन झाले असेल आणि तो सध्या 75% वेतन घेत असेल तर त्याला उत्सव अग्रीम मंजूर करता येईल किंवा कसे याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. देता येईल. कर्मचारी यांची सेवा एका वर्षापेक्षा जास्त हवी, अग्रिम हा दर महीन्यास कपात होते, व निलंबीत कर्मचाऱ्यांचे वेतन दर महीन्यास काढले जाते त्यामुळे सण अग्रिमाची वसूली त्यामधून करता येते त्यामुळे निलंबीत कर्मचाऱ्याने अर्ज दिला असेल तर त्यांचा सण अग्रिम मंजुर करावा.

      Delete
  11. gut d karmachari che seva jyeshta yadi kon thevte pwd office madhe ? tyabaddal gr aslyas kalvinyat yave sir.

    ReplyDelete
    Replies
    1. सार्वजनिक बांधकाम विभागात वर्ग ४ ची जेष्ठता यादी ही कार्यकारी अभियंता तथा समन्वय कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (जिल्हयाचा विभाग) हे ठेवतात. त्यांचेकडुनच पदोन्नतीचा प्रस्ताव मंडळ कार्यालयास सादर होतो.

      Delete
  12. नमस्कार सर गट क ची 100 % पदोन्नतीने भरता येतात का ? या विषयासंबधी शासन निर्णय आहे का ? महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही कार्यालयातील वरीष्ठ लिपिक, वरीष्ठ सहायक ही गट क ची पदे गट क ची 100 % पदोन्नतीने भरता येतात का ?
    नाही. प्रत्येक पदांचे सेवा प्रवेश नियम असतात त्यानुसार पदोन्नतीने व नामनिर्देशनाने पदे कशी भरावी या बाबत नियम आहेत, कनिष्ठ लिपीक / वरिष्ठ लिपीक करीता 50:50

    ReplyDelete
  13. नमस्‍कार सर माझा प्रश्‍न असा आहे की, कनिष्‍ठ लिपीक संवर्गातुन अव्‍वल कारकून संवर्गात पदोन्‍नती हवी असल्‍यास किती वर्षाची नियमीत सेवा पूर्ण होणे आवश्‍यक आहे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपणास प्रथम विभागीय दुय्यम सेवा परीक्षा ३ वर्षात उत्तीर्ण करावयाची असुन ती पास झाल्यानंतर महसूल अर्हता परीक्षा उत्तीर्ण करावयाची असुन ती जेव्हा पास होता तेव्हा पासुन आपले नाव जेष्ठता यादीत समाविष्ठ होऊन आपण पदोन्नतीस जेष्ठतेनुसार पात्र होता.

      Delete
    2. सर महसूल विभागातील एकदा लिपिक कर्मचारी (open categari) मधील महसूल अहर्ता परीक्षा 4 th संधीत पास झाला असेल तर त्याची सिन्यरेटी जाते आणि तो 4 th संधीमध्ये ज्या वेळेस पास झाला तेंव्हापासून त्यांची सिन्यरेटी गणल्या जाते,त्यामुळे त्याच्या मूळ सिनेरिटी नुसार त्याला प्रमोशन दिल्या जात नाही. जर त्याला मूळ सिनेरिटी नुसार प्रमोशन द्याचे असेल तर plz नियम,शासन आदेश किंवा न्याय निंर्णय असेल तर सांगा

      Delete
  14. ARJIT RAJA 3 DIWASANPEKSHA KAMI GHETA YET NAHI KAA tyabadal gr aahe ka

    ReplyDelete
  15. नमस्कार सर
    मी वर्ग 4 कर्मचारी असून माझी बदली दुसऱ्या शाळेत झाली आहे पण त्या शाळेतील सेवार्थ मधून मी detach होत नाहीये त्यामुळे माझे वेतन प्रलंबित आहेत सेवार्थ मधे नाव बिल बनवून घेतले पण त्या रकमेची शेड्यूल निघत नाहीत ़6वेतन आयोगाच्या हप्ते जमा नाहीत 2008_09पासुनचे वह्उचर मिळत नाही काय करावे कृपया मार्गदर्शन करा

    ReplyDelete
    Replies
    1. ही कार्यवाही Deparment कडून करायची आहे. माहे देयक Approved झाल्याबरोबर बील Generat करायच्या अगोदर Bill group मधून आपले नांव Detach करावे तरच होईल. तदनंतर ‌DD2 Department Login वरुन बदलीच्या शाळेतून relive दाखवून बदली झालेल्या शाळेत आपले नांव जोडावे म्हणजे होईल.
      परंतु आपल्या शाळेला शेवार्थ आहे की शालार्थ ... कारण शालार्थ बंद आहे.

      Delete
  16. नमस्ते सर मला दि.27/8/2003रोजी तिसरे अपत्य झाले आहे माझी अँजिओप्लास्टी 17/8/2018रोजी झाली आहे.मला मेडिकल बिल प्रतिपूर्ती रक्कम क्लेम केलेस मिळेल का याबाबत मार्गदर्शन व्हावे

    ReplyDelete
    Replies
    1. आपणास वैद्यकिय प्रतिपुर्ती देय आहे. 2005 ची अधिसुनेनुसार अधिसुचनेच्या दिनांकापासुन पुढील ९ महीन्यानंतर तिसरे अपत्य झाल्यास छोटे कुटूंब या सदरात मोडत नाही.
      वैद्यकिय प्रतिपुती चा लाभ देतांना जर छोटे कुटूब या व्याख्येनुसार जर नसेल तर शासकिय कर्मचारी व त्याची पत्नी व कुटूंबाचे व्याख्येनुसार नंतर जन्मलेले अपत्य यांना वैद्यकिय प्रतिपुर्ती मिळत नाही परंतु तारखेच्या पुर्वी जन्मलेल्या मुलांचे वैद्यकिय प्रतिपुती मिळते.
      2. जर कुटूंबाचे व्याख्येनुसार व तारखेनंतर जर मुलांचा जन्म झाला व त्यानंतर जर कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करवून घेतली तर सर्वांना वैद्यकिय प्रतिपूती मिळेल.
      वैद्यकिय प्रतीपुर्ती अधिनियम 1961 मधील कलम अंदाजे 14 ते 15 पहावे. तसेच शासन निर्णय या टॅब मधील सर्वात खाली कुटूंबाची व्याख्या पहावी.

      Delete
  17. आभारी आहे सर

    ReplyDelete
  18. आभारी आहे सर

    ReplyDelete
  19. मागासवर्गीय कर्मचाऱ्याने शासनसेवेत खुल्या प्रवर्गात प्रवेश केलेला आहे तर पदोन्नती पण खुल्या प्रवर्गातच घ्यावी लागते का सर.

    ReplyDelete
    Replies
    1. मागासवर्गीय कर्मचाऱ्याची नियुक्ती ही जरी खुल्याप्रवगातुन झाली असेंल तरी त्याला जातीचे सर्व लाभ मिळतील. त्याकरीता त्यांनी जातवैधता करून घ्यावी. पदोन्नती ही जातीप्रमाणे मीळेल.

      Delete
  20. सर अर्जित रजा कमीतकमी किती दिवस घेता येते. व त्याबद्दल काही जीआर आहे तर सागा सर कृपया ...

    ReplyDelete
    Replies
    1. कमीत कमी ३ दिवस घेता येते या बाबत शासन परीपत्रक https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201601111124148407.pdf

      Delete
  21. नमस्कार सर,
    छोट्या संवर्गाकरिता सा.प्र.वि. शासन परिपत्रक दि.29/5/2017 व दि.25/682018 नुसार सरळसेवेकरिता एकूण 18 मंजूर पदांमध्ये ‘इतर मागासवर्ग’ या प्रवर्गाकरिता 3 पदे राखीव आहेत. परंतू कार्यालयात इमाव मध्ये 4 पदे भरलेली आहेत. त्यामध्ये इमाव चे 1 पद अतिरिक्त झालेले आहे. प्रश्न असा की, इमाव चे 1 अतिरिक्त असलेले पद खुल्या प्रवर्गात समायोजित करावे किंवा कसे ? जीआर आहे का ? याबाबत कृपया मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
    Replies
    1. इ.मा.व. मध्ये १ पद अतिरिक्तच दाखवावे लागेल जो पर्यत इमाव मधील प्रमोशन किंवा आपले विभागातुन बदली होत नाही तो पर्यत ते पद अतिरिक्त्च राहील त्याला खुल्या प्रवर्गात टाकता येत नाही. काही होत नाही पुढे जर आकृतीबंध लागला तर परत इमाव व ईतर मध्ये पदे अतिरीक्त होतील. फक्त हे पद अतिरीक्त का झाले ते पाहून ठेवावे.

      Delete
  22. विभागीय प्रशिक्षण संपलेनंतर एक दिवसाची किरकोळ रजा घेऊन कार्यालयात हजर होता येते काय

    ReplyDelete
  23. नमस्कार सर
    आमच्या संस्थेतील एक महिला कर्मचारी पुढील महिन्यात प्रसूती रजेवर जाणार आहेत
    संबंधित कर्मचारी यांचा दिवसेंदिवस वैद्यकीय खर्च वाढत असल्याने प्रसूती राजेंच्या कालावधीत वेतन मिळण्याची / चालू ठेवण्याची त्यांनी मागणी केलेली आहे
    प्रसूती राजा मंजूर करण्याचे अधिकार संचालक स्तरावर असल्याने डीडीओ प्रसूती रजेच्या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्याचे वेतन अदा करू शकतात का ?

    ReplyDelete
    Replies
    1. रजेचा अर्ज त्वरीत वरिष्ठ कार्यालयास सादर करून त्यांचे कडुन रजा मंजुर करून घ्यावी. व त्यानंतर त्यांचा पगार काढावा. या करीता संबंधीतांनी अर्ज व त्यासोबत डॉ. यांचे प्रमाणपत्र कार्यालयास सादर करून रजा अगोदरच मंजुर करावी त्यामुळे पगार वेळेवर दिला जाईल.

      Delete
  24. एकादा कर्मचारी पुर्वी 1900/- ग्रेड पे गट क पदावर कार्यरत असेल त्यानंतर त्याने कार्यालयाची पूर्ण परवानगी घेवून गट क ग्रेड पे 2400/- पदाची परीक्षा दिल्यानंतर तो त्या परीक्षेत गुणाणुक्रमांकने उर्तीण होवून अन्य विभागात नियुक्ती झाल्यास त्याला पुर्वीच्या कार्यालयाकडून कार्यमुक्त केले असता नव्याने नियुक्ती झालेल्या कार्यालयाकडून वेतन निश्चिती होणे क्रमाप्राप्त आहे किंवा त्यास कोणते लाभ प्रधान केले जावू शकतात ?

    ReplyDelete
    Replies
    1. रितसर अर्ज केल्यामुळे सर्वच लाभ मिळेल. आपण पुर्वीच्या विभागात ४-५ वर्षापुर्वीच लागले असाल तर वेतनावर फरक पडणार नाही आपले बेसीक 7510 पेक्षा जर कमी असेल तर आपण 7510 व ग्रेड वेतन 2400 या प्रमाणे वेतन निश्चिती होईल व जर आपले वेतन 7510 पेक्षा जास्त असेल तर आपले वेतन निश्चिती होईल.

      Delete
  25. Hello Sir
    Ekhadha Karmachari jar Diyanga (Handicap) asel tar tayala Transport Allowance (TA) va Professional Tax (PT) madhe sut ahe ya karita kahi Guideline kiva GR asel tar Please Margadarshan kara sir.
    Thanks

    ReplyDelete
    Replies
    1. https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201704031735509605.pdf and वाहतुक भत्ता देय आहे त्याची लिंक सोबत दिली आहे. तसेच व्यवसाय कर संबंधात संबंधीतांचा अर्ज घ्यावा व अपंगाबाबतचे प्रमाणपत्र मग कर्मचारी स्व:ता असो किंवा पत्नी किंवा मुले असो त्यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडुन सदरचा अर्ज हा व्यवसाय कर विभागास पाठवावा व मग त्यांचे कडुन सुट मिळते. या बाबतचा शासन निर्णय सद्या माझे जवळ नाही.

      Delete
  26. सर जिल्हा न्यायालयात 2005 नंतर रुजू झालेल्या कनिष्ठ लिपीकांना जुनी पेन्शन योजना लागू आहे का सर.

    ReplyDelete
    Replies
    1. नाही. फक्त न्यायाधीश यांनाच जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे. 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यास नाही.

      Delete
  27. नमस्कार सर,
    वित्त विभागाच्या शासन निर्णय दि.11/2/2013 अन्वये कक्ष अधिकारी संवर्गास पीबी-2 रु.9300-34800 + ग्रे.वे.रु.4800/- अशी वेतनश्रेणी आणि 4 वर्षाच्या नियमित सेवेनंतर पीबी-3 रु.15600-39100 + ग्रे.वे.रु.5,400/- अशी सुधारीत वेतनश्रेणी लागू आहे. आमच्या कार्यालयात श्रीमती अबक यांना कक्ष अधिकारी (पीबी-2 रु.9300-34800 + ग्रे.वे.रु.4800/-) या पदावर दि.25/9/2013 रोजीपासून पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यांना कक्ष अधिकारी या पदावर दि.25/9/2017 रोजी 4 वर्षाची नियमित सेवा पूर्ण होत आहे. परंतू श्रीमती अबक ह्या दि.13/2/2017 ते दि.11/8/2017 अशी 180 दिवसांची प्रसूती रजा, तद्नंतर सलग 140 दिवसांची अर्जित रजावाढ, 119 दिवसांची अर्धपगारी वैद्यकीय रजा, 30 दिवसांची अर्धपगारी वैद्यकीय रजा आणि 96 दिवसांची दि.31/8/2018 पर्यंत अर्जित रजा उपभोगलेल्या असून त्या कार्यालयात दि.4/9/2018 (म.पू.) रोजी कार्यालयात रुजू झालेल्या आहेत. प्रश्न असा की, श्रीमती अबक यांना 4 वर्षानंतरची वरिष्ठ वेतनश्रेणी (पीबी-3 रु.15600-39100 + ग्रे.वे.रु.5,400/-) दि.25/9/2017 रोजी लागू करावी किंवा कार्यालयात रुजू दि.4/9/2018 पासून लागू करावी ? याबाबत कृपया मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
    Replies
    1. सदर महीला कर्मचारी हया वैद्यकिय रजेवर असल्यामुळे तसेच त्यांची सर्व रजा वैद्यकिय कारणास्तव मंजूर केल्यामुळे त्या ज्या तारखेस ४ वर्ष पुर्ण झाले त्याच तारखेला त्यांना पदोन्नती देय होईल परंतु त्यांना मात्र पगार हा जुन्या बेसीक प्रमाणे देण्यात येईल व ते ज्या तारखेला रूजू होईल त्या तारखेपासुन नविन बेसीक प्रमाणे पगार देय होईल.

      Delete
  28. सर अबक नावाच्या कर्मचाऱ्याचे गोपनीय अहवाल(CR) खूपच खराब आहेत म्हणून त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करता येते का सर. कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. बडतर्फ करता येणार नाही. या पुर्वी आपणास त्या कर्मचाऱ्याविरूद्ध विभागीय चौकशी नेमावी लागेल – कारणे दाखवा नोटीस बजावी लागेल व त्यामध्ये तो जर दोषी आढळला तर विभागीय चौकशीच्या अनुषंगाने कार्यवाही योजावी लागेल, एकदम बडतर्फ करता येणार नाही.

      Delete
  29. नमस्कार सर
    माझा असा प्रश्न आहे की, मी सध्या सहाय्यक ग्रंथपाल या पदावर कार्यरत आहे आणि सहाय्यक ग्रंथपाल हे एकाकी पद मोडत असल्यामुळे मला 12 वर्षा नंतर कोणत्या प्रकराची वेतनश्रेणी लागू पडेल , सध्या माझा GP-2800 Rs आहे. तसेच सर आपण service मध्ये राहून जर Higher education (उदा. एम.फील,पिचडी) जर प्राप्त करतो तर अश्या कर्मचारी यांना काही Benefits आहे का ? आपण या संदर्भात मार्गदर्शन करावे हि विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. ग्रंथपाल हे एकाकी पद असल्यामुळे आपणास शासन निर्णय दिनांक 06/09/2014 नुसार पहील्या आश्वासित योजने करीता रू 400/- ग्रेड वेतन मिळेल म्हणजेच आपला ग्रेड वेतन रू 3200/- ईतका होईल व आपणास ग्रंथपाल या पदाचे मुळ वेतन व 2800/- यावर 3% जी रक्कम येईल ती व मुळ वेतन याची बेरीज जी होईल तो आपला आ.प्र.यो नंतरचा मुळ वेतन होईल व 3200/- ग्रेड पे या प्रमाणे आपले पे फिक्स होईल. आपली कालबद्ध जर 30/06/2018 पुर्वी असेल तर विकल्प द्यावा आन्यथा नाही. आपणाकडे उच्च शिक्षण असल्यामुळे आपण विभागीय परीक्षा देवून थेट नेमणूक घेवू शकता या करीता mpsc मध्ये विभागीय परीक्षेची जाहीरात पहावी.

      Delete
    2. धन्यवाद सर मार्गदर्शन केल्याबद्दल

      Delete
  30. ठेव संलग्न विमा योजनेसाठी MTR52A फॉर्म कसे भेटेल

    ReplyDelete
    Replies
    1. https://drive.google.com/file/d/1UgPPJtnTMfFHxdZZeXxuJZdcCFkZtaB5/view?usp=sharing

      Delete
  31. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. नगर पालीका / महानगरपालीका यांचे हद्दीत

      Delete
  32. सर नमस्कार,
    एखादया कर्मचा-याला बदली रजा, नैमित्तिक रजा, व अर्जित रजा एकत्रित जोडून घेता येतात का? जर घेता येत असेल तर सर काही शासन निर्णय आहे का याबाबत.

    ReplyDelete
    Replies
    1. नैमित्तीक रजा ही अर्जित रजेसोबत जोडुन घेता येत नाही. बदली सोबत जोडता येते. रजा नियम 45 पहावा

      Delete
  33. नमस्ते सर
    मोबदला रजा / बदली रजा केव्हा मंजूर करता येते ?
    दैनंदिन कामकाज प्रलंबित राहिल्यास ते पूर्ण करणेसाठी सुटिच्या दिवशी काम केल्यास बदली सुट्टी /रजा मंजूर करता येते का?
    वर्ग १ व २ अधिकाऱ्यांसाठी बदली रजेची तरतुद आहे का? असल्यास शासन निर्णय प्रत द्यावी.
    धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. शासकिय सुट्टीच्या दिवशी कार्यालय ठेवले तर त्या दिवसाची बदली रजा मिळते रजा नियम 45 पहावे.

      Delete
  34. सर नमस्कार
    मी 2 वर्षापूर्वी शिपाई पदावर नियुक्त झालो। माझा पे स्केल 4440-7440 (1300) gp आहे। पण 7व्या वेतन आयोग मध्ये ह्या पे स्केलचा स्लैब नाही आहे। तर 7वा वेतन calculate कस करायच?

    ReplyDelete
    Replies
    1. जानेवारी पर्यत धिर धरा.

      Delete
  35. नमस्कार सर
    सन किंवा दिवाळी अग्रीम बाबत शासन निर्णय असतील तर कृपया दयावेत.

    ReplyDelete
    Replies
    1. https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201810231618479705.pdf

      Delete
  36. नमस्कार सर,
    आमचे प्राधिकरण ही एक स्वायत्त संस्था असून संगणकचालक-नि-लिपिक या पदाकरीता माजी सैनिक या समांतर आरक्षणांतर्गत पीबी-1 रु. 5200-20200 + ग्रे.पे. रु.1900/- इतक्या वेतनश्रेणीत माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न असा की, सदर कर्मचा-यांचे सैनिक सेवेत असतानांचे अंतिम वेतनानुसार प्राधिकरणातील नियुक्तीच्या दिनांकपासून (म्हणजेच डिसेंबर, 2017) वेतन संरक्षित करण्यात येते का ?

    ReplyDelete
    Replies
    1. वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 11/07/2012 प्रमाणे कार्यवाही योजावी

      Delete
  37. सर सेवाप्रवेशोत्तर परीक्षा बाबत एकूण ५ विषयांपैकी ३ विषयांत ४० % पेक्षा जास्त मार्क्स आहे पण ५० पेक्षा अधिक नाहीत तसेच २ विषयांत ४० % पेक्षा कमी मार्क असल्याने मला रिचेकिंग करीत विनंती अर्ज दिला तर २ विषयांचे पेपर रिचेक होऊ शकतात काय ?

    ReplyDelete
    Replies
    1. या बाबत आपणास ये परीक्षा घेतात त्यांचेशीच संपर्क करावा लागेल तसेच आपल्या विभागाचे Manual पहावे त्या मध्ये सुचना दिलेल्या असेल,तसेच परीक्षा नियमावली असेल त्या प्रमाणे कार्यवाही करावी.

      Delete
  38. दिव्यांग व्यक्तीना किरकोळ रजा किति असतात व इतर रजे संदर्भात काही जी.आर असेल तर कृपया मार्गदर्शन करा
    धन्यवाद

    ReplyDelete
  39. namskar sir majhe pramotion 22 july 2003 madhye tantri adhikari varun varishth sankhyiki sahayyak ase jhale grade pay 4200 varun 4300 asa jhala ani 12 varshachi ashvashgit yojna july 2015 la manjur jhaleli ahe v grade pay 48000 dey ahe parantu shasanane 5.10.2018 chya shasan nirnayanusar tantrik adhikari he pad ekaki ghoshit kele ahe june 2003 pasun tyanche grade vetan ashvashit labha 4200 varun 4700 asa v dusara 24 varshacha labh 5400 asa rahnar ahe yamadhye amache nuksan shasana kadun jhale ahe pramotion deun amchya peksha kanishth karmachari adhik vetan ghenar ahet krupaya amhi yapudhe kay karave ya baddal margadarshan karanyachi vinantri karit ahe please sir margadarshan vhave hi vinanti

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या पदास जर पदोन्नती नसेल तर ते पद एकाकी होते, परंतु जर पदोन्न्ती असेल तर मग ते एकाकी होणार नाही. दुस-या कर्मचाऱ्यास आपण ज्या पदावर आहेत त्या पदाचा जर एकाकी पदाचे फायदे दिले असेल व आपणास दिले नसेल तर त्याला ज्या तारखेपासुन लाभ मिळाला त्या तारखेपासुन आपणास मिळेल. शासन एकाकी पद ठरवत नाही हे विभाग ठरविते.

      Delete
  40. नमस्कार सर,
    आमचे प्राधिकरण ही एक स्वायत्त संस्था आहे. अभियंता पदाकरिता मागासवर्गीयांकरिता राखीव पदे रिक्त आहेत. सेवाप्रवेश नियमानुसार अभियंता पदावर सरळसेवेने जाहिरातीव्दारे किंवा प्रतिनियुक्तीने मुलाखतीव्दारे भरण्यात येतात. प्रश्न असा की, मागासवर्गीयांच्या राखीव रिक्त पदांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करता येते का ? तसेच प्रतिनियुक्तीने नियुक्ती झालेले उमेदवारांची बिंदूनामावली रजिस्टरमध्ये नोंद घेता येते का ? याबाबत कृपया मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिनियुक्ती ही पदावर होत असते, तेथे बिंदु नसते, कोणत्याही प्रवर्गातील अधिकारी हा आपले कार्यालयात प्रतिनियुक्तीवर येवू शकतो, आपल्याकडे पद मंजुर असते परंतु ते भरण्याकरीता आपल्या विभागास परवानगी नसल्यामुळे ते पद दुसऱ्या विभागाकडुन प्रतिनीयुक्तीवर घेते त्यामुळै येथे प्रवर्गाचा संबंध येत नाही.हे झाले प्रतिनियुक्ती बाबत. परंतु आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्या विभागातुन पद भरती याच पदावर होते तर तेथे मात्र शासन निर्णय सा.प्र.विीभाग दिनांक 25/07/2018 नुसार कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

      Delete
  41. नमस्कार सर
    दिव्यांग व्यक्तीना किरकोळ रजा किति असतात व इतर रजे संदर्भात काही जी.आर असेल तर कृपया मार्गदर्शन करा
    धन्यवाद

    ReplyDelete
  42. सर माझे शिक्षण 10 वी पास आहे माझी कनिष्ठ लिपिक पदावर दिनांक-३०/७/२०१४ पासून नियुक्ती झाली आहे. सर शिपाईला कनिष्ठ लिपिक पदी पदोन्नती हवी असेल तर शिक्षण पदवी पर्यंत पाहिजे तर मला कनिष्ठ लिपीक संवर्गातून अव्वल कारकून पदावर पदोन्नती हवी असल्यास शिक्षण पदवी पर्यंत असणे आवश्यक आहे का सर. कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. नाही. आपण कनिष्ठ लिपीक या पदावर दिनांक 06/06/2017 पुर्वी लागल्यामुळे कोणत्याही वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यास पदवि ही अर्हता नाही आहे. त्यामुळे सर्वांची पदोन्न्ती ही पुर्वी प्रमाणेच होईल. पदोन्नतीसाठी येथे आपला अनुभवच महत्वाचा आहे. पदवी नाही.

      Delete
    2. सर याबाबत कोणता शासन निर्णय उपलब्ध आहे का ?

      Delete
    3. वरिष्ठ लिपीक प्रथम लिपीक यांचे सेवा प्रवेश नियम सुधारित केले नाहीत त्यामुळे जुनेच नियम लागु राहील

      Delete
  43. सर मी शिपाई या पदावर 2009 मध्ये रुजू झालो परंतु आता पदोन्नती करीता 6.6.2017 अधिसूचनेनुसार पदवी आवश्यक आहे का

    ReplyDelete
    Replies
    1. हाेय परंतु काही कमचारी यांनी प्रकरण न्याय प्रवीषठ केले अाहे

      Delete
  44. नमस्‍कार सर

    मला प्रथम प्रसुुुुतीमध्‍येे जुळी झाली आहेत. कुटुुंबाच्‍या व्‍याखेत प्रथम प्रसुतीमध्‍ये एक मुल नंतरच्‍या प्रसुती मध्‍ये जुळी झाली तरी देेेखील एकच ग्राहय धरणार तर जर प्रथम प्रसुती मध्‍ये जुळी झाली तर एक मुल धरणार किंवा दोन धरणार, याबाबत मार्गदर्शन होणेेेस विनंती आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. शा.नि.मध्ये जर आपणास पुर्वी १ अपत्य व नंतर जुळी झाली असेल तर दोन अपत्य धरण्यात येईल परंतु पहील्यांदाच जर जुळी झाली असेल तर ते दोन धरतात. त्यामुळे आता आपणास या नंतर जर अपत्य झाले तर ते तिसरे अपत्य म्हणून धरल्या जाईल.

      Delete
    2. धन्‍यवाद सर

      Delete
  45. नमस्कार सर
    एखादा वर्ग-ड मधील कर्मचारी निलंबित (माहे फेब्रुवारी 2017 पासून आज रोजी पर्यंत) असताना माहे डिसेंबर 2017 मध्ये भविष्य निर्वाह निधी खातेमधून परतावा तत्वावर अग्रिम घेतलेले आहे.माहे सप्टेंबर 2018 अखेर त्याचे एकूण 9 हप्तेची (प्रतिमाह रू. 1500/- प्रमाणे) परतफेड करणेत आलेली आहे. सदर कर्मचा-याने पुन्हा परतावा अथवा ना-परतावा तत्वावर अग्रिमची मागणी केल्यास त्यांना अग्रिम देता येईल का किंवा कसे, तसेच सदर अग्रिम मंजूर करणेचे अधिकार कार्यालय प्रमुख अथवा विभाग प्रमुख यांना आहेत. याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. परतावा नियमाप्रमाणे देता येणार नाही. परंतु ना-परतावा देता येईल. एका वर्षात एकाच कारणाकरीता ना परतावा देता येत नाही परंतु कारण किंवा रोग वेगळे असल्यास देता येते, परतावा कार्यलय प्रमुख हे मंजुर करतात परंतु नियमापेक्षा जास्त रक्कम पाहीजे असल्यास नियुक्ती प्राधीकारी यांचे आदेश हवे तसेच ना परतावा करीता नियुक्ती प्राधीकारी यांचे आदेश पाहीजे. कृपया ही लिंग पहावी https://drive.google.com/file/d/1_fWuYvfIeT6TFv6LaYSvu-kHOu8EYuKb/view

      Delete
  46. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  47. एखादा शासकीय कर्मचारी शासनसेवेत असतांना निलंबित झाला तद्नंतर पुनस्‍थार्पित केले तर सदर निलंबन कालावधीतील गोपनिय अहवाल काय लिहावे किंवा शेरा काय द्यावा ? याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.(पदोन्‍नती करिता)

    ReplyDelete
    Replies
    1. जेव्हा निलंबीत कालावधी नंतर ज्या ठिकाणी सदर कर्मचारी यांची नियुक्ती झाली आहे त्या कार्यालयानी एक प्रमाणपत्र द्यावे कि श्री… हे दिनांक ..पासुन तर दिनांक … पर्यंत निलंबीत असल्यामुळे त्यांचे गोपनीय अहवाल निरंक आहे. असे प्रमाणपत्र घ्यावे. या बाबत शासन निर्णय आहे. मिळाले की पुरविण्यात येईल.

      Delete
    2. धन्‍यवाद सर

      Delete
  48. सर महसुल विभागातील गट क संवर्गातील कर्मचारी यांना विभागीय परीक्षा उतीर्ण होण्‍यास पासुन सुट देण्‍यास त्‍यांची वयाची मर्यादा सामान्‍य प्रशासन विभाग यांचे शासन निर्णय दिनांक 01 मार्च 2018 अन्‍वये वय 45 वरुन 50 करण्‍यात आली आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदी हया हा 01 मार्च पासुन अमंलात येतील असे नमुद केले आहे. परंतु ज्‍यांचे वय 45 हे दिनांक 01 मार्च 2018 अगोरच पुर्ण झालेले आहे. परंतु त्‍यांना सुट मंजुर करण्‍यात आलेली नाही. करीता त्‍यांना सुट मंजुर करता येईल का

    ReplyDelete
    Replies
    1. होय, सदरचा नियम व सदर कर्मचाऱ्यास वयाची ४५ वर्ष हे दिनांक 01/03/2018 पुर्वी पुर्ण झाल्यामुळे त्यांना ४५ ची सुट मिळेल व जे दिनांक 1/03/2018 नंतर ४५ वर्ष पुर्ण करतील त्यांना वयाच्या ५० व्या वर्षी सुट प्रदान करण्यात येईल.

      Delete
  49. सर माझी शिपाई म्हणून 2 वर्षापूर्वी नियुक्ति झालेली आहे. मी permenent झाल्यानन्तर मला घर बाँधणी अग्रिम केव्हा भेटु शकते?

    ReplyDelete
    Replies
    1. आपणास स्थायीत्व प्रमाणपत्र हे तिन वर्षाची सेवा झाल्यानंतर मिळते, व त्यानंतर आपणास घर बांधणी अग्रिम मिळण्यास पात्र होता.

      Delete
  50. नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की मी कनिष्ठ लिपिक पदावर दिनांक-30/7/2014 पासून दिनांक-3/8/2018 पर्यंत कार्यरत होतो दिनांक-4/8/2018 रोजी माझी अव्वल कारकून पदावर पदोन्नती झाली आहे. सर मला आता अव्वल कारकून पदावर आंतर विभाग बदली करायची असल्यास मी लगेचच बदलीने दुसऱ्या जिल्हात जाऊ शकतो का सर की काही किमान सेवेची अट आहे याबाबत मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. होय आपण बदली बाबत प्रयत्न करावा आता आपली जेष्ठता मध्ये विशेष फरक पडणार नाही. शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक 3.06.2011 पहावे.

      Delete
    2. ज्‍येष्‍ठतेमध्‍ये विशेष फरक पडणार नाही म्‍हणजे काय सर मला समजले नाही सर.

      Delete
    3. आपण ३ महीन्या आधी अव्वल कारकून झाले आहे व दुसरी कडे जेव्हा बदलीने रूजू व्हाल तेच्हा तेथे आपण कनिष्ठ राहाल व हा फरक सद्याचे विभागानुसार ३ - ४ महीन्याचा असेल

      Delete
  51. नमस्कार सर,
    आमचे प्राधिकरण ही एक स्वायत्त संस्था आहे. अभियंता संवर्गात मागासवर्गीयांची 15 राखीव पदे व खुल्याची 15 पदे असे एकूण 30 रिक्त पदे आहेत. तत्पुर्वी सदर संवर्गात प्रतिनियुक्तीने 5 भरलेली आहेत. सेवाप्रवेश नियमानुसार अभियंता पदावर सरळसेवेने जाहिरातीव्दारे किंवा प्रतिनियुक्तीने मुलाखतीव्दारे भरण्यात येतात. प्रश्न असा की, अभियंता संवर्गात मागासवर्गीयांची 15 रिक्त पदे व खुल्याची-15 रिक्त पदे आहेत. सरळसेवेची जाहिरात देतांना प्रतिनियुक्तीने भरलेली 5 पदे खुल्यातून कमी करून खुल्याची-10 पदांची जाहिरात द्यायची का ? किंवा खुल्याची-15 रिक्त पदांची जाहिरात ? याबाबत कृपया मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण १५ पदांची भरती करावी व भरती प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर ५ पदावरील कर्मचाऱ्यांना त्यांचे मुळ विभागाकडे परत पाठवावे

      Delete
  52. जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला फौजदारी गुन्ह्यात अटक झाली व त्याच्यावर गुन्हा नोंदविला गेला तसेच काही दिवसानंतर त्याची जामिनावर मुक्तता झालेली आहे. त्या कर्मचाऱ्याविरुद्ध आरोप पत्र दाखल करण्यासाठी पोलीस विभागाने परवानगी न घेता(परवानगी साठी कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ कार्यालयात प्रलंबित ) आरोप पत्र दाखल केलेले आहे. तर 1- संबंधित कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ विभागाला अशी परवानगी देणे किंवा नाकारणे बंधनकारक आहे का? असल्यास त्याची काही कालमर्यादा आहे का? तसेच 2-तसेच जोपर्यंत अशी परवानगी मिळत नाही तो पर्यंत D. E. लावली जाऊ शकत नाही का? किंवा D. E. लावण्यासाठी काय प्रक्रिया आहे? कृपया योग्य मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
  53. नमस्कार सर
    ड वर्गातुन क वर्गात पदोन्नती देण्यासाठी काय निकष लावलेजातात ़
    1 सेवाजेष्ठतानुसार कि पदवी प्राप्त झालेल्या तारखेपासून ़
    मी 14/09/07 ला नोकरी लागलोआहे़
    2018 च्या सेवाजेष्ठता यादीत माझे स्थान 2007नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांननंतर आहे ़
    जर माझ्या नंतर नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येईल की माझा नोकरीलागलेल्या दिनांक नुसार 10 वर्ष सेवा विचारात घेतले जाईल ़
    पदोन्नती देताना कर्मचाऱ्यांची सेवा विचारात घेतली जाते की नाही

    ReplyDelete
    Replies
    1. 1.स्थायीत्वाचे प्रमाणपत्र दिलेले असावे. व शासन निर्णय दिनांक 06/06/2017 नुसार टायपिंग व पदवी हवी परंतु पदवी बाबत मी माहीतीचे अधिकारांर्गत माहीती मागीतली आहे अद्याप प्राप्त झालेली नाही. 2. ३ वर्षाची नियमीत सेवा 3. पदवी ही आपणास जर तिन वर्षानंतर जर मिळाली असेल तर त्या तारखेपासुन

      Delete
  54. baal sangopan raja kiti diwas gheta yete, ani kontya GR nusar.

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. मूल १८ वर्षांचे होईपर्यंत एकूण १८० दिवस, एका वर्षात २ महिन्यापेक्षा जास्त घेता येत नाही.एका कॅलेंडर वर्षात तीन टप्प्यांमध्ये घेता येते,हक्क म्हणून रजा मागता येत नाही.

      Delete
    3. धन्यवाद आपण उत्तर दिल्या बाबत, अशीच सर्वांना विनंती आहे की, त्यांना जर प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर ते कृपया दयावे जेणे करून माझे मागील याबाबतचा त्राण कमी होईल. परत धन्यवाद

      Delete
    4. https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201807231728349805.pdf

      Delete
    5. Sandeep Shriram KhedekarNovember 17, 2018 at 11:20 AM

      संधी दिल्याबद्दल आभारी आहे, साहेब

      Delete
  55. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  56. एका वर्ग-१ सेवक दिनांक २३/०६/१९८७ रोजी सेवेत आला आहे, २०२१ मध्ये सेवानिवृत्त होणार आहे. त्याने दि.०५/०५/२००८ रोजी मूळ जन्म दाखला नोंदणी आढळ झाल्याचे नमूद करून जन्म दिनांक बदलणेस विनंती केली आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र, वित्त विभागा दि.२४/१२/२००८ ची अधिसूचना, सूचना क्र. १ नुसार दिनांक १६ ऑगस्ट १९८१ रोजी किंवा त्यानंतर ज्याने शासकीय सेवेत प्रवेश केला आहे, त्या शासकीय कर्मचार्या ने शासकीय सेवेत प्रवेश केल्याच्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीनंतर, आपल्या सेवापुस्तकात किंवा सेवापटात नोंदलेल्या जन्मतारखेमध्ये फेरबदल करण्यासाठी दिलेल्या अर्जावर विचार केला जाऊ नये.'' अशी आहे. सूचना क्र. २ मध्ये जरी विशिष्ट पुरावा प्राप्त झाल्यास जन्म दिनांक सुधारित करण्याची सूचना असली तरी अशी कार्यवाही वरील सूचना क्रमांक (१) चे आधीनतेने करावयाची आहे.'' सबब त्यांचे अर्जाचा विचार करता येणार नाही असे कळविले आहे. अशिक्षित पालक होते त्यांनी शाळेत चुकीची दिनांक दिली असे नमूद करून आता त्यांनी वकिलामार्फत नोटीस दिलेली असून हाय कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. तरी, त्यांची मागणी बरोबर आहे का?

    ReplyDelete
    Replies
    1. त्यांना कोर्टात जावू द्या आपणास काहीही अडचण येणार नाही आपण जी कार्यवाही करत आहात ती बरोबर आहे. शासन निर्णयास ते कोर्टात आव्हान करतील व कोर्ट जे निर्णय देतील त्या नुसार शासनाचे मार्गदर्शनांनंतर मग पुढील कार्यवाही योजता येईल. तो पर्यत आपण काहीही करू नका शासकिय अभियोक्ता मार्फत त्यांना नोटीसचे उत्तर द्यावेत.

      Delete
    2. Sandeep Shriram KhedekarNovember 17, 2018 at 10:55 AM

      Thanks sir

      Delete
  57. प्रसूती रजा 6 महिने उपभोगल्यानंतर लगेच बालसंगोपन करिता 3 महिने अर्जित रजा घेतली म्हणजेच दि.10/02/2018 ते 08/08/2018 व लगेच 09/08/18 ते 08/11/2018 अर्जात रजा घेतली काही अडचणी तर नाही येणार ना. सलग 6+3 महिने रजा घेतल्याने

    ReplyDelete
    Replies
    1. येईल, आपण ६ महीने रजा घेतल्या नंतर संगोपन रजा एका वर्षात २ महीन्यापर्यंतच घेता येते, कृपया पुढील शासन निर्णय पहावा. https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201807231728349805.pdf

      Delete
  58. परंतु मी अर्जित रजा घेतली विशेष बालसंगोपन रजा नाही मग तरी पण अडचण येईल का

    ReplyDelete
    Replies
    1. नाही आपण एक दिवस रूजू होवून नंतर 2 महिन्याची संगोपन रजा घ्यावी

      Delete
  59. नमस्कार सर,
    संगणकचालक संवर्गात विजा-अ करिता 1 राखीव जागा होती. अंतर्गतपरिवर्तनाने भ.ज.(ब) चा 1 कर्मचारी विजा-अ मध्ये घेतला आहे. आता संगणकचालक या पदाची खुल्या प्रवर्गात 3 रिक्त पदे आहेत. सदर पदाची जाहिरात द्यावयाची आहे. प्रश्न असा की, जाहिरात देतांना विजा-अ ची 1 जागा रिक्त दाखवावी कि अंतर्गतपरिवर्तनाने भरलेली असल्याने जाहिरातीत विजा-अ जागा दाखवू नये ?

    ReplyDelete
    Replies
    1. येथे आपणास ३ पदे खुल्या प्रवर्गाचीच जाहीरात देवून भरावी लागेल. कारण आपण यापुर्वीच राखीव पद भरती केले आहे आता जर आपण परत जर विजा अ दाखविली तर आरक्षणापेक्षा जास्त पदे होतील तरी आपण या बाबत शासन निर्णय सा.प्र.वि. दिनांक 25/07/2018 व दिनांक 9/11/2009 पहावे.

      Delete
  60. नमस्‍कार सर, मागे सांगितलेप्रमाणे मला प्रथम प्रसुतीमध्‍ये जुळी झाली आहेत. तरी बालसंगोपन रजा घेतांना मला जुळयांकरिता वेगवेगळी रजा घेता येईल का? कारण एका बाळांकरिता ६ महिने अशी बालसंगोपन रजा आहे. तर मला जुळी असलेमुळे दोन बाळांकरिता प्रत्‍येकी ६- ६ महिने टप्‍याटप्‍याने मिळेल ना?

    ReplyDelete
    Replies
    1. नाही. प्रसुती ही एकच आहे, व बाळ जुळे असल्यामुळे तसेच छोटे कुटूंबाचे व्याखेनुसार दुसऱ्या प्रसुतीत जर जुळे झाले तरी ते एकच धरण्यात येते त्यामुळे आपणास फक्त ६ महीन्याचीच रजा मिळेल.

      Delete
    2. परंतु सर, लहान कुटुंबाच्‍या व्‍याखेनुसार प्रथम प्रसुतीमध्‍ये मला जुळी झालेमुळे माझे दोन अपत्‍य धरली जात आहे ना. मग मला दोन अपत्‍यांकरिता बालसंगापेन रजा मिळेेेल ना?

      Delete
    3. परंतु सर, लहान कुटुंबाच्‍या व्‍याखेनुसार प्रथम प्रसुतीमध्‍ये मला जुळी झालेमुळे माझे दोन अपत्‍य धरली जात आहे ना. मग मला दोन अपत्‍यांकरिता बालसंगापेन रजा मिळेेेल ना?

      Delete
  61. नमस्कार सर,
    विजा-अ मध्ये 1 राखीव जागा होती. विजा-अ चा कर्मचारी उपलब्ध नसल्याने अंतर्गतपरिवर्तनाने भ.ज.(ब) चा 1 कर्मचारी विजा-अ मध्ये घेतला आहे. आता भ.ज.(ब) मध्ये 1 रिक्त जागा झाली. प्रश्न असा की, भ.ज.(ब) चा कर्मचा-याने त्याची जातवैधता दिली आहे. तर भ.ज.(ब) मध्ये घ्यायला त्याचा विनंती अर्जाची आवश्यकता आहे काय ? का आस्थापनेने परस्पर भ.ज.(ब) मध्ये समायोजन करावे. कृपया याबाबत मार्गदर्शन व्हावे, ही विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. असे करावयाचे नसते, पद रिक्त आहे म्हणून कर्मचाऱ्यास त्या संवर्गात टाकू नये, जो कर्मचारी भज ब चा आहे तो लागतांना जर खुल्या प्रवार्गातुन लागला असेल तर त्याला शेवट पर्यंत खुल्यामध्येच दाखवावे लागेल, परंतु पदोन्नतीचे वेळेस त्याला भज ब चा फायदा आपोआपच मिळेले त्यामुळे त्याचा अर्ज घेवुन त्याला भज ब मध्ये टाकु नये. किंवा जात पडताळणी झाली म्हणून भ.ज.ब मध्ये कृपया टाकु नये.

      Delete
  62. सर अर्जित रजेला जोडून नैमित्तिक रजा घेऊ शकतो का

    ReplyDelete
    Replies
    1. नाही, फक्त अर्ध्या दिवसाची नैमित्तीक रजा जोडुन घेवू शकता रजा नियम ४५ नुसार

      Delete
  63. नमस्कार सर,वर्ग ४ (गट ड) मधील कोणकोणत्या पदाना पदोन्नती नाही,याची माहिती कृपया मिळेल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. माझ्या माहीती प्रमाणे व शासन निर्णय 06/06/2017 चे शासन निर्णयानुसार सर्व गट ड मधील कर्मचाऱ्यांना गट क मध्ये पदोन्नती मिळते असे नमुद केले आहे परंतु काही विभाग सांगतात की, जे पद हे एकाकी आहे त्यांना पदोन्नती नाही. करीता आपले विभागात गट ड चे कोणते पद एकाकी आहे ते पाहून घेणे.

      Delete
  64. namskar sir
    majhya misses che viral fever che medical bill hote te mala milu shakel ka?

    ReplyDelete
    Replies
    1. नाही, परंतु आपण डॉ यांचे कडुन typhid करून घ्यावा व २७ आजारामधील एक आजार दाखवावा.

      Delete
  65. sir, mi pwd office aurangabad madhe aahe. amchya office madhe vakilanchi panel var nemnuk karaychi aahe. tyasathi awashak asnare maharashtra vidhi adhikari adhiniyam 1984 asel tar pathva. aani panel chya fees kashi dyavi tyabaddal margadarshan kara. please sir.

    ReplyDelete
    Replies
    1. https://lj.maharashtra.gov.in/1296/Acts-and-Ordinance?format=print ओपन होत नाही अनु क्र. ३६ चे खाली आहे. मीळाला की आपणास पाठवेल.

      Delete
    2. Thanks sir...send me as soon as you get.

      Delete
    3. http://bombayhighcourt.nic.in/libweb/rules/RulesfortheConductoftheLegalAffairsofGovernment,1984.PDF

      Delete
    4. https://lj.maharashtra.gov.in/1238/Law-Officers

      Delete
  66. नमस्कार सर, मी औरंगाबाद येथे कनिष्ठ लिपिक पदावर 5 वर्षे पासून कार्यरत आहे, माज्याजवळ उचश्रेणी लघुलेखक अर्हता आहे.तर मला नामनिर्देशनाने पदोन्नती किंवा समावेशन मिळेल का? असेल तर काय करावे लागेल? आमच्या ऑफिस ला विचारले तर त्यांनी सांगितले की तुम्हाला पहिले लघुटॅंक लेखक पदावर घेता येईल.. मग HG वर जाता येईल. Plz guide me.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रत्येक पदाचे सेवा प्रवेश नियम असतात ते आपण प्रथम सेवा प्रवेश नियम या टॅब वर पहावे. आपली सेवा ३ वर्षापेक्षा जास्त झाल्यामुळे आपण जर इंग्रजी व मराठी ८० पास केली असल्याने आपण लघुटंकलेखक साठी पात्र आहात. आपल्या विभागात जर लघुटंकलेखक हे पद जर अस्तीत्वात नसेल तर आपण निम्नश्रेणी लघुलेखक या पदा करीता पात्र व्हाल परंतु आपण कनिष्ठ लिपीक ते उच्च श्रेणी लघूलेखक या पदावर पदोन्नतीने जाऊ शकत नाही कारण की या पदाच्या पुर्वी जे पद असेल त्या पदावर आपली सेवा ३ वर्षाची होणे आवश्यक आहे व आपण सद्या कनिष्ठ लिपीक आहे त्यामुळे आपणास आपले कार्याीलयाने जे सांगीतले ते बरोबर आहे. कृपया सेवा प्रवेश नियम तिनही पदांचे पहावेत.

      Delete
    2. खूप खूप आभारी आहे. आपले मार्गदर्शन असेच मिळत राहो. खूप छान माहिती दिली.

      Delete
  67. नमस्कार सर, मी अनुकंपा नियुक्ती वर्ग 4 पदावर मिळणे करिता रीतसर सहपत्रासह अर्ज सन,2003 रोजी मूळ कार्यालयात सादर केला होता त्या नुसार कार्यालय प्रमुख यांनी माझा मूळ प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात पाठविण्यात आले होते त्या नुसार जिल्हाधिकारी कार्यालय यांचे कडील अनुकंपा सामाईक प्रतीक्षासूची मध्ये माझे नाव 2003 रोजी समाविष्ट करून घेण्यात आले होते त्या अनुषंगाने मला नियुक्ती 2006 रोजी मिळाली आहे। माझा प्रश्न असा आहे की, लहान कुटुंब अधिसूचना 2005 नियम मुद्धा क्र. 5 अन्वये मला हा नियम लागू होतो का कृपया मार्गदर्शन करावे,

    ReplyDelete
  68. भारतीय राज्‍यघटनेतील कलम १४ व १५ नुसार पदोन्‍नती मिळणे हा कर्मचारी यांचा अधिकार आहे. सर एखाद्या कनिष्‍ठ लिपीकाची वेतनवाढ १ वर्षासाठी बंद केलेली आहे तर शिक्षेचा कालावधी चालु असल्‍यास त्‍यांना पदोन्‍नती देता येत नाही का सर. कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. जो पर्यत शिक्षेचा अंमल चालु असते तो पर्यंत त्याला पदोन्नती मिळत नाही. अंमल ज्या दिवशी संपेल त्या नंतर तो पदोन्नतीस पात्र होतो.

      Delete
  69. सर 🙏🏻
    मी सा बां. प्रादेशीक विभाग पुणे अांतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर २४/१२/२०१२ पासून कार्यरत आहे मला सा बां. प्रादेशीक विभाग औरंगाबाद अांतर्गत मंत्रालयातुन विनंती बदली करावयाची आहे तर अर्ज कोणाच्या नावे करावा ? व त्याची प्रोसेस काय आहे? कृपाया मार्गदर्शन व्हावे

    ReplyDelete
    Replies
    1. प्रथम आपण ज्या कार्यालयात आहात तेथुन आपण आपले परिमंडळात अर्ज करावा व परिमंडळाचे पत्रामध्ये आपणास सा.बा.परिमंडळ, औरंगाबाद अंतर्गत सा.बां.मंडळ, औरंगाबाद पाहीजे व हा अर्ज आपला परिमंडळातुन औरंगाबाद परिमंडळास जाईल व त्यांनी ना हरकत दिली तर आपली बदली ही परिमंडळस्तरावरुन होईल. 2. आपणास परिमंडळांतर्गत हा पत्रव्यवहार करावयाचा नसुन आपण कार्यसन अधिकारी सेवा-३ यांचे कडे अर्ज करावा व ते तेथुन दोन्ही मंडळास किंवा ऑरंगाबाद परिमंडळास विचारणा करील किंवा आपला जोर जास्त असेल तर ते सरळ बदली आदेश काढू शकतात.

      Delete
  70. नमस्कार सर,
    आमचे कार्यालयात ‘अभियंता’ या संवर्गात मंजूर पदांचे सेवाप्रवेश नियम आहेत. सदर नियमात पदोन्नती/प्रतिनियुक्ती/सरळसेवा असे आहे. परंतू भरतीचे प्रमाण निश्चित केलेले नाही. कार्यालयाने प्रकल्पाकरिता आवश्यक पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने व निम्न संवर्गात अर्हता धारण करणारे कर्मचारी उपलब्ध नसल्याचे बाब सांगून अभियंता संवर्गातील सर्व पदे सरळसेवेने जाहिरातीव्दारे भरण्याचे ठरविले आहे.
    1) सेवाभरतीचे प्रमाण असणे बंधनकारक असल्याचे जीआर आहे का ?
    2) सरळसेवेने भरती केली तर भविष्यात निम्नसंवर्गात कर्मचारी उपलब्ध झाला तर त्यांना पदोन्नती मिळेल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. अभियंता या पदाचे जे सेवानियम आहे त्यानुसारच कार्यवाही होईल. मला rr ची प्रत दयावी मि वाजून सांगतो.

      Delete
    2. Engineer
      Appointment shall be made either :-
      a) By promotion of a suitable candidate on the basis of selection form amongst the Dy.Engineer who possess degree of a statutory university in Civil Engineering and experience as mentioned in (c) below
      OR
      b) By deputation from Govt.Dept. or Semi Govt. Organization or PSU, if they possess the qualifications and experience prescribed in (c) below
      OR
      c) By selection from amongst the candidate who possess the following
      Educational :- Degree in civil engineering
      Experience : candidate should be working in Grade of Rs.9300-34800 + GP Rs.4600 working with 10 years service in Dy.Engineer or equivalent scale.

      Delete
    3. या सेवा प्रवेश नियमामध्ये तीनही ठिकाणी OR नि नमुद केले आहे याचा अर्थ येथे सरळसेवा पदोन्न्ती यांचे प्रमाण ठरलेले नाही त्यामुळे या सेवा प्रवेश नियमानुसार तिनही मधुन कर्मचाऱ्यांची नेमणूक देवू शकता. व आपल्या विभागास हाच सेवा प्रवेश लागु राहील.

      Delete
  71. मी कनिष्ठ लिपिक पदी कार्यरत असून शासकीय सेवेत मला दोन वर्षे पुर्ण झाली असून माझी पत्नीदेखील वनरक्षक पदी शासकीय सेवेत असून आम्ही दोघे राज्यसरकारचे कर्मचारी आहोत. तरी पती-पत्नी एकत्रीकरण शासन निर्णयानुसार मी बदलीस पात्र आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. शासन‍ निर्णयानुसार आपणास ३ वर्ष सेवा झाल्यानंतर बदली करता येईल. मे २०१९ मधील बदली मध्ये प्रयत्न करावा. सामान्य प्रशासन विभा्ग दिनांक 09/04/2018 चा शासन निर्णय पहावा.

      Delete
  72. सर,मी सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद येथे कार्यरत आहे. मला असे विचारायचे आहे की, पदोन्नतीच्या परिमंडलीय बैठक वर्षात कधी कधी होतात? व त्याबाबत काही gr आहे का? तसेच steno typist ची वेगळी ज्येष्ठता यादी ठेवली जाते का? कृपया पुन्हा एकदा माहिती द्या .

    ReplyDelete
    Replies
    1. या बाबत शासन निर्णय आहेत, साधारणता ऑक्टांबर मध्ये असते,परिमंडळात स्टेनोची जेष्ठता यादी असते व ती परीमंडळात सर्व पदांची मीळुन एकच जेष्ठता यादी मध्ये वेगवेगळया पदानुसार असते. शासन निर्णय मिळाल्यास देईल.

      Delete
  73. सर,माझा प्रश्न असा आहे की, स्टेनो टायपिस्ट पदावर अनुरेखक तसेच संगणक यांची पदोन्नतीने नेमणूक करता येते का? सेवाप्रवेश नियम 24.6.1997 नुसार स्टेनो टायपिस्ट पदावर लिपिक टॅन्कलेखक यांची विहित पात्रता असेल तर पदोन्नतीने नेमणुक करता येते.आमच्या औरंगाबाद परिमंडळ अंतर्गत अश्या नेमणुका झाल्या आहेत, त्या योग्य आहेत का? कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रवेश नियमाचे उलंघन करता येत नाही. त्यानुसारच कार्यवाही हवी किंवा प्रवेश नियमात दुरूस्ती केल्यानंतरच करता येईल.

      Delete
  74. Sandeep Shriram KhedekarNovember 22, 2018 at 11:56 AM

    सर,
    आमच्या आस्थापनेवरील वर्ग १ ते ४ मधील अधिकारी/कर्मचारी प्राणीसंग्रहालयातील शासकीय निवासस्थानात रहात असतानाही घरभाडे भत्ता मिळावा अशी मागणी करीत आहेत. त्यांना अशा बाबतीत दि.१५/११/२०११ चे अतिप्रदानीत घरभाडे भत्त्याचे वसुलीचे शासन आदेश निदर्शनास आणले असता, आम्ही प्राणीसंग्रहालयातील शासकीय निवासस्थानात राहणार नाही अशी लेखी नोटीस दिली आहे. प्रशासकीय व प्राणीसंग्रहालयातील कामाचे स्वरूप पाहता त्यांनी तेथे राहणे आवश्यक आहे, तर अशा प्रकारे वर्ग १ ते ४ मधील अधिकारी/कर्मचारी यांना प्राणीसंग्रहालयातील कर्तव्याचे ठिकाणी राहाण्याची सक्ती करता येईल असा नियम / कायदा याबाबत कृपया मार्गदर्शन मिळावे.

    ReplyDelete
    Replies
    1. जेथे निवासस्थानात राहत असतांना जर त्यांना घरभाडे भत्ता HRR कापत नसाल तर त्यांना तेथे राहणे बंधनकारक आहे. परंतु जर HRR कपात होत असेल तर त्यांना निवासस्थानात राहणे बंधन कारण काही त्यांना मुख्यालयीच रहावे लागेल.परंतु आपला विभागाचे मॅन्युअल पहावे त्यामध्ये या बाबत काही मिळते का. प्राणीसंग्रालय हे अत्यावशक सेवेमध्ये मोडते का हे पहावे. दुसऱ्या प्राणीसंग्रहालयाशी या बाबत विचारणा करावी.जर निवासस्थान हे राहण्याजोगे असेल चांगले असेल तर कार्यालय त्यांना सक्ती करू शकते. त्यांचे अर्जाचे अनुषंगाने विभागीय चौकशी सुद्धा आपण नेमु शकता.

      Delete
    2. Sandeep Shriram KhedekarNovember 22, 2018 at 3:47 PM

      thanks sir

      Delete
  75. एखाद्या कर्मचारीवर कार्यालयीन कामकाजासंदर्भात गुन्हा दाखल असताना न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला परवानगी देणे किंवा नाकारणे बंधनकारक आहे का? तसेच त्या बाबत काही कालमर्यादा आहे का? तसेच अशी परवानगी बऱ्याच महिन्यापासून प्रलंबित असेल तर कर्मचाऱ्याने काय करावे?

    ReplyDelete
  76. सर,जिल्हा परिषद ,कर्मचारी (कनिष्ठ लिपिक)वर्ग-3 पदाला
    आश्र्वासित कालबद्ध पदोन्नती करिता संगणक अर्हता उत्तीर्णतेची अट
    आहे काय असल्यास कोणता शासन निर्णय आहे ? कृपया मार्गदर्शन करावे,ही विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. संगणक उत्तीर्णची अट ही आश्वासित प्रगती योजनेस लागु नाही. परंतु शासन सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना दिनांक 28/05/2018 मधील नियम २(अ) नुसार पदोन्नतीसाठी विचार करण्यात येणार नाही असे नमुद केले आहे. परंतु माझे मते त्यांना आश्वासीत योजना लागु करावी व त्यानंतर सदर शासन निर्णयानुसार ती वयाची ५० वर्षे पर्यंत गोठवून ठेवावी.

      Delete
  77. Sir mazhe vadil MSRTC madhe driver hote. Tyana jaun 1 varsh hoil 18/12/2018 la ajun antim deyak milale nahit tr anukampa sathi application deta yeil ka ani
    2) Kontya jagesathi application dyaw he tharwaysathi mahitichya adhikaratun jaga waiting he samaju shakel ka?
    3) Karmacharyachya mrutyu nantar kiti diwsat job mialal pahije kahi time limit ahet ka?

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही आजच अर्ज करावा. अर्ज मृत्यु झाल्याच्या एक वर्षाचे आत अर्ज करावा लागतो, अन्यथा तो विचारात घेता येत नाही. येथे आपण अर्ज स्व:ता व दुसरा अर्ज RPAD ने करावा. १७ तारखेनंतरच्या अर्जास काहीही अर्थ राहणार नाही.
      आपण जर १० पास असाल तर वर्ग ४ चे पद व पदवि असेल तर वर्ग ३ चे पद मिळेल. आपल्याकडे तांत्रिक शैक्षणीक पात्रता असेल तर तेथील तांत्रिक पद मिळू शकते. परंतु आपण पदाचे भानगडीत न पडता प्रथम अर्ज करावा.

      Delete
  78. Replies
    1. माझे वडिल क्रुषि सहाय्यक म्हणुन २००१ सालि रुजु झाले
      २००१ पासुन तिन वर्षात लेखा परिक्षा पास झाले नाहित
      नंतर २०१० मधे त्यांना नियमानुसार लेखा परिक्षा पास हाेण्यापासुन वयांची ५० वर्षे पुर्ण झाल्यामुळे सुट देण्यात अालिी.परंतु वार्षिक वेतनवाढ २०‍१० पासुन देण्याऐवजि कार्यालयिन कर्मचार्या कडुन चुकािने २००१ पासुन देण्यात आलि. वडिल मार्च २०१८ मधे retire झाले.२००१पासुन-२०१० पर्यंत दिलेलि अतिरिक्त वार्षिक वेतन वाढ return करण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे कार्यालयाकडुन अतिरिक्त वेतन वाढ retire झाल्यानंतर वसुल करणे याेग्य अाहे काय? मार्गदर्शन करावे.

      Delete
    2. येथे आपल्या वडीलांची कोणत्याही प्रकारची वसुली होणार नाही. कारण त्यांनी ३/2003 रोजी वयाची ४५ वर्षे पुर्ण केल्यामुळे त्यांना 3/2003 मध्येच सुट देणे अपेक्षीत आहे. त्यांना ५० वर्षाचा शासन निर्णय लागु होत नाही. तसेच ते 2001 ला रूजू झाले तेथून ३ वर्षापर्यंत कोणतीही वेतनवाढ परीक्षा जोपर्यंत पास किंवा अनुर्तिर्ण होत नाही तो पर्यत रोखण्यात येत नाही.त्यामुळै आपल्या वडीलांना वयाची ४५ वर्ष पुर्ण होवून जातात. त्यामुळे वसुली होत नाही. मला त्यांना नियुक्तीचे वेळेी ते कोणत्या पदावर होते थोडा सेवातपशील पाठवावा ज्या योगे मी योग्य ते सांगु शकेल.

      Delete
    3. This comment has been removed by the author.

      Delete
    4. शासन सेवेतील प्रथम नियुक्ति संवर्ग-राेपमळा मदतनिस(माळि)
      जन्म दिनांक-५/३/१९६०
      शासन सेवेतील प्रथम नियुक्ति दिंनाक-३०/७/१९८२.
      वयांची ४५ वर्षे पुर्ण-५/३/२००५
      पहिलि पदाेन्नति -९मे २००१ (क्रुषि सहाय्यक पदावर).

      Delete
    5. आपले वडीलांची कोणत्याही प्रकारची वसुली होणार नाही. आपणास कार्यालयाकडुन पत्र आले आहे काय आल्यास त्यांना पत्राद्वारे कळवा की, दिनांक 5/3/2005 रोजी वयाची ४५ वर्ष पुर्ण झाल्यामुळे त्यांना या तारखेपासुन सुट देण्यात यावी.

      Delete
    6. 2001 पासुन वडिलांनि एकदाहि लेखा परिक्षा दिलेलि नाहि.

      Delete
    7. धन्यवाद सर reply दिल्या बददल.

      Delete
  79. शासकिय सेवेत असतांना कर्मचा-याला पुढिल स्पर्धा परीक्षा व शिक्षण घेण्यासाठी कार्यालयाकडुन मंजुरी मिळवण्यासाठी G.R. आहे का

    ReplyDelete
    Replies
    1. मी सध्या लिपीक टंकलेखक 2 वर्षे पासुन कार्यरत आहे. मला पुणे येथुन नागपुर बदली मिळवण्यासाठी मंत्रालयातुन अर्ज करायचा असल्यास कोण्याचा नावे करायचा यांचे मार्गदर्शन व्हावे.

      Delete
    2. जेव्हा स्पर्धा परीक्षेची जाहीरात निघते त्या जाहीरातीचा संदर्भ व पद नमुद करून कार्यालयाकडे फक्त अर्ज करावा व त्यामध्ये परीक्षेस बसणे बाबतची परवानगी मागावी. त्यांनी परवानगी दिली की सर्व शासन निर्णयानुसारच होते.

      Delete
    3. पुणे व नागपुर येथील एकच विभाग आहे असे समजुन आपणास सांगु ईच्छितो की, आपण कार्यासन अधिकारी मंत्रालय, मुंबइ यांचे कडे अर्ज करावा व अर्ज स्वत: घेवुन जावा. त्यांची भेट घ्यावी व ते आपले पुणै येथील कार्यालयास विचारणा करील व नागपुर येथील कार्यालयास विचारणा करील कि आपणास घेण्यास व सोडण्यास तयार आहे काय म्हणून व त्या बाबत होकार आल्यास आपला आदेश काढेल दुसरी पद्धत आपण आपले कार्यालयास अर्ज सादर करावा कि आपणास नागपुर येथे बदली पाहीजे व आपले विभाग नागपुर विभागास विचारणा करील कि आपणास ते बदलीने सामावून घेण्यास तयार आहे काय असल्यास मग आदेश निघेल.

      Delete
  80. आपण सांगितल्या प्रमाणे वयाचि ४५ वर्षे पुर्ण झाल्यानंतर
    लेखा परिक्षा सुट मिळणे याबाबतचा शासन निर्णय grअसेल
    तर link पाठवावि.

    ReplyDelete
    Replies
    1. https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201209141128100100.pdf https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20080623121112001.pdf

      Delete
  81. sir class-4 madhil Servents na class-3 madhil work karnyasaathi Order kaadhta yete ka? asa kahi G.R. or Rules aahet ka?

    ReplyDelete
    Replies
    1. नाही, तोंडी सांगावे, नाहीतर कोर्ट केस काही वर्षानंतर करेल.

      Delete
  82. सर माझा प्रश्‍न असा आहे की, कार्यालयातील संडास बाथरुम स्‍वच्‍छ करण्‍याचे काम कार्यालयातील शिपाई यांना सांगता येते का ते त्‍यांचे कर्तव्‍य आहे का सर.

    ReplyDelete
    Replies
    1. हे काम शिपाई यांचे नाही, या करीता स्वच्छक असतात त्यामुळे कार्यालय जे काम सांगत आहे ते चुकीचे आहे. याची जर Video काढला तर कार्यालयास ते फार धोकादायक राहील. लेखी असे कोणीही सांगु शकत नाही.

      Delete
  83. सर माझा प्रश्‍न असा आहे की, एखाद्या बाहेरील मानसाने कार्यालयामध्‍ये प्रवेश करुन एखाद्या कर्मचा-यास मारहान केली तर बाहेरील मानसावर गुन्‍हा नोंदवला तर कर्मचा-याच्‍या वतीन शासन केस लढते का सर. कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. जो व्यक्ती बाहेरील आहे व भांडणाचे काम जर कार्यालयाशी संबंधीत नसेल तर यात कार्यालय काहीही करणार नाही परंतु शासकीय काम करतांना काही अडथडा आणुन कर्मचाऱ्यास मारहान करीत असेल तर त्यावर कार्यालय गुन्हा दाखल करू शकतो परंतु पुढे तर ज्याला मारले त्यालाच शासनाचे वतीने केस लढावी लागेल. शेवटी काय तर कार्यालय फक्त पहील्यांदाच गुन्हा दाखल करेल व जो पोलीसांच्या चौकशीचा शिशेमिरा राहील तो कर्मचाऱ्यास, अधिकारी बदलुन गेलेले असेल.

      Delete
    2. परंतु गुन्हा हा ३५३ भादवी चा दाखल केला असेल तर तेव्हा शासन केस लढविते, व तेव्हा कर्मचारी हा तेथे फक्त साक्षीदार म्हणून असतो.

      Delete
  84. नमस्कार सर,
    आमचे कार्यालयात ‘कक्ष अधिकारी’ या संवर्गातून सेवाज्येष्ठतेनुसार प्रथम ‘श्री.अ’ (विमाप्र) व ‘श्री.ब’ (विमाप्र) आहे. सदर अधिका-यांना अवर सचिव हे वरिष्ठ पद पदोन्नतीने देताना श्री.अ हे वैद्यकीय कारणास्तव 2 वर्षे गैरहजर होते. त्यांचा मागील 5 वर्षाचा गोपनीय अहवालानुसार 2 वर्षाचा गोपनीय अहवाल नसल्याने ते पदोन्नतीस पात्रता धारण करीत नाहीत. त्यांना त्यांचे कनिष्ठ असलेले श्री.ब यांना अवर सचिव संवर्गात विमाप्र प्रवर्गात पदोन्नतीने अवर सचिव झाले आहेत.
    प्रश्न असा की, आता श्री.ब (विमाप्र), अवर सचिव हे सेवाज्येष्ठ असून त्यांना वरिष्ठ पद ‘सचिव’ या पदावर सेवाज्येष्ठतेने पदोन्नती द्यावयाची आहे. शासन परिपत्रक दि.29.12.2017 अन्वये आरक्षणाचा लाभ मिळून सेवाजेष्ठता यादीत वरच्या स्थानावर आले नाहीत असे नमूद आहे. श्री.ब, विमाप्र हे श्री.अ. गैरहजर असल्याने त्यांचेवर पदोन्नतीने गेले आहे. श्री.ब हे शासन परिपत्रकानुसार आरक्षणाचा लाभ मिळून सेवाज्येष्ठता यादीत वरच्या स्थानावर आले असे समजण्यात यावे किंवा कसे ? याबाबत मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
    Replies
    1. येथे आपणास स्पष्ट सांगु शकत नाही, कारण येथे बऱ्याच तांत्रिक अडचणी आहेत. श्री ब यांना अवर सचिव हे पद आरक्षणामुळे मिळाले आहे त्यामुळे आपण शासन परिपत्रक 29-12-2017 नुसार ते आरक्षणाचा लाभ मिळून सेवाजेष्ठता यादीत ते वरच्या स्थानावर आले असेच समजण्यात येईल. उदा. यांचे पदोन्नती ही 5/5/2014 रोजी झाली प्रवर्गातुन कक्ष अधिकारी म्हणुन यांना वरिष्ठ असलेले श्री क हयांची पदोन्नती ही दिनांक 5/6/2015 रोजी झाली तर जेष्ठता यादी तयार होतांना ब व त्यानंतर क असे होईल. परंतु प्रत्यक्षात जर ब यांना आरक्षण मिळाले नसते तर श्री क हे पदोन्नत पुर्वी झाले असते व नंतर ब यांची पदोन्नती झाली असती त्यामुळे ब हे सेवाजेष्ठता मध्ये आरक्षणाचा लाभ मिळूनच आले आहे. असे मला वाटते, कृपया प्रत्यक्षात काय झाले या नुसार निर्णय घ्यावा.

      Delete
  85. नमस्ते सर माजी सैनिक च्या जागा वर योग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास किंवा कुठलाही व्यक्तीने त्या जागेवर अर्ज न केल्यास त्या जागा रिक्त असतात काय किंवा त्या त्याच प्रवर्गातून मेरीट न भरता येतात का यासंदर्भात मार्गदर्शन करावे

    ReplyDelete

Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999

Pmo sep