Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे

प्रश्नोत्तरी भाग २


प्रश्नोत्तरी मध्ये २०० प्रश्न पुर्ण झाल्यामुळे आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर तेथे देऊ शकत नसल्यामुळे कृपया प्रश्नोत्तरी भाग 3 येथे प्रश्न टाकावेत.

276 comments:

  1. सर नमस्कार
    एखादया व्यक्तीने कर्मचा-यांविरोधात पोलीस स्टेशन ला खोटी तक्रार दिली की, मला मारल म्हणून तर कर्मचा-यावर काही कारवाई होऊ शकते का कृपया मार्गदशन व्हावे

    ReplyDelete
    Replies
    1. शासकिय दृष्टया काहीही फरक पडत नाही. परंतु पोलीस कार्यवाही काय होईल हे महत्वाचे आहे, जर खरीच मारहान झाली असेल तर भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला असेल तर त्यानुसार पोलीस कार्यवाही होईल व NC दाखल केली असल्यास काहीही फरक पडत नाही. गंभिर गुन्हयाबाबतच कार्यालय कार्यवाही करू शकते

      Delete
  2. सर एका कनिष्‍ठ लिपीकाला कार्यालयीन कामाचा काहिच अनुभव नाही एखादे काम सांगितले की तो लगेच साहेबांना किंवा वरीष्‍ठांना विचारुन करतो अस त्‍यांचे मागील ४ वर्षापासून चालु आहे. त्‍यांना कारणे दाखवा नोटीस दिली तर ते म्‍हणतात की, मला कार्यालयीन कामाचा मुळीच अनुभव नाही माझी फक्‍त ४ वर्षाची सेवा झालेली आहे आणी कार्यालयातील वरीष्‍ठांना विचारले तर कोणी काही सांगत नाही. मग अशा कर्मचारी यांचेेवर कोणत्‍या नियमानुसार कार्यवाही करता येते काय कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. सर्व प्रकारे कार्यवाही करू शकता, परंतु त्या करीता अधिकारी ठाम हवा. त्यांना बडतर्फ सुद्धा करू शकता, त्यांचे विरूद्ध विभागीय चौकशी सुरू करू शकता, त्यांचे उत्तराचे अनुसरून कार्यवाही योजावी. त्यांना अर्हताकारी परीक्षा / विभागीय परीक्षा करीता पाठविले आहे काय, त्यांना पाठवावे. परीक्षा पास न झाल्यास त्यांची वेतनवाढ पास होई पर्यंत देवू नये.

      Delete
  3. सर माझ्या mrs ची किडनी बदलेले आहे आता तिला दर 3 महिन्याला तपासणी असते आणि तिला पर monts 8000 रुपये चे गोळया लागतात तर तिला बाह्य रुग्ण चे बिल मिळते का जर असेल तर कुरप्या gr द्या

    ReplyDelete
    Replies
    1. किडनी बदलविल्यानंतर चा खर्च बाह्य रूग्ण म्हणून देता येते या बाबत शासन निर्णय माझ्या वाचण्यात आला नाही. जसे डायबिटीस व डायलिसीस करीता बाह्य रूग्ण देता येते तसेच मुत्रपिंड प्रत्यारोपण अयशस्वी झाल्यास डायलिसीस करीता देय आहे परंतु नंतरच्या खर्चास नाही. या करीता आरोग्य विभागाचा दिनांक 13/07/2006 चा शासन निर्णय पहावा.
      आपणास एक गोष्ट सांगु ईच्छितो की, आपणास ज्या दिवशी दवाखान्यात खर्च येत त्या दिवशी सकाळी भरती व्हावे व संध्याकाळी डिसर्चाज घ्यावा. डॉ. असे करीत नसल्यास त्यांना विनंती करावी. व ते देयक कार्यालयास सादर करावे.

      Delete
  4. नमस्कार सर,
    मी सन 2000 मध्ये वाहन चालक या पदावर शासकीय सेवेत रूजू झालो सन 2000 ते मे 2010 या कालावधीत वाहन चालक या पदावर कर्तव्य पार पाडले जून 2010 मध्ये अतिरिक्त झाल्याने कनिष्ठ लिपीक या संवर्गात पदस्थापना करण्यात आली.मी पदवीधर आहे माझी MS-CIT मराठी इंग्रजी टायपींग झालेली आहे आज तागायत सेवप्रवेशोत्तर परिक्षा घेण्यात आलेली नाही.मी कालबध्द पदोन्नती / आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणे बाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केला होता परंतू सेवा प्रवेशेत्तर परिक्षा उत्तीर्ण किंवा सुट मिळाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे कळविण्यात आले आहे माझी वाहन चालक या संवर्गत 10 वर्ष 6 महिने सेवा झालेली आहे वाहन चालक व कनिष्ठ लिपीक या पदाची एकच वेतन श्रेणी आहे.मला कालबध्द पदोन्नती / आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणे बाबत काय करावे लागेल या बाबत कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. वाहन चालक हे पद एकाकी आहे तसेच त्या पदाला निम्न श्रेणी लिपीक प्रशिक्षण/ विभागीय परीक्षा नाही. दोन्हीही पदांची वेतनश्रेणी एकच आहे. व जेव्हा पद समावेशनाने / अतिरीक्त झाल्यामुळे समावेशन होते तेव्हा आधीची सेवा धरल्या जाते त्यामुळे आपणास सन 2012 ला पहीली आश्वासति प्रगती योजनेचा लाभ मिळण्यास आपण पात्र आहात. तथापी आपण सन 2010 ला कनिष्ठ लिपीक या पदावर आल्यामुळे आपले विभागात जर प्रशिक्षण दिले जात असेल तर आपले कार्यालयाने आपले नाव प्रशिक्षणा करीता पाठविले काय? जर पाठविले नसेल तर ही कार्यालयाची जबाबदारी आहे, किंवा आपणास स्व:ता फार्म भरावा लागतो काय? त्यामुळे आपणास 2012 ला आश्वासित प्रगती योजना देय ठरते, आपण वेळोवेळी कार्यालयास परीक्षे बाबत लिहीत जावे. जर कार्यालयाने परीक्षा पास पाहीजे ही जर अट ठेवली व वेतन पडताळणी सुद्धा या बाबत आपणास अडचण निर्माण करू शकतात, त्यामुळे आपण पत्रव्यवहार करीता राहावा.
      येथे कार्यालयाने जर आपणास परीक्षा उत्तीर्ण पाहीजेच असे जर म्हटले तर त्यांना तात्पुरती वाहन चालकाची एकाकी पदाची पहीली आश्वासीत प्रगती योजना मंजुर करण्यास विनंती करावी व परीक्षा पास झाल्यानंतर उर्वरित थकबाकी प्रदान करावी अशी विनंती करावी.

      Delete
    2. आपले अनमोल मार्गदर्शन मिळाले धन्यवाद सर,

      Delete
  5. नमस्कार सर,
    मी आपल्या पैकी एक कर्मचारी असुन माझ्या हितचिंतकांच्या सांगण्यावरुन सदर कार्यालय माझ्या मुख्यालयी जाणार आहे तरी तु या कार्यालयात बदली करुन घे, मी माझी आपसी बदली करुन घेतली असुन हे कार्यालय शासन निर्णयानुसार अद्याप पर्यत मुख्यालयी हलविलेले नाही तरी कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. आपले कार्यालय जर शासनाने दुसऱ्या ठिकाणी हलविले असेल तरी सुद्धा कार्यालयातील अधिकारी त्यांचे स्वार्थापोटी कार्यालय दुसऱ्या ठिकाणी नेन्यास टाळाटाळ करीत असेल, जागा मिळत नाही व ईतर कारणे सांगत असेल तर आपण ज्या विभागाने तो शासन निर्णय पारीत केला त्यांना माहीतीच्या अधिकारांतर्गत माहीती मागावी कि, शासन निर्णय निघाल्यापासुन किती दिवसात कार्यालय हलविणे अपेक्षीत आहे या बाबत शासन निर्णय पुरविण्यात यावा २ सदरचा शासन निर्णय रद्द झाला काय? ३ सदरचे कार्यालय न हलविण्यामुळे जबाबदार कोण राहील अशी माहीती मागावी, तसेच शासनाचे पोर्टलवर तक्रार नोंदवावी J

      Delete
  6. नमस्ते सर.
    आमचे कार्यालयास चार चाकी वाहन उपलब्ध आहे मात्र सध्या ते चालू स्थितीत नाही. या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख पदी नवीन अधिकारी बदलून आलेले आहेत. त्यांचें एल पी सी मध्ये नमूद असलेप्रमाणे त्यांना कार्यालयीन वाहन उपलब्ध असलेने त्यांना मासिक वेतनामधून प्रवासभत्ता अदा करणेत आलेला नाही. मात्र या कार्यालयाचे वाहन चालू स्थितीत नाही तरी कार्यालय प्रमुखांना प्रवासभत्ता (T.A) अदा करता येईल किंवा कसे याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.याबाबतचा शासननिर्णय कोणता आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. ज्या दिवशीचा प्रवास ज्या वाहनाने झाला असेल त्याचे प्रवासभत्ता मिळतो, जसे, सरकारी वाहनाने गेले तर फक्त DA मिळतो, परंतु खाजगी वाहनाने गेले तर त्याचे भत्ते कि.मी प्रमाणे मिळते म्हणजेच त्यांना प्रवासभत्ता मिळतो, गाडी ज्या दिवशी सुरू असेल तेव्हा नाही.

      Delete
  7. शासनाचे *महाराष्ट्र नागरी सेवा नियम अंतर्गत नियुक्ती,प्रवेश, पदोन्नती, रजा, शिस्त विषयक बाबी, व वेतन भत्ते विषयक जे काही शासन निर्णय वित्त व सामान्य प्रशासन विभागाद्वारे* निर्गमित होतील, ते सर्व नियम ह्यापुढे *उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी लागू राहातील,* त्यासाठी वेगळे शासन निर्णय निर्गमित करण्याची गरज असणार नाही, अशा आशयाचा शासन निर्णय असुन तो माझ्याकडे नाही तरी
    _कृपया, ह्या शासन निर्णय निर्गमित झाल्याची तारीख, किंवा त्याची एक प्रत उपलब्ध करून द्यावी, ही सविनय समादराने विनंती•_

    ReplyDelete
  8. निम्नश्रेणी लघुलेखक हे ब संवर्ग मध्ये आहे की, क संवर्गामध्ये कृपया मार्गदशन व्हावे

    ReplyDelete
    Replies
    1. वर्ग क चे पद आहे ग्रेड पे 4300/-

      Delete
  9. सर वर्ग ब व क मध्ये फरक काय आहे. कस ओळखणार दोघांमध्ये फरक कपया मागदर्शन व्हावे

    ReplyDelete
    Replies
    1. ज्या पदाचा ग्रेड पे 4400/- किवा त्यापेक्षा जास्त आहे ते बहुधा वर्ग ब मध्ये मोळतात परंतु काही विभागात 4400 हे गट क व ब मध्ये सुद्धा येतात त्यामुळे प्रत्येक विभागाचे त्यांचे अधिकारानुसार पदाची वर्गवारी आहे. या बाबत आपणास MPSC WEBSIDE वर थोडीफार माहीती मिळू शकते.

      Delete
  10. साप्ताहिक सुट्टी अणि सार्वजानिक सुट्टीचा पगार मिळवा या बाबत शासन निर्णय
    आहे का मी नगर परिषद् मधे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे पण पर्यायी पानी पुरवठा येथे नियुक्ति आहे साप्ताहिक सुट्टी नाही हे सार्वजनिक तर लांब च आहे

    ReplyDelete
    Replies
    1. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक 11 फे्रबुवारी 1994 नुसार पहारेकरी / चौकीदार यांचे संदर्भात आठ तासाचीच ड्युटी आहे त्यामुळे सर्व वर्ग ४ चे कर्मचारी यांना सुद्धा ८ तासाचीच डयुटी आहे, चौकीदार / पहारेकरी यांना दुसरा व चौथा शनिवार सुट्टी नाही परंतु शिपाई यांना आहे, आपण शिपाई या पदावर असुन आपण जे काम करीता आहात ते काम तांत्रिक किंवा फिल्ड वर्क आहे त्याला बहुतेक जादा भत्ते असेल ते आपणास मिळावयास पाहीजे तसेच ८ तासाचे वर काम होत असेल किंवा दुसरा व चौथा शनिवार तसेच सार्वजनिक सु्टी च्या दिवशी आपण काम केल्यामुळे आपणा ओव्हर टाईम मोबदला मिळावयास पाहीजे. आपण ज्या पदाचे काम करीत आहात त्या पदाबाबत भत्ते कोणत्या वर्गाचे पद आहे इर्तर सविस्तर कळवावे.

      Delete
  11. सर पोलीस कॉन्सटेबलचा पगार कोणत्या वेतनश्रेणी नुसार काढतात ग्रेड पे किती असतो त्यांचा

    ReplyDelete
    Replies
    1. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम 2009 नुसार पोलीस शिपाई यांना रूपये 3200-4900 वरून 5200-20200 मध्ये ग्रेड वेतन रूपये 2000/- व स्पेशल पे रू 500/- या प्रमाणे दिला जातो, या नियमानंतर जर दुसस्ती केली असल्यास कृपया शासन निर्णय पहावेत.

      Delete
  12. सर एखादया कर्मचा-याला भारताबाहेर फिरायला जायच असेल तर कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते का ? कृपया मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रथम पारपत्र काढतांनाच कार्यालयाची नाहरकत घ्यावी लागते. ती मीळाल्यानंतर पारपत्र तयार होते, जेव्हा व्हिजा काढल्या जाते तेव्हा सुद्धा कार्यालयाची परवानगी मागीतल्या जाते ज्या वेळी कार्यालयातुन नाहरकत दिली जाते तेव्हा सदर अधिकाऱ्यास उक्त खर्च कशा प्रकारे भागविण्यात येते या बाबत स्पष्टीकरण कार्यालय मागवू शकते.

      Delete
  13. मंजूर पदांपैकी ड संवर्गातील 25% पदे नीरसीत करणे म्हणजे नेमके काय करायचे? कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
    Replies
    1. २५ टक्के पद निरसन करणे म्हणजे ते कमी करणे जसे एका कार्यालयात वर्ग ४ ची 100 पदे मंजुर आहे तेव्हा त्यातील 75 टक्के यांची पदोन्नती वर्ग ३ मध्ये करावी व राहीलेल्या २५ टक्के पदे ही वर्ग ४ ची राहील येथे उरलेले कर्मचारी जर पदोन्नतीस पात्र नसेल व ही पदे 25 टक्कके पेक्षा जास्त असेल तर जेव्हा ही संख्या २५ वर येईल ती पदोन्नती व सेवानिवृत्तीमुळे होईल. सरळसरळ वर्ग ४ चे २५ टक्के पदे ठेवणे व ते देखील कमी झाल्यानंतर खाजगी पद्धतीने भरण्यात येईल.

      Delete
  14. सर नमस्कार, सर माझ्या कार्यालयात एका अधिकाऱ्याची बदली दि. 31.05.2018
    रोजीच्या आदेशान्ये झाली आहे. समंधित अधिकारी दि. 13/06/2018 ते दि.
    22/06/2018 पर्यंत अर्जित रजा उपभोगली आहे रजेवर असताना त्यांना दि.
    14/06/2018 रोजी कार्यमुक्त केले असून पत्रात रजा आपल्या स्तरावर मंजूर करावी
    व वेतन काढावे असे सुचविले आहे. तर ती रजा मंजूर कुटून ह्यायला पाहिजे व
    त्यांनी पदग्रहण अवधी घेऊन ते दि 26/06/2018 रोजी रुजू झालेले आहेत रजा व वेतन
    या बाबत कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 30 ए नुसार ज्या कार्यालयातुन रजेवर असतांना बदलीवर मुक्त केले त्यांनी त्याची रजा मंजुर करणे आवश्यक आहे आपण त्यांना 30 नियमाप्रमाणे रजा मंजुर करण्याबाबत पत्र लिहावे. रजा त्यांना रजा वाढविली असती तर ती आपणास मंजुर करावी लागली असती. जेव्हा रूजू झाले तेव्हा पासुन पदग्रहण अवधी धरावा. त्यामुळे रूजू बरोबर झाले आहेत.

      Delete
  15. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  16. सर एखादा कर्मचारी शासन सेवेत असतांना गावाकडे जर सुट्टीवर गेला असेल व गावाच्या ग्रामसभेमध्ये त्यांना ग्रामस्थांनकडून बोलण्याचा अधिकार आहे का कृपया मार्गदर्शन व्हावे. की, ग्रामपंचायत विरुध्द बोलत आहे म्हणून त्याला दोषी ठरवतात का

    ReplyDelete
  17. नमस्कार सर
    सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद परिमंडळ यांनी सन २०१४ मध्ये कनिष्ट लिपिक पदासाठी जाहिरात काढली सदर जाहिरातित कनिष्ठ लिपिक पदासाठी एकूण ५५ जागा होत्या त्यापैकी महिला ओबीसीला ०५ जागा होत्या.माझा अर्ज महिला ओबीसी प्रवर्गात होता कागदपत्र पडतानी साठी माझ्यासह आठ महिलांना बोलवण्यात आले तथापि निवड यादी एक महिला कागदपत्र पडताळनी साठी गैरहजर असल्या कारणाने महिला ओबीसींच्या जागा ०५ असतांना ०४ महिलांची निवड यादी लावली. गुणवत्तेनुसार माझा ६ वा नंबर येत होता तथापि सदर एक महिला गैरहजर असल्या कारणाने माझा नंबर ०५ येनार होता परंतु निवड समितीने माझा निवड यादीत समावेश न करता वेटिंग यादित टाकले व परिमंडळ कार्यालयाने निवड यादीतील महिलांसोबत मंडळ कार्यालयाला नियुक्तीसाठी माझी शिफारस केली परंतु मंडळ कार्यालयाने माझे नाव प्रतीक्षा सूचित असल्या करणाने मला नियुक्तीचे आदेश दिले नाही त्यावर मी मंडळ कार्यालयाला जाहिरात ०५ जागेची असतांना निवड ०४ महिलांची केली त्यामुळे ०१ जागा रिक्त असून सदर जागेवर मला नियुक्ती देण्यात यावी असे विचारणा केली असता आपले नाव वेटिंग यादित आहे व त्यामुळे आपल्याला नियुक्तीचे आदेश देता येणार नाही असे लेखी उत्तर सदर मंडळ कार्यालयाने मला दिले यावर मी मॅटमध्ये गेले असता मला नियुक्तीचे आदेश दिले. परंतु निवड समितीच्या चुकीमुळे निवड यादीतील महिलांना एक वर्षांपूर्वी नियुक्तीचे आदेश दिले व मला एका वर्षांनी नियुक्तीचे आदेश मिळाले त्यामुळे माझे नुकसान झाले आहे तर मला मानीव दिनांक कोणता मिळेल ? व प्रमोशनसाठी माझा एक वर्षाचा कालावधी धरता येईल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. आपणावर अन्याय झालेला आहे. सरळ आपणास नियुक्ती द्यायची होती परंतु तसे झाले नाही. त्यामुळे न्यायालयात आपणास दाद मागावी लागली, व ती मान्य झाली. सामान्य प्रशासनाचा दिनांक 21/06/1982 जेष्ठता नियमावली नुसार आपण पात्र ठरत नाहीत. त्यामुळे आपणास कोणताही लाभ मिळणार नाही. परंतु आपणास परत न्यायालयात या बाबत दाद मागावी लागेल, या ठिकाणी न्यायालय आपणास न्याय देवू शकते.

      Delete
  18. नमस्कार सर, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती मधील कृषी विस्तार अधिकारी एकाकी पद आहे का

    ReplyDelete
  19. सर एखादा कर्मचारी गावाकडे जर सुट्टीवर गेला असेल आणि त्याच दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा असेल तर त्याला तेथील रहिवाशांच्या समस्या ग्रामसभेमध्ये बोलण्याचा अधिकार आहे का कृपया मार्गदर्शन व्हावे. की, ग्रामपंचायत विरुध्द बोलत आहे म्हणून त्याला दोषी ठरवतात का

    ReplyDelete
  20. नमस्कार सर,
    मी जि.प. मध्ये प्रा.आ.केंद्रामध्ये परिचर या पदावर सध्या कार्यरत आहे. प्रा.आ.केंद्रामध्ये परिचर संवर्गाच्या ४ जागा मंजूर असून सध्या २ जागा रिक्त असून आम्हाला १२-१२ तास ड्युटी करत आहे. साप्ताहिक सुटी मिळत नाही. तर अशा वेळी आम्हाला फक्त ५० रुपये अतिकालिक भत्ता एकच व्यक्तीला मिळतो. त्याबद्दल काही जी.आर. आहे का ?

    ReplyDelete
    Replies
    1. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक 11 फे्रबुवारी 1994 नुसार पहारेकरी / चौकीदार यांचे संदर्भात आठ तासाचीच ड्युटी आहे त्यामुळे सर्व वर्ग ४ चे कर्मचारी यांना सुद्धा ८ तासाचीच डयुटी आहे, चौकीदार / पहारेकरी यांना दुसरा व चौथा शनिवार सुट्टी नाही परंतु शिपाई यांना आहे, आपण शिपाई या पदावर असुन आपण जे काम करीता आहात ते काम तांत्रिक किंवा फिल्ड वर्क आहे त्याला बहुतेक जादा भत्ते असेल ते आपणास मिळावयास पाहीजे तसेच ८ तासाचे वर काम होत असेल किंवा दुसरा व चौथा शनिवार तसेच सार्वजनिक सु्टी च्या दिवशी आपण काम केल्यामुळे आपणा ओव्हर टाईम मोबदला मिळावयास पाहीजे.

      Delete
    2. नाही मिळत सर...
      त्याबद्दल काही जि. आर. नाही माझ्याकडे आपल्याकडे असेल तर पाठवाना सर
      धन्यवाद

      Delete
  21. नमस्कार सर ,शिपाई पदावर कार्यरत असून
    मी कर्मचारी निवासस्थानी राहतो. नोकरीच्या ठिकाणांपासून (मुख्यालयापासून) निवासस्थाने तीन किलोमीटर(3 km ) अंतरावर आहेत तरी आम्हाला प्रवास भत्ता (TA) मिळत नाही. तर असा काही नियम आहे का जेणेकरून आम्हाला TA लागू होईल 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. आपले कार्यलय व शासकिय निवासस्थान हे जर एकाच कॅम्पस मध्ये असेल मग ते १५ कि.मी. असले तरी वाहन भत्त मिळत नाही. परंतु निवासस्थान हे जर एकाच कॅम्पस मध्ये नसेल तर वाहन भत्ता मिळतो. त्यामुळे आपण वाहन भत्ता मिळण्यास पात्र आहात. वित्त विभागाचे दिनांक 05/04/2010, 7/09/2011 व 03/06/2014 चे शासन निर्णय पहावे.

      Delete
  22. सर, कृपया गट विमा परिगणना करण्याची पद्धत समजावून सांगा, आणि गटविमा करिता गट अ, ब, क, ड चे वर्गीकरण कसे केले जाते

    ReplyDelete
    Replies
    1. गट विमा योजना मध्ये आता फारच सुधारणा झाली असुन आता आपणास चॉर्ट पाहण्याची आवशक्ता नाही. आता आपण सरळ Mahakosh.gov.in मध्ये जावून तेथे DAT (mahakosh) ला क्लीक करून उजवे बाजुस GIS Saving Fund Calculator for state वर क्लीक करावी व माहीती भरावी त्यानुसार गट विमा योजनेचे आदेश काढावेत. शासन निर्णय 02/07/2002 नुसारच गट विमा योजनेची वर्गवारी आहे. ६ वे वेतनाचा या बाबत शासन निर्णय आलेला नाही. व बिल तयार करण्याकरीता Online Video पहावा.

      Delete
  23. धन्यावाद सर... निवासस्थान व कार्यालय एकाच campus मध्ये आहे हे कसे ठरवायचे ? कारण कार्यालय राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडे आहे व निवासस्थाने अलीकडे... दोघांमध्ये अंतर दोन किमी जवळपास आहे तसेच निवासस्थानाच्या व्यतिरिक्त दुसरी इमारत, कार्यालय वा इतर मालमत्ता, उपपरिसर असे काही नाही. फक्त निवासस्थाने बांधता येतील एवढीच जागा कार्यालयाची शिल्लक होती आणि तेवढ्याच जागेवर ही निवासस्थाने बांधण्यात आली आहेत..

    ReplyDelete
    Replies
    1. आपले निवासस्थान व कार्यालय या मध्ये जर दुसऱ्यांचा परिसर येत असेल म्हणजेच सर्व जागा कार्यालयाची नसल्यास ते एकाच परिसरात येत नाही. त्यामुळे आपणास वाहन भत्ता अनुज्ञेय आहे.

      Delete
  24. सर एखादा कर्मचारी गावाकडे जर सुट्टीवर गेला असेल आणि त्याच दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा असेल तर त्याला तेथील रहिवाशांच्या समस्या ग्रामसभेमध्ये बोलण्याचा अधिकार आहे का कृपया मार्गदर्शन व्हावे. की, ग्रामपंचायत विरुध्द बोलत आहे म्हणून त्याला दोषी ठरवतात का

    ReplyDelete
  25. नमस्कार सर

    एका महिला कर्मचाऱ्याने प्रस्तुती कालावधीची रजा दिनांक 14/10/2016 ते 11/04/2017 अशी रजा घेतली होती त्यानंतर सदरील रजेस जोडूनच दिनांक 12/04/2017 ते 21/05/2017 या कालावधीची वैद्यकीय रजा घेतली व पुन्हा सदरील रजेस जोडून दिनांक 22/05/2017 ते 02/09/2017 अशी अर्जित रजा घेतली यानंतर सदरील महिला कर्मचारी दिनांक 04/09/2017 रोजी कार्यालयात हजर झाली व पुन्हा दिनांक 06/09/2017 ते 30/04/2018 या कालावधीची विना वेतन रजा घेतली आहे.

    उपरोक्त सर्व परिस्थितीमध्ये सदरील महिला कर्मचाऱ्यास माहे जुलै ला वेतन वाढ देता येऊ शकेल का? असल्यास नियम अथवा शासन निर्णयासह मार्गदर्शन मिळावे हि विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. या ठिकाणी उक्त महीला कर्मचाऱ्यास वेतनवाढ देय आहे परंतु त्यांचा सर्व पगार वेतनवाढ पुर्वीच्या वेतनानुसारच निघेल. तथापि आपण येथे दिनांक 06/09/2017 ते 30/04/2018 पर्यत विना वेतन नमुद केले, विना वेतन हे वैद्यकिय कारणास्तव असेल तर मग वेतनवाढीवर काहीही परीनाम होणार नाही. परंतु सदर विना वेतन हे वैद्यकिय कारणास्तव नसेल तर त्यांना 2018 ची वेतन वाढ देता येणार नाही. मग त्यांना सन 2019 ची वेतनवाढ दयावी लागेल.

      Delete
  26. सर नमस्कार मला महाराष्ट्र शासन, पाटबंधारे विभाग, मुंबई यांचे परिपत्रक क्र. आरटीओ-1083/4178(840)/आ-9 दि.16/07/1984 हे परिपत्रक एका महत्वाच्या कामासाठी आवश्यक आहे खुप शोध घेतला पंरतु उपलब्ध नाही झाले आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे

    ReplyDelete
  27. Casual leave संपलेले असूनही एखादा कर्मचारी CL रजेचा अर्ज टाकून रजा घेत असेल तर कोणती कार्यवाही करत येईल शासन निर्णय अथवा परिपत्रक
    तसेच वेतन वाढ रोखता येईल काय किंवा without pay
    मार्गदर्शन करावे ही विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे रविवार आणि सार्वजनिक सुट्टया जोडुन घेता येते. उक्त रजा कालावधी हा ७ दिवसापेक्षा जास्त नसावा उपवादात्मक परिस्थीतीत ही मर्यादा 10 दिवस आहे. नैमित्तिक रजे संदर्भात शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 20 मार्च 1981 व दिनांक 24 मार्च 1982 उपलब्ध आहे या व्यातीरिक्त् आपण संबंधीत कर्मचाऱ्यावर कार्यवाही करू शकता.

      Delete
  28. नमस्कार सर,
    मला नवीन नियुक्त झालेल्या शिपाई यांची (४४४०-७४४०) १३०० या वेतन श्रेणीत वेतननिश्चिती करावयाची आहे तरी त्याबाबत मार्गदर्शन किंवा format असल्यास द्यावे.

    ReplyDelete
    Replies
    1. नव्याने नियुक्त झालेल्या शिपाई यास वेतन निश्चीतीची आवश्यक्ता नाही. येथे बेसीक वेतन रूपये 4440/- व ग्रेड वेतन 1300/- असेच राहील.

      Delete
  29. सर
    एका कर्मचा-याची नेमणूक दिनांक 01/4/2016 अशी आहे तर त्याचा परिविक्षा कालावधी कधी संपणार व कार्यालयामार्फत किती तारीखेपासून त्यांना परिविक्षा कालावधी पूर्ण झाल्याचे आदेश मिळेल

    ReplyDelete
    Replies
    1. परिक्षाधिन कालावधी हा वेगवेगळया पदास वेगवेगळा असतो, जाहीरातीत तो नमुद असतो किंवा आदेशात, समजा २ वर्षाचा परिक्षाधिन कालावधी असल्यास ज्या तारखेस रूजू होतो तेव्हा पासुन २ वर्षाचा कालावधी हा परीक्षाधिन कालावधी असतो त्यामध्ये त्यांनी जर अर्जित रजा / वैद्यकिय रजा गैरहजर असल्यास तेवढे दिवस वाढवून परीक्षाधिन कालावधी पुढे ढकलला जातो. येथे दिनांक 31/03/2018 रोजी परिक्षाधिन कालावधी पुर्ण होत आहे व त्यांनी 16 दिवस अर्जित रजा घेतल्यास ते दिनांक 17/04/2018 रोजी परीक्षावधिन कालावधी पुर्ण करतात.

      Delete
  30. सर एखादा शासकीय कर्मचा-याला ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत बोलता येते का गावाकडील लोकांची समस्या विषयी बोलू शकतात का की त्यांच्यावर बंधन आहे कृपया मार्गदर्शन व्हावे

    ReplyDelete
  31. सर उच्च माध्यमिक शिक्षक कोणत्या वेतनश्रेणीत येतात

    ReplyDelete
  32. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील २०१६ पासून विविध कारणांनी वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लागला आहे. या वेतनश्रेणीमुळे १२ वर्षे पूर्ण झालेल्या ३६२ प्रशिक्षित शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर झाली आहे.
    तर सर्व शिक्षकांना कोणत्या वेतन श्रेणीत समाविष्ट करून घेणार सरकार

    ReplyDelete
    Replies
    1. उच्च माध्यमिक शिक्षक
      PB2 9300-34800 GP 4600
      वरुन वरीष्ठ श्रेणी मंजूरी नंतर
      PB3 15600-39100 GP 5400

      जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना
      उच्च श्रेणी शिक्षक म्हणतात
      PB2 9300-34800 GP 4300
      वरील वेतनश्रेणी मंदिर शिक्षकांना
      वरीष्ठ श्रेणी मंजूरी नंतर
      PB2 9300-34800 GP 4400
      लागु होईल. तसेच उच्च प्राथमिक शिक्षक यांना वरीष्ठ श्रेणी मंजूरी नंतर
      PB1 5200-20200 GP 2800
      वरुन
      PB2 9300-34800 GP 4200
      लागु होईल.

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
    3. सर ही वरीष्ठ वेतनश्रेणी फक्त जिल्हा परिषद शाळेलाच आहे का जे संस्थेवरील शिक्षक आहेत त्यांना सुध्दा लागू आहे
      प्लिज सांगा सर

      Delete
  33. नमस्कार सर,
    माझी बहिण समाजकल्याण विभाग अंतर्गत निवशी शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होती. परंतु तिचे दि.०२.०५.२०१८ रोजी अकाली निधन झालेले आहे. तरी मला भाऊ या नात्याने अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळू शकेल का? त्यासाठी मला अर्ज कुठे करावा लागेल? माझ BA झालेले आहे.तरी त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन व्हावे ही नम्रविनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. आपली बहीण अविवाहीत असल्यास आपणास अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळते, या करीता ब्लॉक वरील
      अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/परिपत्रक यांचे एकत्रिकरण पहावेत. तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक 17/11/2016 पहावेत.

      Delete
  34. National Backward Krushi Vidyapeet Solapur सर हे विद्यापीठ केंद्र शासनात मोडते का राज्य शासना माहिती मिळेल का

    ReplyDelete
  35. सर वरिष्ठ लिपिकची वेतनश्रेणी किती आहे

    ReplyDelete
    Replies
    1. वरिष्ठ लिपीक या पदाकरीता 5200-20200 ग्रेड वेतन रूपये 2400/- असे आहे. व त्यांचे बेसीक 7510/- ग्रेड वेतन 2400/- एकुण 9910/- या वर सुरूवात होते.

      Delete
  36. नमस्कार सर,
    सर मी ३१/१०/२०१४ ते २०/०५/२०१७ पर्यंत महसूल विभागात लिपिक(gp-१९००/-) पदावर कार्यरत होतो आणि आता मी विक्रीकर विभागात कर सहायक (gp-२४००/-)या पदावर २३/०५.२०१७ पासून सेवेत आहे.त्यामध्ये २१ व २२ मे २०१७ ला शासकीय सुट्टी असल्याने सेवेत खंड पडला आहे.मला सेवा जोडून मिळेल का? आणि सेवा जोडून मिळाल्यास मला त्याचे फायदे काय काय होतील? या विभागात माझी जेष्ठता mpsc च्या मेरीटप्रमाणे आहे त्यामध्ये तिकडच्या कार्यालातील सेवेमुळे मला सेवाजेष्ठतामध्ये त्याचा लाभ होऊ शकेल का? कृपया मार्गदर्शन मिळावे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण कनिष्ठ लिपीक ते कर सहाय्यक अशी सेवा केली असुन येथे आपणास अर्थिक फायदा काहीच होणार नाही. आपली नियुक्ती ही जादा ग्रेड पे वर झाली आहे त्यामुळे पे फिक्सेशन मध्ये काहीही लाभ होत नाही. आपण जर रितसर परवानगी घेवून आपल्या कार्यालयातुन रिलीव्ह होवून येथे रूजू झाले असाल तर (व येथे सुट्टीच्या दिवसाचा खंड होत नाही. ) आपणास पुढील फायदे मिळू शकते. 2.5 वर्षाची रजा अंदाजे 40 दिवस वैद्यकिय रजा 60 दिवस अर्धवेतनी, या व्यतीरिक्त् काहीही फायदा बहूतेक मिळणार नाही त्यामुळे आपण या बाबत काहीही न केल्यास माझ्या मते योग्य राहील.

      Delete
  37. सर मि एक ग्रामीण रुग्नालय येथे कर्मचारी आहे मला वरिश्ठ यानि सागितले ले संपूर्ण कामे करितो पण मला कोण कोणती कामे आहेत हे माहित करण्या करीता काही शाशकीय सेवा पुस्तक आहे का्य

    ReplyDelete
  38. सर माझा प्रश्न असा आहे की, मी मुबईमध्ये शासकीय कर्मचारी आहे परंतू गावाकडून माझ्या विरोधात खोटी NC करतात की, मला मारल वैगेरे म्हणून पण त्यावेळी मी मुंबईमध्ये ऑन डयुटी असतो तर माझ्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो का कृपया मार्ग दर्शन व्हावे

    ReplyDelete
    Replies
    1. नाही. आपण जर मुंबई येथे असाल व आपल्या विरूद्ध जर खोटी तक्रार करीता असल्यास त्यांचेवर आपण खटला भरू शकता कारण आपण ते सिद्ध करू शकता, आपले फोन रेकॉडर् व सीसी टीव्ही फुटेज महत्वाचे आहेत.

      Delete
  39. सर माझा प्रश्‍न असा आहे की, कार्यालयाची कर्मचा-याच्‍या बाबतीत काय कर्तव्‍य आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  40. सर माझा प्रश्‍न असा आहे की, एखादे कर्मचारी यांचे गोपनिय अहवाल चांगले नाहीत म्‍हणजे किमान सरासरी B+ सुध्‍दा येत नाही मग सदर कर्मचारी यांची पदोन्‍नती होत नाही का सर म्‍हणजे तो ज्‍यष्‍ठते मध्‍ये समोर असला तरीही त्‍याची पदोन्‍नती होत नाही का सर त्‍याच्‍या मागेे असलेल्‍या कर्मचारी यांना पदोन्‍नती देण्‍यात येते का सर कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. गोपनीय अहवाल चांगला असने आवश्यकत आहे. गोपनीय अहवाल जर चांगला नसेल तर पदोन्नती आश्वासित प्रगती योजना मिळणार नाही. आपला गोपनीय अहवाल खराब केला तर आपणास कळविण्यात येईल जर कळविले नाही तर आपला गोपनीय अहवाल चांगला आहे असे समजण्यात येईल.

      Delete
    2. पहील्या आश्वासित करीता गोपनीय अहवाल B पाहीजे व दुसऱ्या आश्वासित करीता गोपनीय अहवाल B+ पाहीजेत.

      Delete
  41. सर एखादे अधिकारी यांनी एखाद्या कर्मचा-याचे गोपनिय अहवाल जानूनबुजून खराब केले तर त्‍या कर्मचा-याने काय करावे. कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  42. वर्ग ४ संवर्गातून कनिष्ठ लिपीक संवर्गात पदोन्नतीस टंकलेखनाची ३० शप्रमि किेंवा ४० शप्रमि परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते परंतु मी जर अस्थीव्यंग असेल हाताने अपंग असेल तर मला टंकलेखनातून सुट मिळू शकते का त्याबाबत काही GR आहेत का कृपया मार्गदर्शन व्हावे

    ReplyDelete
  43. मॅट कोर्ट यांनी दिलेली सेवाविषयक निर्णय याबाबतीत काही पुस्तके मराठी मध्ये आहेत का सर.

    ReplyDelete
  44. आंतर जिल्हा बादलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यास संबधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतन वाढ देण्या बाबत दि. 3 ऑक्टोबर 2003 GR आहे.
    अति उत्कृष्ट कामाच्या आगाऊ वेतनवाढ आता बंद केलेल्या आहेत परंतु आंतर जिल्हा बादलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यास संबधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतन वाढ बंद केलेल्या नाहीत त्या बाबत GR सध्या नाही
    आंतर जिल्हा बादलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यास संबधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतन वाढ मिळेल का आता ?
    तसेच दि 31/10/1989 आगाऊ वेतन वाढ देण्याबाबत चा GR मिळावा हि विनंती हा GR शासनाच्या वेबसाईट उपलब्ध नाहीये.

    ReplyDelete
    Replies
    1. या बाबत मी शासन निर्णय शोधत आहे, मीळाल्यास आपणास या बाबत माहीती पुरविण्यात येईल, त्या बद्दल क्षमस्व!

      Delete
  45. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  46. नमस्कार सर

    एका शासकीय कर्मचाऱ्याच्या पत्नीस पहिलेच आपत्य (मुलगा) झाला आहे व त्या नवजात मुलास जन्मल्या जन्मल्या हॉस्पिटल मध्ये 7 दिवस ऍडमिट करावे लागले आहे. सदरील नवजात मुलाचे नाव ठेवण्यात आले नसल्यामुळे हॉस्पिटल मधील सर्व बिल हे त्या बालकाच्या आईच्या नावाने तयार करण्यात आले आहे तसेच डिलिव्हरीचे बिल हे वेगळे असून त्यावर आईचे नाव आहे. तर सदरील स्थितीमध्ये शासकीय कर्मचारी बालकाच्या वैद्यकीय बिलाची मागणी हि बालकाच्या नावे करू शकतो का? अथवा सदरील मागणी हि पत्नीच्याच नावाने करावी लागेल? याबाबत काही नियम अथवा शासन निर्णय आहे का? याबाबत मार्गदर्शन मिळावे ही विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. दोन्ही देयके पत्नीचे नावाने काढावी मुलाचे नावाने नाही.

      Delete
  47. मी जलसंपदा विभागात दप्तर कारकून या पदावर कार्यरत आहे परंतु मला कनिष्ठ
    सहाय्यक या पदावर दिनांक 03/06/2011 च्या शासन निर्णयानुसार पद बदली करून मिळू
    शकेल का.जर संवर्ग बाह्य बदली करता येईल तर त्यासाठी काय करावे लागेल. कनिष्ठ
    सहाय्यक या पदासाठी लागणारी अर्हता माझ्याकडे आहे. व दोन्ही पदावर हे समकक्ष व
    समान वेतनाचे आहेत. तरी मला मार्गदर्शन करावे ही.

    ReplyDelete
    Replies
    1. आपणास बदली मिळू शकते, आपली नियुक्ती ज्या प्रवर्गातुन झाली असेल त्या प्रवार्गाचे पद जर कनिष्ठ सहाय्यक या संवर्गात ते खाली असावयास पाहीजे, रिक्त् असल्यास आपली बदली होवू शकते.

      Delete
  48. सर शासकीय कार्यालय व निमशासकीय कार्यालयात कोणकोणते कार्यालयांचा समावेश असतो पोलीस हे निमशासकीय आहे की शासकीय कसे ओळखावे

    ReplyDelete
    Replies
    1. कोणते कार्यालय हे शासकिय किंवा निमशासकीय आहे हे स्पष्टपणे सांगता येत नाही परंतु ज्या कार्यालयाचे कामकाज हे एखाद्या कमीटीद्वारे किंवा संघनेमार्फत चालविली जाते त्यास शासनाचा हस्तक्षेप नसते, त्यांना महाराष्ट शासनाचे कायदे लागु पडत नाही, त्यांचे स्व:ताचे कायदे असतात परंतू शासनाचे नियम त्यांना लागु असतात, जसे की, महानगरपालीका, जिल्हापरीषद , शिक्षण संस्था. पोलीस विभाग हे शासकिय कार्यालय आहे.

      Delete
  49. शासकिय कर्मचारी माहितीचा अधिकार २००५ अंतर्गत माहिती मिळविण्‍यासाठी कोणालाही अर्ज करु शकतो का सर कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. होय, शासकिय कर्मचारी सुद्धा अर्ज करू शकतो, भारताचा कोणताही नागरीक कोठेही माहीतीच्या अधिकारांतर्गत अर्ज करू शकतो, माहीती तृतीय पक्षाची पाहीजे असल्यास माहीती मिळत नाही. परंतु अर्ज करू शकता.

      Delete
  50. सर ,
    मी एसटी महामंडळ मेकॅनिक पदावर असतांना पदोन्नती घेतली होती तरी काही बेसीक फरक कारनास्तव मी पदावन्नत झालो तर परत परिक्षा न देता पदोन्नती घेता येईल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. होय, आपणास या पुर्वी आपण सर्व अटी पुर्ण केल्यामुळे आपणास पदोन्नती मिळाली परंतु काही कारणास्तव आपली पदोन्नती नाकारली तरी आपण नाकारलेले कारणाची पुर्तता झाल्यानंतर आपणास पदोन्नती मीळेल या करीता परीक्षेची अट राहणार नाही. आपण परीक्षा उत्तीर्ण बाबत या आधीच आपले सेवापुस्तकात नोंद झालेली असेल.

      Delete
  51. सर माझा प्रश्‍न असा आहे की, कार्यालयाची कर्मचा-याच्‍या बाबतीत काय कर्तव्‍य आहेत.
    कार्यालयाने कर्मचा-याला कोणते सहकार्य केले पाहिजेत याबाबत माहिती द्यावी हि विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. शासकिय पुस्तके या मध्ये कार्यालयीन कामकाज कार्यालयीन कार्यपद्धती पहावे.

      Delete
  52. सर महसुल विषयी माहिती मिळेल का शेतजमीनी बाबत

    ReplyDelete
  53. महोदय, चतुर्थ श्रेणी कर्मचा-याने स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी दि.02/07/2018 पासून दि.01/10/2018 पर्यंत 3 महिने अगोदर नोटीस दिलेली आहे. परंतु संबंधित हे प्रकृती ठीक नसल्यामुळे दि. 04/07/2018 पासून वैद्यकीय रजेवर गेले आहे. तेंव्हा त्यांचे स्वेच्छा सेवानिवृत्तीचे प्रकरण मंजुर करता येते का येत असेल तर कृपया कोणत्या नियमाने स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजुर करावी याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. करता येते, कर्मचारी जर आधिच रजेवर असता व त्यांनी सेवानिवृत्तीचा अर्ज सादर केला असता तर नियम वेगळा आहे, परंतु कर्मचाऱ्याने नोटीस देवून तो रजेवर गेला तेव्हा काहीही हरकत नाही. कृपया सेवानिवृत्ती नियम 50 ते 63 पहावे.

      Delete
  54. सर एखादे प्रकरण २०११ चे आहे त्‍या प्रकरणाची मागणी वरीष्‍ठ कार्यालयाने केली आहे त्‍या प्रकरणाचा शोध अभिलेख कक्षात घेतलेला आहे पण तो अभीलेख काही दिसून आला नाही. मग याला नव्‍याने रुजू झालेला २०१८ चा लिपीक जबाबदार असणार की प्रकरण हाताळणारा २०११ चा त्‍यावेळेसचा लिपीक जबाबदार असेल. याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. ज्या कर्मचाऱ्यांनी 2018 मध्ये कार्यभार घेतला त्यांनी त्यांचे कार्यभारात ही फाईल मिळाली असल्यास ते जबाबदार राहील. परंतु सदर फाईल ही जर अभिलेख कक्षात गेली असेल व तशी स्वाक्षरी असेल तर अभिलेख कक्ष जबाबदार राहील. किंवा 2011 चा कर्मचारी जबाबदार राहील.

      Delete
  55. सर प्रमुख लिपिक, मुख्यलिपीक व वरिष्ठ लिपिक या पदाच्या वेतनश्रेणी मध्ये काय फरक आहे व का

    ReplyDelete
  56. ड्रायव्हर हे एकाकी पद आहे या पदावरून कनिष्ठ लिपिक या पदावर संवर्गबाह्य बदली मिळू शकते का

    ReplyDelete
    Replies
    1. ग्राम विकास विभाग जिल्हा परिषदेकडील कनिष्ठ सहायक पदावर पदोन्नतीने, अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशनाने व वाहनचालकामधून कायमस्वरुपी कनिष्ठ सहायक पदावर येण्यास इच्छुकता दिलेल्या वाहनचालकाच्या नियुक्तीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत. 04-06-2018 चा शासन निर्णय पहावा. आपणास कनिष्ठ सहाय्यक या पदावर पदोन्नती होऊ शकते. आपण पदवि व टंकलेखन पर्रीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

      Delete
  57. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  58. सर ग्रामपंचायत कार्यालयातील भरती कोणत्या कार्यालयामार्फत करण्यात येते. व ग्रामपंचायत कार्यालयात मंजूरी पदे असतात का जसे की, लिपिक, शिपाई, सहायक,ड्रायव्हर

    ReplyDelete
  59. सर सहायक कक्ष अधिकारी मंत्रालयीन पद व पोलीस खात्यातील पोलीस उप निरिक्षक पद हे समकक्ष पद आहे का की, दोघांनपैकी कोणते पद मोठे आहे

    ReplyDelete
    Replies
    1. सहाय्यक कक्ष अधिकारी व पोलीस उप निरीक्षक हे समान वेतन श्रेणीचे आहेत. 9300-34800 ग्रेड पे 4300 परंतु कक्ष अधिकारी म्हणुन सर्व सेवा मंत्रालयात होते व तेथे अवर सचिव उप सचिव पर्यत पदोन्नती होऊ शकते ग्रेड पे 4400 5400 6600 व 7600 पोलीस उप निरीक्षक म्हणुन काम केल्यास जास्तीत जास्त ग्रेड पे 5400 पर्यत जावू शकता परंतु नोकरी महाराष्ट्रात कोठेही करावी लागेल.

      Delete
  60. नमस्कार सर,
    जिल्हापरिषदच्या शिक्षकांना किती ग्रेड पे आहे. व हायस्कूलच्या शिक्षकांना किती ग्रेड पे असतो कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद

    ReplyDelete
  61. सर एखादे कर्मचारी यांना कार्यालयीन कामे करीत असतांना त्‍याच्‍या उजव्‍या हाताला करंट लागला व तो आता त्‍या हाताने काही काम करीत नाही म्‍हणजे त्‍याचा उजवा हात काहीच काम करीत नाही त्‍या कर्मचा-याने कार्यालय प्रमुखास अर्ज केला की मला शासकिय सेवेमध्‍ये असतांना अपंगत्‍व आले आहे त्‍याचे सर्व फायदे मला द्या. म्‍हणजे यांना कोणते फायदे द्यायचे सर कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. तसे फायदे म्हणुन काहीही नाही, परंतु येथे आपण कामावर असतांना अपघात झाल्यास सेवानिवृत्ती घेवु शकता, कामाचे स्वरूप अधिकारी आपणास बदलवून देवू शकतात. विमाछत्र योजने अंतर्गत आपणास अपंगत्व आल्यामुळे नियमानुसार रक्कम मिळू शकते.

      Delete
  62. नमस्कार सर
    पोलीस स्टेशन मधील माहिती मिळविण्यासाठी माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन व्हावे

    ReplyDelete
  63. 16 मे 2018 च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्वावर नेमनुक देताना जून्या वेतन श्रेणीनुसार की मानधन तत्वावर देण्यात येईल आणि मानधन तत्वावर देणार असाल तर पदानुसार मानधन किति राहिल. मार्गदर्शन करावे विन्नती

    ReplyDelete
    Replies
    1. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन निर्णय दिनांक 20/01/2016 चा पहावा. तसेच या बाबत शासनाकडुन सेवाप्रवेश नियम निश्चित करणे बाकी आहे त्यामुळे सद्या जे मानधन शिक्षण कृषी व ग्रामसेवकांना मीळते त्या प्रमाणेच मिळेल.

      Delete
  64. 2005 नुसार छोटे कुटुंब नियम कायम विना अनुदानित शाळेला लागू आहे का ?मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  65. सर समजा एका कर्मचाऱ्याला 2005 नंतर 3 मुले झाली तर अशा कर्मचाऱ्यांवर काय कार्यवाही होईल? कुठे असे प्रकरण झाले आहे काय?

    ReplyDelete
    Replies
    1. काही होणार नाही. फक्त ॲडव्हांस, रजा प्रवास सवलत व ईतर आर्थिक बाबी मिळणार नाही. परंतु नोकरीवरून काढू शकत नाही. तसेच तीन अपत्यानंतर कुटूंब नियोजन चे प्रमाणपत्र असल्यास अति उत्तम.

      Delete
  66. सर माझी नियुक्ती जिल्हा परिषद मधे वर्ग क पदावर *खुला अपंग* या प्रवर्गातून झाली आहे. मला आंतर जिल्हा बदली करायची आहे परंतु ज्या जिल्हा परिषद मधे मला आंतरजिल्हा बदलीने जायचे आहे तिथे अपंग प्रवर्गाची जागा शिल्लक नाही पण खुला प्रवर्गाची जागा रिक्त आहे मग माझ्या आंतरजिल्हा बदली साठी काही अडचण येईल का ?
    अडचण येत असेल तर मी अपंगांचे आरक्षण सोडायला तयार आहे. क्रुपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
    Replies
    1. बदली बाबत आपणास काहीही अडचण यायला नको, कारण पद हे खुल्या प्रवर्गाचे आहे व त्यामध्ये अपंग/माजी सैनिक/महीला/धरणग्रस्त ईत्यादी असते परंतु त्यांचे नावाने पदे नसतात त्यामुळे आपली बदली होवू शकते, बदलीने सामावून घेणे बाबत संबंधीत कार्यालय त्यांचे अधिकार वापरू शकतात. आपण अर्ज करावा.

      Delete
  67. 2005नंतर तिसरे अपत्य असेल आणि education qulification पूर्ण असेल तर senior college ला form टाकू शकतो का?किंवा पर्याय असल्यास मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
    Replies
    1. Sr. College ला अधिकृत कोणतेही पत्र नाही. शासन आदेशानुसार तिसरे अपत्याचे नियम लागू आहे. माहिती घेतली असता अजून पावतो कोणावरही कार्यवाही झाली नाही. संस्थेच्या कालेजवर नेमणूक असेल तर घाबरण्याचे कारण नाही परंतु आपल्या विरुद्ध कोणाचीही अपत्याचे बाबत तक्रार नको.

      Delete
  68. सर एका लिपिक वर्गीय कर्मचा-याकड़े एका विभागाचा कार्यभार जस्तीत जास्त किती वर्ष देता येतो (लेखा / रोखपाल / अस्थापना )
    दर 3 वर्षानी कार्यभार बदल करावा असा काही
    नियम आहे का??

    ReplyDelete
    Replies
    1. बदली अधिनियम 2005 नुसार ३ वर्षानी एकाच विभागात २ बदली कालावधी असे नमुद आहे याचाच अर्थ एका विभागात एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर बदली करणे परंतु हे नियम ढाब्यावर बसविले आहे. अधीकारी त्यांचे सोईप्रमाणे संबंधीताकडुन काम करून घेतात.

      Delete
  69. नमस्कार सर,
    सर एखाद्या कर्मचाऱ्यास आपण वैद्यकीय मंडळापुढे केव्हा सादर करू शकतो? त्यासाठी चा कालवधी कमीतकमी किती दिवस आहे? याबाबत काही नियम किंवा शासन निर्णय असेल तर संदर्भ द्यावा.

    ReplyDelete
  70. 2005नंतर 3अपत्य असेल तर वरिष्ठ महाविद्यालयात नियुक्ती होते का ?

    ReplyDelete
    Replies
    1. Sr. College ला अधिकृत कोणतेही पत्र नाही. शासन आदेशानुसार तिसरे अपत्याचे नियम लागू आहे. माहिती घेतली असता अजून पावतो कोणावरही कार्यवाही झाली नाही. संस्थेच्या कालेजवर नेमणूक असेल तर घाबरण्याचे कारण नाही परंतु आपल्या विरुद्ध कोणाचीही अपत्याचे बाबत तक्रार नको.

      Delete
  71. सर नमस्कार
    माझ्या चुलत भावाच्या वडिलांचे निधन 2015 साली झाले. ते PWD विभागात चालक म्हणून कार्यरत होते. त्यानी रितसर 1 वर्षाच्या आत अनुकम्पा बाबत अर्ज दाखल केला. त्यानी नगर पालिकेचा वारस प्रमाणपत्र वरिष्ठ कार्यालयात सादर केला तर तीन अपत्य प्रकरणात त्यांना अपात्र ठरविन्यात आले आहे.. काही आशा आहे का अनुकंपात समावेश होण्यासाठी??

    ReplyDelete
    Replies
    1. 3 रे मुल हे दिनांक 31/12/2001 नंतर असल्यास अनुकंपा करीता पात्र राहणार नाही.

      Delete
  72. नमस्कार सर कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत वर्ग ३ च्या कर्मचार्याची पदोन्नती ने बदली आदिवासी भागात वरिष्ठ लिपिक या पदावर झाली आहे सदर कर्मचारी यांची वेतन निश्चित एकस्तर वेतन निश्चीती कशी करावी कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
    Replies
    1. प्रथम आपणास कनिष्ठ लिपीक ते वरीष्ठ लिपीकाचे पे फिक्सेशन करावे लागेल नंतर मग एकस्त प्रथम लिपीकाचे पे फिक्सेशन करावे लागेल.

      Delete
  73. सर महसूल विभागात मी कनिष्ठ लिपिक आहे आता माझं अव्वल कारकून म्हणून प्रमोशन झाल्यानंतर मी माझी अव्वल कारकून म्हणून आंतर जिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्यात जाउ शकतो का सर म्हणजे प्रमोशन घेऊन जाऊ शकतो का सर

    ReplyDelete
    Replies
    1. आपण प्रथम अव्वल कारकून ची पदोन्नती घ्यावी व नंतर बदली करीता प्रयत्न करावा. अव्वल कारकून यांची जेष्ठता यादी जर जिल्हा स्तरावर असेल तर आपण बदलुन ज्या जिल्हात जाल तेथे आपण कनिष्ठ रहाल. व आपण पदोन्नती नंतर त्या यादी मध्ये सद्याचे जिल्हात सुद्धा कनिष्ठच रहाल करीता पदोन्नती नंतरच बदली करून घ्या. जर अव्वल कारकुन यांची जेष्ठता जर शासनस्तरावर असेल तर मग काहीच अडचण राहणार नाही.

      Delete
  74. वरीष्ठ लिपीक ग्रेड पे-2400 हे त्याचा पेक्शा वरीष्ठ अधीकारी ग्रेड पे-4300 यांची प्राथमीक चकशी करू शकतात का....नियम मिऴावा

    ReplyDelete
    Replies
    1. विभागीय चौकशी नियमपुस्तीका 1991 मधील नियम 3.2 पहावे. तसेच 3.16 व 3.19 पहावे नेमण्याचे अधिकार सक्षम कार्यालय प्रमुखास असुन ते त्यांचे वतीने दुसऱ्या अधिकाऱ्यास आदेशीत करू शकतात परंतु तो अधिकारी चौकशी ज्यांचे विरूद्ध आहे त्यांचे पेक्षा वरिष्ठ असला पाहीजे. नाहीतर असे निहमबाह्य असेल. तसेच निलंबन कालावधी हा निलंबनाचे आदेशापासुन ग्राह्य असते दोषारोप दाखल झालेल्या तारखेपासुन नसते.

      Delete
  75. सर आम्ही दिनांक २१-०५-२०१५ रोजी शासकीय सेवेत रुजू झालो आहे आमची वेतन वाढ थांबविण्यात आली आहे कारण असे कि आम्ही अजून परिविक्षाधीन कालावधी मध्ये आहे तसंच रुजू दिनांक नंतर २ वर्षांनी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा घेण्यात आली आहे परिविक्षाधीन कालावधी २ वर्षांसाठी आदेशामध्ये नमूद आहे तर आम्हाला वेतन वाढ मिळू शकते का मार्गदर्शन होणेस विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. परीविक्षाधीन कालावधी हा २ वर्षाचा असतांना पहील्या वर्षाची वेतनवाढ मंजुर करता येते, परंतु आपले कार्यालयाने मंजुर केली नाही तरी काही हरकत नाही. जेव्हा आपला परीविक्षाधीन कालावधी पुर्ण होईल त्यानंतर आपल्या सर्व वेतनवाढी मंजुर करण्यात येईल. येथे आपणास असे सुचवू शकतो की, आपण वेळोवेळी कार्यालयाशी पत्रव्यवहार करावा. २ वर्षात विभागीय /अर्हता परीक्षेचे आयोजन केले नाही. अशा आशेचा पत्रव्यवहार करावा.शासन निर्णय मध्ये Index मध्ये परीविक्षाधीन कालावधीचे शासन निर्णय पहावे.

      Delete
  76. सर शासकीय कामात एखाद्या केस मध्ये गुन्हा दाखल करावयाचे असल्यास राजपत्रित अधिकारी मार्फतच करावे या बाबत काही नियम आहे का कृपया मार्गदर्शन मिळणेस विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. कार्यालयाचा कार्यालय प्रमुख यांचे अखत्यारीत कार्यालय असल्यामुळे ते किंवा त्यांचे आदेशानुसार कोणताही अधिकारी गुन्हा दाखल करू शकतो. नियम शोधून सांगण्याचा प्रयत्न करील.

      Delete
    2. कनिष्ठ लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक यांना प्राधिकृत करून गुन्हा नोंद करता येईल का जर नाही तर त्याचा काही नियम असेल तर कृपया कळवावे हि नम्र विनंती

      Delete
  77. एकस्तर चा लाभ घेत असताना 12 वर्ष सेवा झाल्या नंतर कालबद्ध पदोन्नती योजनेचा लाभ घेता येतो का ?

    ReplyDelete
    Replies
    1. नाही. एकस्तर व आश्वासति प्रगती योजना हया मुळ पदावर असतांना वरील पदांची वेतन श्रेणी मीळते. परंतु आपणास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर करून घ्यावा लागेल व सेवापुस्तकात नोंद घ्यावी लागेल म्हणजे जेव्हा आपण बदलीने दुसरीकडे जाल तेव्हा कपात होणार नाही.

      Delete
  78. नमस्कार सर, जर एखाद्या कर्मचाऱ्याला 06/1990 पासून नजरचुकीने आश्वासित प्रगती योजनचेा लाभ दिला असेल परंतू त्या कर्मचाऱ्याला 01/1991 पासून आश्वासित प्रगती योजना मंजूर झालेली असेल तर त्या कर्मयाऱ्याला अतिप्रदान झालेली रक्कम कोणत्या नियमान्वये किंवा शासन निर्णयान्वये वसुल करता येते.

    ReplyDelete
  79. आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करताना कर्मचारी 12 वर्षे पूर्ण करीत आहे, अर्हता परिक्षा उर्तीण झाला आहे. तथापि जात वैदयता प्रमाणपत्र सादर केलेले नाही व त्यानंतर जात वैदयता प्रमाणपत्र सादर करीत असेल तर त्यास लाभ कोणत्या तारखेस मंजूर करावा.

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार सर
      त्याबाबतचे शासन परिपत्रक असल्यास कृपया त्याबाबत माहिती दयावी

      Delete
  80. नमस्कार सर
    आश्वासित प्रगती योजने मध्ये पहिला लाभ मंजूर केला आहे मात्र दुसरा लाभ मंजूर करतेवेळी जात पडताळणी घेणे आवश्यक आहे का?

    ReplyDelete
    Replies
    1. होय, पदोन्नतीस जे नियम आहे ते सर्व आश्वासित प्रगती योजनेस लागु होतात.

      Delete
  81. लाभ मंजूर करताना जात वैदयता प्रमाणपत्राच्या दिनांकापासून दयायचा कि अर्हता परीक्षेला/12 वर्षाला दयावा

    ReplyDelete
    Replies
    1. ज्या तारखेला तिनही बाबी पुर्ण होतात तेव्हा आश्वासित प्रगती योजना लागु करावी. परंतु जर VALIDITY उशीरा मिळाली तरी त्यांना १२ वर्ष पुर्ण होतात तेव्हा द्यावे, तसेच त्यांना १२ वर्ष पुर्ण झाले असेल परंतु परीक्षा १४ व्या वर्षी उत्तीर्ण झाले असल्यास १४ व्या वर्षी परीक्षेच्या शेवटच्या दिवसानंतरच्या दिवशी आश्वासति प्रगती योजना मंजुर करावी.

      Delete
    2. धन्यवाद साहेब
      प्रस्तुत प्रकरणी शासन निर्णय असल्यास त्याबाबत मार्गदर्शन मिळणेस विनंती आहे

      Delete
  82. मी जलसंपदा विभागात दप्तर कारकून या पदावर कार्यरत आहे. मी कोषागार विभागाकडून घेण्यात येणारी (लिपीक वर्गीय) प्रवेशोत्तर परिक्षा देऊ शकतो का

    ReplyDelete
    Replies
    1. आपणास आपल्या विभागातील निम्न श्रेणी कनिष्ठ लिपीकाची परीक्षा असेल व ती आपण उत्तीर्ण केली असल्यास बसु शकता अथवा नाही. आपणास विभागी परीक्षा नेसेल तेव्हा या बाबत आपण लेखा व कोषागारे मंत्रालय, मुबई यांना या बाबत विचारणा करावी.

      Delete
  83. सर सेवार्थ मध्ये एक कर्मचारी दोन वेळा दिसत आहे.
    व DA फरक देण्यासाठी opens hot nahi

    ReplyDelete
    Replies
    1. सेवार्थ मध्ये २ वेळा दिसतो याचा अर्थ दोन मध्ये स्पेलींगचा फरक करून असे केलेले दिसते, हा कर्मचारी पुर्वी दुसऱ्या विभागात कार्यरत होता व त्यांनी राजीनामा दिला असेल, असो, BILL GROUP मधुन एकाला कमी करून पहावे. किंवा माहीती एकाचीच भरावी व ते नेहमीसाठी लक्षात ठेवावे. व सेवार्थ मुंबई यांना E-MAIL करून या बाबत कळवावे.
      आपण प्रथम DDO LOGIN ने D.A.ARRERSE ला टीक करावे नंतरच ते दिसेल, तेथे टिक असल्यास ASST मध्ये त्या कर्मचाऱ्याचे D.A.ARRESRS मध्ये टिक करावी.

      Delete
  84. पुणे महानगरपालिका-बिगारी पदावर नियुक्त झालेल्या सेवकास १२ वर्षे सतत सेवेच्या कालावधीत एकूण तीन वेळा तीन ते सहा महिने कालावधीसाठी मिक्सर चालक पदावर हंगामी स्वरुपात पदोन्नती दिली आहे आणि पुन्हा बिगारी पदावर पदावनत केले आहे. अशा स्थितीत बिगारी पदावर १२ वर्षे सतत सेवा गृहित धरून आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करता येईल का? असल्यास त्यास आधार कोणत्या नियमाचा घ्यावा. कृपया मार्गदर्शन मिळावे.

    ReplyDelete
    Replies
    1. होय, मिळणार, आपण बिगर पदावर 12 वर्ष सेवा केल्यामुळे त्या पदाची आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळतो.

      Delete
  85. नमस्कार सर
    एकादया कर्मचा-या सेवेत समावून घेतल्यावर 04 वर्षामध्ये आरक्षणाचा लाभ देवून पदोन्नती दिली असेल, परंतु त्या कर्मचा-याचे जात वैदयता प्रमाणपत्र अनव्हॅलिड ठरल्यामुळे त्याला 04 वर्षांनी पुन्हा पदावनत केले असेल तेंव्हा त्याला अदा करण्यात आलेले पदोन्नतीच्या वेतनाची रक्कम वसूल करण्यात यावी अगर कसे? आश्वासित प्रगती योजने मध्ये लाभ देताना त्यांची पदोन्नती पदावरील 04 वर्षाची सेवा कनिष्ठ पदावर गणन्यात यावी कि, वरिष्ठ पदावर गणन्यात यावी.

    ReplyDelete
    Replies
    1. येथे पदोन्नती दिली व ती जात वैधता नसल्यामुळे पदान्नवत केले तेव्हा त्या कर्मचाऱ्याने पदोन्नतीच्या पदाचे काम केल्यामुळे त्यांची कोणत्याही प्रकारची वसुली होणार नाही. सदर कर्मचाऱ्यास पदोन्नती मिळाली नाही असे समजुन तो जेष्ठता यादीत राहील. सदर कर्मचाऱ्यास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार नाही.

      Delete
  86. वैद्यकीय देयक बाबत स्थानिक खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्याने परराज्यातल्या खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्याकडे उपचारासाठी सुचविले असल्यास वैद्यकीय देयक मंजूर करता येईल काय मार्गदर्शन मिळावे (सदर देयक हे कर्मचाऱ्याचे मुलाचे आहे व कर्मचाऱ्याने सदर कालावधी मध्ये रजा घेतली आहे)

    ReplyDelete
    Replies
    1. परराज्यात वैद्यकिय ईलाजाची प्रतीपुर्ती होत नाही. जर पाहीजे असेल तर आपला प्रस्ताव शासनास सादर करावा लागेल, तसेच या प्रस्तावासोबत सदरचा ईलाज हा महाराष्ट्रात होत नसल्याबाबत मुबईतीचा दवाखान्यातील प्रमाणपत्र हवे, टाटा किंवा ईतर शासकीय जो आजार कर्मचाऱ्यास आहे त्या आजाराचे ईलाज होत नाही असे शासकिय रुग्णालय.

      Delete
  87. एक कर्मचारी यांची पदोन्नती दि.15.12.2005रोजी झाली असून ते पदोन्नतीच्या पदावर 20.12.2005 रोजी हजर झाले आहेत. पंरतु त्यांनी त्यावेळी वेतनवाढीच्या दिनांकापासून वेतन निश्चित करण्याचा विकल्प दिल्याने त्यांचीवेतन निश्चिती दि.01.05.2006 पासून करण्यात आली. परंतु त्यानंतर तीन वर्षानंतर सहावा वेतन आयोग लागू झाल्याने वेळ वेतन आयोगाच्या तरतुदी नुसार त्याचे नुकसान होत असल्याने विकल्प बदल करण्याची तरतूद आहे काय?

    ReplyDelete
    Replies
    1. नियम १२ नुसार लाभ प्रदान करता येईल. येथे विकल्प देण्याची आवशक्ता नाही. या बाबत आपण वेतन पडताळणी पथक यांचेशी चर्चा करावी व त्यांचे मार्गदर्शनानुसार कार्यवाही करावी. कारण आपण येथे जो विकल्प दिला आहे तो ५ व्या वेतननानुसार दिला आहे. त्यामुळे तो विकल्प योग्य आहे, परंतु 1.1.2006 रोजी वेतन आयोग लागल्यामुळे व पदोन्नती ही 1.1.2006 पुर्वी मिळाल्यामुळे नियम १२ नुसार आपली वेतन निश्चिती होणे अपेक्षीत आहे.

      Delete
  88. 2005 छोटे कुटुंब महाराष्ट्र शासन निर्णय बदल मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  89. NAMSKAR SIR. MAJI PATNI CHIEF OFFICER CLASS 2 YA PADAVAR 8 YEAR PASUN KARARAT AAHE (SADHYA NASIK MUNCIPAL CORPORATION) TICHA PAYMENT MADHUN GIS CHE PAISE CUT HOT NAHI, AATA GIS CHI CUTTING KARNYASATHI KAY KARAVE LAGEL.

    ReplyDelete
    Replies
    1. काही हरकत नाही. सेवेत रूजू होवून ८ वर्ष झाले परंतु गट विमा योजनेंतर्गत कपात केली नाही, तरी ८ वर्षाआधी ते ज्या गटात उदा. अ ब क ड या मध्ये ज्या ग्रुप मध्ये असेल त्याची तेव्हापासुनची वर्गणी कपात करण्यास सांगावी. जसे समजा 2010 ला लागले असे समजुन क करीता 120, ब करीता 480 व अ करिता 960 या प्रमाणे मासीक वर्गणी कपात करून त्यावरील व्याजासह रक्कम ठराविक हप्पत्यामध्ये कपात करण्याबाबतचा अर्ज कार्यालयास सादर करावा. जर ते जुन्या तारखेपासुन कपात करण्यास नकार देत असेल तर 01/01/2018 पासुन त्यांना गट विमा योजनेचे सदस्यत्व व मासीक कपात करण्यास सांगावी. आज पासुन जरी सभासत्व मिळाले तरी आपले काही नुकसान होणार नाही. सेवा संपतांना कपात केलेल्या रक्कमेच्या अंदाजे 30 टक्केच रक्कम परत मिळते, व काही कमी जास्त झाल्यास गटानुसार संपुर्ण रक्कम मिळते. सदस्यत्व असने अत्यंत आवश्यक आहे. लेखी अर्ज करावा.

      Delete
  90. विभागत कर्मचाऱ्याला 2006 नंतर तिसरे अपत्य असेल तर विभाग प्रमूख ने काय कार्यवाही करता येईल .मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
    Replies
    1. कार्यवाही करण्याबाबत कोणताही शासन निर्णय नाही. फक्त आर्थिक लाभ न देणेबाबत आहे जसे, वैद्यकिय प्रतिपुर्ती, घरबांधणी अग्रिम ईत्यादी. या बाबत आपण शासनास माहीतीच्या अधिकारांतर्गत कार्यवाही बाबत शासन निर्णय आहे काय म्हणून माहीती मागावी.

      Delete
  91. मी जलसंपदा विभागात दप्तर कारकून या पदावर कार्यरत आहे परंतु मला कनिष्ठ
    सहाय्यक या पदावर दिनांक 03/06/2011 च्या शासन निर्णयानुसार पद बदली करून मिळू
    शकेल का.जर संवर्ग बाह्य बदली करता येईल तर त्यासाठी काय करावे लागेल. कनिष्ठ
    सहाय्यक या पदासाठी लागणारी अर्हता माझ्याकडे आहे. व दोन्ही पद हे समकक्ष व
    समान वेतनाचे आहेत. तरी मला मार्गदर्शन करावे ही अर्ज कुठे वा कुणाकडे आणि कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपणास बदली मिळू शकते, आपली नियुक्ती ज्या प्रवर्गातुन झाली असेल त्या प्रवार्गाचे पद जर …... या संवर्गात ते खाली असावयास पाहीजे, रिक्त् असल्यास आपली बदली होवू शकते.
      सदरचे संवर्ग बदली प्रकरणी जर आपण मंत्रालयातुन मंजुर करून घेतले तर फार चांगले होईल, आपले कार्यालय आपणास सहकार्य करणार नाही.

      Delete
  92. नमस्कार सर
    आपण दिनांक 07 सप्टेंबर 2018 रोजी आश्वासित प्रगती योजने अंतर्गत लाभ देणेकामी माहिती दिली आहे. त्याबाबतचे शासन परिपत्रक मिळणेस विनंती आहे.

    ReplyDelete
  93. सर, मी कृषि उत्पन्न बाजार समितीचा कर्मचारी आहे. आम्हाला सहावा वेतन आयोग लागू असून त्याप्रमाणे वेतन मिळते. या नुसार मला कोणते लाभ मिळतील. तसेच आम्हा कर्मचार्यांना gratuity चा लाभ मिळेल का? व आमची सेवा जेष्ठता यादीस कोणते नियम लागू होतील.

    ReplyDelete
  94. मय्यत कर्मचारी यांनी सेवा पुस्तकात नामनिर्देशन म्हणून फक्त आईचे नाव दाखल आहे. परंतु मृत्यु नंतर त्यांची पत्नी गट विमा व इतर देयकाबाबत मागणी करीत आहे. करीता काय कार्यवाही करावी

    ReplyDelete
    Replies
    1. लग्न झालेल्या कर्मचाऱ्यांचे बाबतीत पत्नी हीच सर्व लाभा करीता पात्र असते, सदर कर्मचारी यांनी त्यांचे नामनिर्देशन बदलवीले नाही त्यामुळे हा प्रसंग उद्दभवला येथे सर्व लाभ पत्नीस मिळेल, त्याकरीता पत्नीकडुन लिगल हिअर प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावेत.

      Delete
  95. सर पोलीस स्टेशन मधुन 2017 ते 2018 या कालावधीत किती अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे याबाबत माहिती मागता येईल का RTI च्या माध्यमातुन

    ReplyDelete
    Replies
    1. होय मागता येईल, परंतु ती माहीती तीसऱ्या व्यक्तीची नको, किंवा ती माहीती जन हीताची हवी किंवा वैयक्तीक हवी.

      Delete
  96. नमस्कार सर, माझ्या मुळ गावी (स्वग्राम) ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक असुन गावी मतदार यादीत माझे नाव असून मी दुसर्‍या जिल्ह्यातील आस्थापनेवर नोकरीला आहे तरी मला माझा मतदानाचा हक्क बसवण्यासाठी पगारी सुटी कार्यालयाकडून मिळेल का? व कशी? त्यासाठी कोणता शासन निर्णय, अधिसूचना वा काही नियम असेल तर त्याचा संदर्भ कळवा. धन्यवाद !

    ReplyDelete
    Replies
    1. नाही. शासकिय सुट्टी जर शासनाने जाहीर केली असेल तरच आपणास कार्यालयाकडुन सुट्टी मीळेल अथवा नाही. आपण नैमित्तीक रजा टाकुन मतदानास जावू शकता.

      Delete
  97. नमस्कार सर,मी एक माजी सेैनिक असुन
    सर ९/०२/२०१७ ते २४/०८/२०१८ पर्यंत महसूल विभागात लिपिक(gp-१९००/-) पदावर कार्यरत होतो व मी दु. नि. पदासाठि ९/०२/२०१७ अगोदरच अर्ज केलेबाबत हजर होताना लिखित कळवले होते , पुढे तिथे सेैन्य सेवेप्रमाणे वेतन निश्चित करुन घेतले (शासनाच्या G.R.प्रमाणे) व एक encreement(२०१८ चे)मिळाले ,आता मी राज्य उत्पादन शुल्क विभागात दुु्य्यम निरीक्षक (gp-३५००/-)या पदावर २७/०९/२०१८ पासून सेवेत आहे.त्यामध्ये मला वेतन निश्चिति परत एकदा करावी लागेल का व महसुूल च्या LPC नेच रा.उ . शु.वि भागात वेतन निघेल का कसे व मला सेवा जोडून मिळेल का? आणि सेवा जोडून मिळाल्यास मला त्याचे फायदे काय काय होतील? या विभागात माझी जेष्ठता mpsc च्या मेरीटप्रमाणे आहे त्यामध्ये तिकडच्या कार्यालातील सेवेमुळे मला सेवाजेष्ठतामध्ये त्याचा लाभ होऊ शकेल का? कृपया मार्गदर्शन मिळावे.

    ReplyDelete
    Replies
    1. 1.आपला 27/09/2018 रोजी 8920+3500 = 12420 वर फिक्त होणार आहात, आपण सैनिक सेवात असतांनाचा आपले अंतिम वेतन हे जर या पेक्षा जास्त असेल तर आपणास फायदा होईल. अन्यथा नाही.
      2. जर आपणास आधीच्या कार्यालयाने कार्यमुक्त केले व सेवापुस्तक नविन विभागाकडे हस्तांतरीत केले तर आपणास सर्व फायदे मिळेल. परंतु त्यांनी जर आपणास राजीनामा देण्याबाबत निर्देशीत केले असल्यास मग अडचण निर्माण होईल.
      3. आपणास सेवा जेष्ठतेचा लाभ मिळणार नाही.

      Delete
  98. सर, कनिष्ठ सहा या पदावर कर्मचारी सहावे वेतन आयोग मध्ये प्रथम रुजू झाल्यावर त्या कर्मचाऱ्याचे एकस्तर वेतन श्रेणी मध्ये वेतन किती रु. वर निश्चित होईल?कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती। कारण स्थानिक लेखा परीक्षण ने ५८३० + २४०० असा आक्षेप घेतलेला आहे.
    एकस्तर बाबतीत कनिष्ठ सहाय्यकाचे वेतन 5830/- + 1900 यावर ३% ची एक वेतनवाढ व ग्रेड पे २४००/- प्रमाणे या बाबतीत शासन निर्णय/परिपत्रक असल्यास मिळणेस विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. एकस्तर बाबतीत कनिष्ठ सहाय्यकाचे वेतन 5830/- + 1900 यावर ३% ची एक वेतनवाढ व ग्रेड पे २४००/- एकस्तर ही पदोन्नती ज्या प्रमाणे होते त्या प्रमाणे करावे लागते.

      Delete
  99. सर माझा प्रश्‍न असा आहे की, नियुक्‍ती प्राधिकारी यांना कर्मचारी यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्‍याचा अधिकार आहेत. सर जिल्‍हाधिकारी साहेब नियुक्‍ती प्राधिकारी असतील तर तहसिलदार यांना त्‍यांच्‍या कार्यालयात काम करीत असलेल्‍या लिपीकाची वार्षिक वेतनवाढ रोखण्‍याचे अधिकार आहेत काय? असल्‍यास कोणत्‍या नियमान्‍वये कार्यवाही केली जाते. कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. वेतनवाढीचा अधिकार हा कार्यालय / विभाग प्रमुखास आहे, (नियुक्ती प्राधिकारास नाही परंतु ते कार्यालय प्रमुख या नात्याने) तहसिलदार हे कार्यालय प्रमुख असल्यामुळे त्यांनांच वेतनवाढ मंजुर करण्याचा व ते रोखण्याचा अधीकार आहे, विभागी चौकशी बाबतीत ते जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठवून वेतनवाढ रोखणे बाबत शिफारस करू शकतात.

      Delete
  100. छोटे कुटुंब 2005शासन नियमात मुदा क्र 6नुसार कोणाल सूट भेटू शकते ?मार्गदर्शन करावे ही विनंती .

    ReplyDelete
    Replies
    1. छोटे कुटूंब या शासन निर्णयानुसार नियम ६ हा नव्याने सेवेत लागणाऱ्या कर्मचाऱ्यास आहे, जसे एखादयाला ३ अपत्य आहे तो, शासकीय सेवा मिळवीण्यास अपात्र होतो, परंतु एखादया प्रसंगी पोलीस शिपाई हा नकश्लवादी यांचे कडुन मारला गेला व त्यांना तीन अपत्य आहे त्या प्रसंगी त्यांचे पत्नीस नियम ६ नुसार नियमात शिथीलता देता येते.

      Delete
  101. सर नमस्कार,
    एखादा व्यक्ती VRS घेतेवेळी त्याला देय असलेली Gratuity कशी काढतात ? कमाल Gratuity किती मिळू शकते व ती tax free असते कां ?

    ReplyDelete
    Replies
    1. कृपया आपण ब्लॉग वरीत पेन्शन या टॅब वर जावून मला पेन्शन किती मीळले यावर क्लिक करावे व माहीती भरावी आपणास सर्व प्रदाने दिसुन येतील व ते कशे दिले जाते ते आपण फॉरमुला पाहील्यास दिसुन येईल, पेन्शनर्सचे सर्व प्रदाने टॅक्स फ्रि असताt.

      Delete
  102. नमस्कार सर,
    श्री.अबक यांची उपलेखापाल या पदावर दि.18.8.21994 रोजी नियुक्ती झाली. त्यांना दि.15.5.2008 रोजी वरिष्ठ पद ‘लेखा अधिकारी’ या पदावर दि.15.5.2008 रोजी लेखा अधिकारी या पदावर तात्पुरती पदोन्नती दिली. तदनंतर सदर पदावर पदोन्नती दिनांक 23.09.2013 रोजी कायमस्वरुपी करण्यात आली. लेखा अधिकारी या पदावरील कर्मचारी 6 वर्षाचा अनुभव धारण करीत असल्यास त्यास सहायक मुख्य लेखा अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात येते.
    तरी श्री. अबक यांना ‘सहायक मुख्य लेखा अधिकारी’ या पदावर पदोन्नतीकरीता त्यांचा तात्पुरती पदोन्नती दिनांक 15.5.2008 पासूनचा अनुभव किंवा कायमस्वरुपी पदोन्नती दिनांक 23.9.2013 पासूनचा अनुभव यापैकी कोणता अनुभव ग्राह्य धरता येईल याबाबत कृपया मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
    Replies
    1. सामान्य प्रशासन विभाग, दिनांक 21/06/1982 मधील नियम ४ -1 नुसार पदावर अखंडीत सेवा झाली असल्यामुळे तसेच नियम 3-क नुसार पात्र आहेत त्यामुळे लेखा अधिकारी यांनी दिनांक 15/05/2008 पासुन सतत सेवा केली आहे व त्यांना त्या दरम्यान पदान्नत केले नसल्यामुळे त्यांची त्या पदावर सतत सेवा झालेली आहे, तात्पुरती व नियमीत पदोन्नती ही कार्यालयाची Adjustment असते, त्यामुळे ते दिनांक 15/05/2008 पासुन पदोन्नतीस पात्र होईल तसेच त्यांचे नाव सेवाजेष्ठता यादीत दिनांक 15/05/2008 पासुनच येईल. परंतु आणखी काही शासन निर्णय आहे काय ते पाहावेत.

      Delete
    2. परंतु नियम ४ -१ मधील परिच्छेद ३ मध्ये अभावित नेमणूक म्हटले आहे याचा अर्थ तातपूर्ती नेमणूक असा पण होतो व त्याबद्दल नियम 3 फ नुसार अस्थायी नेमणूक होते, त्यामुळे दिनांक 23/09/13 पासुन पात्र होउू शकतात, येथे जर सेवाजेष्ठतेमध्ये दिनांक 15/08/2008 घेतले असल्यास मग पदोन्नती मिळू शकते.

      Delete
  103. अनुरेखक पदावर पदोन्नतीसाठी अर्हता काय लागते
    Architectural Draughtman 2 वर्षे मुदतीचा कोर्स चालतो का

    ReplyDelete
    Replies
    1. https://drive.google.com/file/d/13N9C2ipy8BViO3-tinFvh69VprBTcbuQ/view?usp=sharing

      Delete
  104. शासन निर्णय नुसार आपसी विनंति बदली झाल्या नंतर रद्द होते किंवा नाही

    ReplyDelete
    Replies
    1. आपली विनंती बदली असल्यामुळे व कार्यालयाने जर कार्यमुक्त केले नाही तर चालू शकते, परंतु कार्यालयाने आपणास कार्यमुक्त केल्यास मग आपणास रूजू व्हावेच लागेल किंवा जर जायचे नसेल तर तो आदेश रद्द करून घ्यावा लागेल.

      Delete
  105. नमस्कार सर,
    प्राधिकरणाने लघुटंकलेखक (गट-क) या पदाकरिता जाहिरात दिली होती. सदर पदाकरिता 80 श.प्र.मि. वेगाचे लघुलेखन व 40 श.प्र.मि. वेगाचे टंकलेखनाचे शासकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जाहिरातीत समांतर आरक्षणानुसार माजी सैनिकांकरिता 1 पद राखीव ठेवले आहे. प्रश्न असा की, माजी सैनिकांकडून 80 श.प्र.मि. वेगाचे लघुलेखन व 40 श.प्र.मि. वेगाचे टंकलेखनाचे शासकीय प्रमाणपत्र नियुक्तीवेळी घेणे बंधनकारक आहे का ? किंवा माजी सैनिकांना सदर प्रमाणपत्र सादर करण्यात नियुक्तीपासून किती वर्षाच्या आत सादर करण्याचे सवलत आहे काय ? असल्यास जीआर चा दिनांक काय आहे. कृपया याबाबत मार्गदर्शन व्हावे, ही विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. लघुटंकलेखक या पदाकरीता पात्रता असेल तरच त्या परीक्षेस बसता येते, फक्त कनिष्ठ लिपीक टंकलेखक या पदाकरीता माजी सैनिकास २ वर्षाचे आत तसेच अनुकंपा व पदोन्नतीने टंकलेखक ची परीक्षा २ वर्षात उत्तीर्ण व्हावी लागते. येथे आपणास परीक्षा पास असणे गरजेचे आहे, कारण येथे लघुटंकलेखनाची परीक्षा सुद्धा घेतली जाते.

      Delete
  106. सर नमस्कार, मी सुजित पारवे, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे दि.२५. ११. २०१३ पासून कार्यरत आहे. मी सध्या कर्करोगाने ग्रस्त आहे. याचे उपचार रुबी हॉल क्लिनिक येथे चालू आहेत. मी बदलीसाठी शासनास अर्ज सादर केला आहे व माझ्या वरील परिस्थितीबाबत कळविले आहे. तरीही बदली झाली नाही. कृपया दि. ३. ६. २०११ च्या शासन निर्णयाव्यतिरिक्त याबाबत काही शासन निर्णय असल्यास मार्गदर्शन व्हावे, हि विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक 3.06.2011 पहावे. सदरचे संवर्ग बदली प्रकरणी जर आपण मंत्रालयातुन मंजुर करून घेतले तर फार चांगले होईल, आपले कार्यालय आपणास सहकार्य करणार नाही.

      Delete
    2. आपण आपले कार्यालयातुन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयास आपणास बदलीने सामावून घेता का या बाबत पत्र देण्याची विनंती करावी व पुणे यांनी आपणास बदलीने सामावून घेणे बाबत सहमती दिली तर आपली बदली होवू शकते, येथे न्यायालय अशा प्रकरणी काहीही करणार नाही. त्यामुळे बदली बाबत आपण स्वताच अधिकाऱ्यांना भेटून काम काढून घ्यावेत. प्रथम आपले जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना ना हरकत प्रमाणपत्र मागावे.

      Delete
    3. jilhadhikari pune he badli ne samavun ghenyas tayar ahet. yayabt tyanchi NOC ahe. tasech jilhadhikari beed he dekhil karyamukt karnyas tayar ahet. donhi jilhadhikari yanche NOC ahet.

      Delete
    4. मग काहीच अडचण येणार नाही. आपले जिल्हाधिकारी यांनी आपली बदली पुणे येथे करून पुणे जिल्हाधिकारी यांनी सविस्तर बदली आदेश काढणेच बाकी आहे. आपणाकडुन करावयाची कार्यवाही पुर्ण झाली असुन फक्त कार्यालयाने आदेश काढणेच बाकी आहे. पुढील प्रश्न प्रश्नोत्तरी ३ मध्ये टाकावोत.

      Delete
  107. शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक 3.06.2011 व 09/04/2018 चा पहावा.

    ReplyDelete

Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999

Pmo sep