Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे

प्रश्नोत्तरी



येथे प्रश्न टाकू नये. या टॅबची लिमीट संपली कृपया प्रश्नोतरी भाग २ मध्ये प्रश्न टाकावेत.
प्रश्न व त्याची उत्तरे करीता कृपया Post a Comment  मध्ये Enter your Comment वर क्लिक करावे.  Comment as Google Account or Anonymous select and publish your comments


प्रश्नोत्तरी मध्ये २०० प्रश्न पुर्ण झाल्यामुळे आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर तेथे देऊ शकत नसल्यामुळे कृपया प्रश्नोत्तरी भाग २ येथे प्रश्न टाकावेत.

307 comments:

  1. श्री. राजुभाऊ
    नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे रविवार आणि सार्वजनिक सुट्टया जोडुन घेता येते. उक्त रजा कालावधी हा ७ दिवसापेक्षा जास्त नसावा उपवादात्मक परिस्थीतीत ही मर्यादा 10 दिवस आहे. सद्यस्थितीत शासन निर्णय उपलब्ध नाही. उपलब्ध झाल्यास तो शासन निर्णय या टॅब मध्ये टाकण्यात येईल.
    ईतरांजवळ असल्यास तो शासन निर्णय कृपया या ब्लॉग वर देण्यात यावा.

    रजेवर जातांना कार्यभार क्षेत्राच्या पलिकडे/ मर्यादेबाहेर दौऱ्यावर जातांना तसेच रजेवर जातांना मुख्यालय सोडण्याची परवानगी नियंत्रण अधिकारी / कार्यालय प्रमुखांची घेणे आवश्यक आहे. शासन परिपत्रक सा.प्र.विी. एसआव्ही-1089/प्र.क्र.10/बारा दिनांक 5 जुन 1989

    ReplyDelete
  2. नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे रविवार आणि सार्वजनिक सुट्टया जोडुन घेता येते, तसेच नैमित्तिक रजांच्यामध्ये येणाऱ्या एक किंवा अधिक सुट्टया नैमित्तिक रजांना जोडुन घेता येते.

    ReplyDelete
  3. सर,
    नैमित्तिक रजे संदर्भात शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 20 मार्च 1981 व दिनांक 24 मार्च 1982 उपलब्ध आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! सर, कृपया puriakl@gmail.com या मेल वर शासन निर्णय पाठविण्यात यावे ही विनंती.

      Delete
  4. प्रमोद भाऊ नमस्कार,
    शासकीय प्रचलीत नियमानुसार अनुकंपा तत्वावर वडिलांना नियुक्ती दिलेली आहे. व अनुकंपा तत्वावर नियुक्ती प्रदान केलेला कर्मचारी दिवंगत झाल्यानंतर त्यांच्या पाल्य अथवा वारसास पुन्हा अनुकंपा तत्वावर नौकरी देता येते किंवा कसे?

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मॅडम,
      शासकीय सेवेत असतांना, दिवंगत/गंभिर आजार/बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नेमणूक देण्याकरीता अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची योजना शासन निर्णय दिनांक 23/04/1976 नुसार अंमलात आलेली आहे. एका शासकिय कर्मचाऱ्याकरीता एकालाच अनुकंपातत्वावर नोकरी मिळते, त्यामुळे जो कर्मचारी अनुकंपा वर नोकरीवर लागला असेल त्याचे भाऊ /बहीन/आई/यांना पुन्हा अनुकंपा तत्तवावर नोकरी मिळत नाही.
      तथापी जो कर्मचारी अनुकंपा तत्वानुसार नियुक्त झाला व त्याचाही शासकिय सेवेत असतांना मुत्यृ झाला तर त्याचे पत्नी/मुलगा/मुलगी यांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याकरीता अर्ज करू शकतात, अर्ज न करण्याबाबत शासनाचा कोणताही निर्णय निघालेला नाही. त्यामुळे त्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळु शकते.

      Delete
  5. प्रमोद भाऊ नमस्कार,
    शासकीय प्रचलीत नियमानुसार कर्मचारी दिवंगत झाल्यानंतर त्यांच्या पात्र पाल्य अथवा वारसांना अनुकंपा तत्वावर नौकरी देता येते व त्याबाबतचे विहीत अर्ज आवश्यक दस्ताएवजासह 1 वर्षाचे आत सादर करावयाचा आहे. परंतु पाल्य अथवा वारस अज्ञान असल्यास काय करता येईल कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. शासन निर्णय सा.प्र.वि. दिनांक 11/09/1996 नुसार अज्ञान वारसदाराचे बाबतीत तो सज्ञान झाल्यानंतर त्याने एका वर्षाच्या आत नोकरीसाठी अनुकंपातत्वावर मिळण्याकरीता अर्ज करणे गरजेचे आहे. त्यामुळे सज्ञान झाल्यानंतर अर्ज केल्यास तो स्विकारणे क्रमप्राप्त आहे.
      या करीता शासन निर्णय मधील भाग ११ ते १७ मधील भाग १७ पहावा, येथे सर्व अनुकंपा तत्वाचे शासन निर्णय जतन केलेले आहे कृपया त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद!

      Delete
  6. प्रमोदभाऊ नमस्कार
    समावेशीत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांची मागील सेवा विचारत घेवून कनिष्ठ अभियंता पदाचा आश्वासित प्रगती योजनचा लाभ प्रदान करता येईल किंवा नाही.
    प्रदान करता येत असल्यास याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश असलेले शासन निर्णय किंवा परिपत्रके असल्यास कृपया कळविण्यात यावे, हि विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. या बाबत ग्राम विकास विभागाचा दिनांक 28 जुलै 2014 चा शासन निर्णय पहावा व त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागात त्याच्या प्रमाणे कार्यवाही करता येत काय या बाबत प्रकरण तपासावे. त्याचा सांकेताक 201407241737289220

      Delete
  7. सर, मी वर्ग-3 चा कर्मचारी असून माझी सेवा 12 वेर्षे पूर्ण झाली आहे. मला भ.नि.नि. मधून ना-परतावा रक्कम काढावयाची आहे ती मिळेल का ? किती रक्कम काढता येऊ शकते ? पूर्वी मी भ.नि.नि. मधून परतावा रक्कम काढलेली असून त्याचे 36 हप्ते ठरलेले आहेत व 12 हप्ते फेडलेले आहेत आहेत. मला अत्यावश्यक कारणासाठी भ.नि.नि. मधून ना-परतावा रक्कम काढावयाची आहे त्यासाठी मार्गदर्शन करावे ही विनंती.

    ReplyDelete
  8. एका कर्माचा-याचे सेवार्थ प्रणालीमध्ये फ़क्त नाव व जन्मतारीखेत फ़क्त महीना चुकीचा आहे....दुरुस्त करण्यासाठी काय करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण कृपया संबंधीत कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकाच्या पहील्या पानाची छायांकित प्रत व एक अर्ज लेखा व कोषागारे, प्रशासकीय इमारत, मुंबई यांचे नावे लिहून सदरचा अर्ज ई-मेल द्वारे पाठवावा. परंतु सदरचे काम स्वत: किंवा संबंधीतांनी मुबई येथे जावुनच करावे. ई मेल करीता सेवार्थ Contact us मधुन ईमेल निवडावा.

      Delete
  9. sir, mala shashkiya sevet 4 varsh ekach thikani purna zale aahet mala badli karayachi aahe karita kay procedure aahe

    ReplyDelete
  10. sir mala central department or other department madhe pariksha dyachi aslyas current department chi parmission ghenychi awashkta aahe ka . aslyas kashi ghyavi?

    ReplyDelete
    Replies
    1. होय,
      शासन परीपत्रक 22/07/1983 अन्वये आपली चालु सेवा दुस-या विभागात नियुक्ती झाल्यानतंर जोडुन मिळणेकरीता सद्या कार्यरत असलेल्या विभागाची विहीत नमुण्यात परवाणगी घेणे आवश्यक आहे.
      परवाणगी घेण्याचा नमुना अर्थ व सांख्यिकी विभागाच्या संकेतस्थळावर नविन संदेश या विण्डोमध्ये दिला आहे.

      Delete
  11. नमस्‍कार, मी महिला कर्मचारी आहे. मला असे विचारायचे आहे की मला वैदयकिय प्रतिपुर्तीसाठी माझया आईची निवड करायची आहे. त्‍यासाठी मला सेवापुस्‍तकात तशी नोंद घ्‍यावी लागेल काय? किंवा काय कार्यपध्‍दती अवलंबावी लागेल? जेणेकरुन गरज पडल्‍यास मला आईच्‍या औषधोपचारासाठी वैदयकिय परिपुर्ती घेता येईल.

    ReplyDelete
  12. होय कार्यालयास अर्ज दयावा go to vaidhykiy pratipurti tab and go to G.R.11/11/11 and take action

    ReplyDelete
  13. महोदय,
    मी जलसंपदा विभागात दि. 02/01/2015 ते 08/05/2017 पर्यंत सहा. अभि. श्रेणी-2 या पदावर कार्यरत होतो. नंतर स्पर्धा परीक्षे द्वारे माझी निवड सार्वजनिक बांधकाम विभागात सहा. अभि. श्रेणी-2 या पदावर झाली आहे. त्या अनुषंगाने मी जलसंपदा विभागातुन रितसर कार्यमुक्त होऊन सार्वजनिक बांधकाम विभागात रुजु झालो आहे. तरी माझया सेवा नियमीत होईल का ? झालेस तेथील पे ब्रँड येथे घेता येईल का ? या बाबत मार्गदर्शन मिळावे.

    ReplyDelete
  14. होय, सर्व लाभ मिळतात.

    ReplyDelete
  15. नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची तत्पुर्वीची समकक्ष पदावरील नियमित सेवा कालबध्द पदोन्नती / आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी ग्राहय धरण्याबाबत. वित्त विभाग 201301191450418405 19-01-2013

    ReplyDelete
    Replies
    1. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 मधील नियम 21
      महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम 1981 मधील नियम 11

      Delete
    2. नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती 20070707131131001 07-07-2007

      Delete
  16. पदोन्नति करीता हिंदी भाषेतून सूट पाहिजे असल्यास एतदर्थ मंडळ तर्फे घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणेगरजेचे आहे काय? कारण SSC ला माझे हिंदी विषय ऐवजी संस्कृत विषय होता. राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा हिंदी परीक्षा प्रमाणपत्र गृहीत धरण्यात येणार नाही का

    ReplyDelete
    Replies
    1. परंतु शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक 01/12/1984 नुसार जर हिंदी-संस्कृत हा विषय घेवून 50-50 गुणांचा स्वतंत्र हिंन्दी विषय घेऊन जर हिंन्दी 50 गुणांचा विषय घेउुन उत्तीर्ण झााल्यास सुट मिळते.

      Delete
    2. धन्यवाद सर...ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची मात्रभाषा हिंदी आहे त्याना हिंदी भाषेतुन सूट मिळन्याची तरतुद नाही का? असा GR सूद्धा आहे.

      Delete
    3. जे हिन्दी भाषा घेवुन 10 वी उत्तीर्ण आहेत त्यांना हिन्दी भाषेतुन सुट मिळते परंतु मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागेलच.

      Delete
  17. हिन्दी व मराठी हे विषय १०० गुणाचेच असले पाहीजे, हिन्दी भाषा कोठूनही उत्तीर्ण केली तरी ती १०० गुणाची असली म्हणजे सुट मिळू शकते.

    ReplyDelete
  18. सर, नमस्कार,
    एखादा कर्मचारी निलंबित आसतांना. निर्वाह भत्ता कॊणत्या कार्यालयाने काढावा.निलंबित झालेल्या आस्थापणेवर काढावा.की मुख्यालय दिलेल्या कार्यालयाने. क्रपया नियम व कलमासह मार्गदर्शन मिऴावे. ही विनंती. तसेच मुख्यालयी रुजू होण्यासाठी साठी कार्य्मुक्त करणे आवश्यक आहेका?

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद!
      जर एखादा कर्मचारी निलंबित झाला असेल व त्याचे मुखालयामध्ये बदल केला असुन तसे आदेशात नमुद केले असल्यास, त्या कर्मचाऱ्यास संदर्भिय आदेशान्वये त्याची L.P.C. Genrate करावी. व तशी सेवापुस्तकात नोंद घेवुन संबंधीत कार्यालयास पाठवावी. कार्यमुक्त करण्याची आवश्यक्ता नाही. कारण त्यांना त्याआधीच निलंबीत केले असल्या कारणाने तशी गरज नाही. व मुख्यालायाचे कार्यालयास बदली ने त्यांचे कार्यालयात रूजू झाले असे न दाखवता आदेशाप्रमाणे त्यांची नोंद घ्यावी. नियम शोधुन आपणास कळविण्याचा प्रयत्न करील.
      तसेच जर मुख्यालय एकाच अधिकाऱ्याचे अधिपत्यखाली असल्यास जुन्या कार्यालयाने पगार काढू शकता परंतु त्या करीता उपस्थीती अहवाल घेणे आवश्यक आहे तसेच पगार हा महीना संपल्यानंतर काढावा. नियमीत प्रमाणे काढू नये.
      (ज्या कार्यालयात मुख्यालय दिले असेले व तेथे जर पद रिक्त नसेल तेव्हा सेवार्थ प्रणालीतुन देयक Substitute मधुन पगार काढता येऊ शेकते, परंतु Practicaly हे मी केले नाही.)

      Delete
    2. सर आपला आभारी आहे.
      महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्थी ) 1981 चे कलम 22(ई)नुसार निलंबाधिन कालावधितही त्या पदावरील धारणाधिकार कायम राहात असल्याने माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
      तसेच केवळ बदली करण्याच्या उद्देशाने कोणतेही पुरावे नसताना निलंबित केले होते.त्यावर मी सक्षम प्राधिका-याकडे अपिल केले तेव्हा अपिल निर्णय होण्याच्या आधिच ज्या ठिकाणी मुख्यालय दिले होते त्याच ठिकाणी पुन;स्थापित केले.
      पुरावे नसताना निलंबनाचा प्रस्ताव पाठविणारे अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी करता येईलका ?

      Delete
  19. 6/6/2017 च्या अधिसुचनेने लिपीक टंकलेखक पदासाठी सुधारित सेवाप्रवेश नियम लागू केलेत ते जिल्हा परिषद कनिष्ठ सहायक (लिपीक) पदास लागू होतात का

    ReplyDelete
    Replies
    1. होय, अधिसुचनेत सर्व जिल्हापरिषदांचे कार्यकारी अधिकारी यांना याची प्रत आहे तसेच कनिष्ठ लिपीक व कनिष्ठ सहाय्य्क हे पद समतुल्य आहे. या बाबत आपले मंत्रालयीन विभाग स्वतंत्र आदेश काढू शकतात, तसेच भरती प्रकिया ही संपुर्ण महाराष्ट्र पातडीवर होत असत्यामुळे त्यामध्ये त्याबाबत सुचना राहीलच. धन्यवाद!

      Delete
  20. सर मी जि .प मध्ये परिचर या पदावर असुन सर 6/6/2017 च्या अधिसुचनेनुसार लिपीक टंकलेखक पदासाठी सुधारीत सेवाप्रवेश नियम 2017लागू केलेत ते जि. प. कनिष्ठ सहायक पदासाठी लागू होतात परंतु जि. प. प्रशासन म्हणते कि सदर सेवा प्रवेश नियम हे सरळसेवेसाठी आहेत पदोन्नतीसाठी नाही पदोन्नती ही दहावी पासवर होणार परंतू 6/6/2017 च्या अधिसुचनेत स्पष्ट उल्लेख केला आहे कि
    वर्ग ड पदावर तीन वर्ष सेवा पूर्ण पदवीधर व टाइपिंग असेल त्यांना जेष्टता अधिन पाञता या निकषावर पदोन्नती द्यावी असा आदेश असतानाही प्रशासन दहावी पासवाल्याना कसे काय पदोन्नती देउ शकते जेष्टता यादीत माझ्यापुढे 10 जण आहेत मी 11वा आहे ते सर्वजन दहावी पास आहेत (आम्ही सर्वजन सरळसेवेने 2007ला भरती झालो आहे) पदोन्नतिने 10 च जागा भरायच्या आहेत दहावी पासवर पदोन्नती दिल्यास माझी पदोन्नती यावेळेस होणार नाही तरी या संर्दभात काय करावे त्याबाबत मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  21. सरृ नमस्‍कार, मी शासन सेवेत २०११ पासून लिपीक पदावर कार्यरत आहे. मी दिनांक १२ मे व १३ मे २०१६ रोजी सेवाप्रवोशोत्‍तर परीक्षा दुसरी संधी दिली. तिचा निकाल जुलै २०१७ मध्‍ये लागला. व मी पास झाले. या दरम्‍यानच्‍या कालावधीमध्‍ये म्‍हणजे आक्‍टोबर २०१६ रोजी लिपीक पदावरुन वरिष्‍ठ लिपीक अशा पदोन्‍न्‍त्‍या झाल्‍या. परंतु मी पदोन्‍नतीवेळेस जरी परीक्षा दिली तरी निकाल जाहीर न झााल्‍यामुळे माझी पदोन्‍नती झााली नाही. मला कनिष्‍ठ असलेल्‍या व्‍यक्‍तीची पदोन्‍नती झााली. परीक्ष्‍ोचा निकाल उशिराने लागला यात माझा काही दोष नाही. मी तर परीक्षा पास होते फक्‍त निकाल जाहीर झाला नव्‍हता. त्‍यामुळे मला आक्‍टोबर २०१६ पासून मानिव दिनांक घेऊन पदोन्‍नती मागता येईल काय , कृपया मागदर्शन करावे ही विनंती. काही शासन निर्णय असल्‍यास पुरवावा ही विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण दुसऱ्या संधीत परिक्षा पास झाला आहेत. जेव्हा ऑक्टेाबर 2016 ला आपल्यापेक्षा कनिष्ठाची पदोन्नती झाली तेव्हा आपण परीक्षा उत्तीर्ण झाले नव्हते, परंतु जेव्हा एखादया कनिष्ठाची पदोन्नती होते तेव्हा त्याची पदोन्नती कायमची न करता ११ महीन्याकरीता तात्पुरती केली जाते. याचे कारण हे की, जर त्यापेक्षा जेष्ठ कर्मचारी यांनी नंतर जर Cast Validity, Exam, D.Inquiry प्रमाणपत्र सादर केले तर पदोन्नती दिली त्याला पदावन्नत करण्यात येते, त्यामुळे तुम्ही कार्यालयास पत्र दयावे व त्यामध्ये तुमचे म्हणणे स्पष्ट मांडावे. परंतु मानवी दिनांकाची मागणी करू नये ती जर आपली पदोन्नती झाली तेव्हा त्याची मागणी करावी. परंतु ते आपणास लागु नाही. मानवी दिनांकाकरीता शासन निर्णय या टॅबवर भाग 30 पृष्ठ क्र. 397 पहावे.

      Delete
  22. सर मनापासून खुप खुप धन्‍यवाद. आपण सर्व कर्मचा-यासाठी खुप मोठे ज्ञानदानाचे कार्य करत आहात. आपल्‍या वाटचालीस खुप खुप शुभेच्‍या.

    सेवा प्रवोशोत्‍तर परीक्षेच्‍या दुस-या दिवसापासून परीक्षा पास झाल्‍याचे समजले जाते याबाबत काही शासन निर्णय असल्‍यास कृपया कळवावे ही विनंती. खूप खुप आभारी राहीन.

    ReplyDelete
    Replies
    1. yes, शासन सा.प्र.वि. मुबई यांचे दिनांक 10/04/1981

      Delete
  23. मी कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषद येथे कार्यरत असून बि.टेक पदवी केलेली आहे करती पुढे जे पदोन्नती होणार ती शाखा अभियंता म्हणून होणार किंवा साहाय्य अभियंता श्रेणी2 या बद्दल शासन निर्णय कुठला आहे साहेब????

    ReplyDelete
    Replies
    1. येथे आपण कोणती पदवि / पदविका घेतली याचेवर आपली पदोन्नती अबलंबुन नसते. कनिष्ठ अभियंता करीता जी पात्रता आहे त्या पात्रचेनुसारच त्या पदावर नियुक्ती मिळते उच्च शिक्षण घेतले असेल तरी मुळ पात्रताच धरल्या जाते. कनिष्ठ अभियंता यांना ५ वर्षानंतर शाखा अभियंता या पदाचा दर्जा मिळतो, त्यामुळे आपण ५ वर्षानंतर शाखा अभियंता व्हाल. तसेच सहाय्यक अभियंता श्रेणी २ हे पद पदोन्नतीचे नसुन ते नामनिर्देशानुसार भरण्यात येते त्यामुळे या पदावर पदोन्नतीने कोणीही येत नाही.
      कनिष्ठ अभियंता यांना पहीली पदोन्नती ही उप विभागीय अधिकारी म्हणून मिळते तर सहाय्यक अभियंता श्रेणी २ यांना उप अभियंता म्हणुन पदोन्नती मिळते.

      Delete
  24. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  25. सन 2014 च्या जिल्हा परिषद भरती प्रकीयेत एसबीसी-ए या प्रवर्गाकरिता देणेत आलेले आरक्षण व्य्पगत झालेले असल्याने सन 2014 मधील एसबीसी-ए चे पदे खुल्या प्रवर्गातुन गुणवत्ता यादीनुसार भरणे बाबत निर्गमित झालेले शासन निर्णय व शासनपत्र व परिपत्रक/निर्देश यांची माहिती मिळावी.

    ReplyDelete
  26. नमस्कार सर, मी महिला कर्मचारी असून विवाहित आहे . माझे वडील expire झालेले असून माझी आई पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे , मला वैद्यकीय प्रतिपूर्ती साठी सासू सासर्यांची निवड न करता आईची निवड करायची आहे तयासाठी अशा परिस्थितीत मी सेवा पुस्तकात कुटूंबात आईचे नाव टाकू शकते का अथवा सासू सासरे पती व माझी आई या सर्वांचा समावेश करू शकते का कारण सर्वजण माझ्यावर अवलंबून आहेत . कृपया मार्गदर्शन मिळावे . धन्यवाद।

    ReplyDelete
    Replies
    1. शासकिय महिला कर्मचारी / अधिकारी हे वैद्यकिय प्रतिपूर्ती करीता आई- वडील किंवा सासू-सासरे यांच्या पैकी फक्त एकाचीच निवड शासन निर्णय दिनांक 11/11/2011 मधील २ ब प्रमाणे करू शकते. जर आपल्या आईस पेन्शन मिळत असुन मुळ वेतन रूपये 3500/- पेक्षा जास्त असेल तर त्यांना ते देय होणार नाही. अशा वेळी मग सासू-सासरे हे आपल्यावर अवलंबून असल्याबाबत कार्यालयास कळवावे. कार्यालयास अर्ज करून आपल्यावर कोण अवलंबून आहे असे नमुद करून तसे सेवा पुस्तकात नोंद होणे करीता लीहावे व तो अर्ज सांभाळून ठेवावा.

      Delete
    2. आईला कोणत्याही प्रकारची PENSION मिळत नाही.

      Delete
    3. तसेच माझी लहान बहीण हि देखील माझ्यावर अवलंबून आहे.तिचे वय २२ वर्षे असून तिचा वैद्यकीय उपचार सुरु आहे. तिच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती चे देयकाची मागणी करता येईल का

      Delete
    4. Yes, शासन निर्णय दिनांक 11/11/2011 मधील २ ब नुसार आपण आपली अविवाहीत बहीण / घटस्पोटीत बहीन यांचेपण वैद्यकिय प्रतिपूती घेउू शकता. तसे पत्र कार्यालयास द्यावे.

      Delete
  27. सर,मी phc ला क.सहा या पदावर नवीन नियुक्त झालो असून मला एकस्तर वेतन निश्चिती कशी करावी या बाबत ची excel sheet मिळेल का?

    ReplyDelete
    Replies
    1. माझे कडे Excel ची शिट मध्ये वेतन निश्चिती केलेली नाही, परंतु Word मधील फाईल आपणास देत आहे त्या नुसार कार्यवाही योजावी. त्या करीता Excel Word नमुने मध्ये पहावे. व ईतर निश्चितीसाठी तेथे Excel च्या फाईल उपलब्ध आहे.

      Delete
  28. सर मी सध्या कनिष्ठ अभियंता म्हणून औरंगाबाद मध्ये कार्यरत असून माझी सेवेची 5 वर्षे झालेले आहे व मी पुण्यामध्ये पाटस येथे उपविभागीय कार्यालयात विनंती बदली करून घेतलेली आहे ,मंडळ कार्यलयातून त्वरित कार्यमुक्त करण्याचे आदेश आलेले असून मला विभागीय कार्यालयातून 30 नोव्हेंबर ला कार्यमुक्त करणार आहेत परंतु 1 dec 17 रोजी ईद ची सुट्टी असल्याने ,बदली करून घेतलेल्या कार्यालयातील उपअभियंता 1 तारखेस रुजू करून घेण्यास तयार नाहीत ,2 ला रुजू करून घेऊ म्हणतात व 1 तारखेचे वेतन जुन्या कार्यालयाने द्यावे असे म्हणतात , तरी योग्य तो शासननिर्णय व काय करावे मार्गदर्शन मिळावे, सर कृपया तातडीने आपले सहकार्य मिळाले तर खूप मदत होईल

    ReplyDelete
    Replies
    1. जेव्हा आपण आधिच्या कार्यालयातुन म.नं. कार्यमुक्त होतो व मध्ये जर शासकिय सुट्टी आली व त्यानंतर लगतच्या दिवशी आपण जर म.पुर्व कार्यालयात रूजू झालो तर शासकिय सुट्टी जरी आली असेल तरी या सेवेत खंड होत नाही. शासकिय सुट्टीच्या दिवशी कार्यालय बंद असल्यामुळे त्या दिवशी रूजू होता येत नाही. पगार जो काढला जातो तो L.P.C. च्या अनुषंगाने काढला जातो, त्यामुळे जर आपण एखादया कार्यालयास २ तारखेला रूजू झालो व १ तारखेला शासकिय सुट्टी आली तर रूजू झालेल्या कार्यालयाने पुर्ण महीण्याचा पगार काढतात. जेव्हा १५ तारखे नंतर कोणी रूजू झाला तर नविन कार्यालयास आधिच्या कार्यालयाने सदर कर्मचाऱ्याचा पगार काढला किंवा नाही असे प्रमाणपत्र दिल्यानुसार त्या प्रमाणे कार्यवाही होते. या संदर्भात रजा नियम 30 पहावा. पद ग्रहण अवधी नियम 15 पहावा.

      Delete
  29. नमस्कार सर...माझे इयत्ता 10 वी मध्ये संस्कृत होते. तरी मी राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा ची राष्ट्रभाषा शुद्ध सुलेखन परीक्षा इयत्ता 5 वी मध्ये उत्तीर्ण केलेली होती. तरी मला हिंदी भाषा परीक्षा सूट मिळणार का ???
    जर नाही तर कोणती परीक्षा द्यावी??
    धन्यवाद सर

    ReplyDelete
    Replies
    1. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक 01/12/1984 नुसार जर हिंदी-संस्कृत हा विषय घेवून 50-50 गुणांचा स्वतंत्र हिंन्दी विषय घेऊन जर हिंन्दी 50 गुणांचा विषय घेउुन उत्तीर्ण झााल्यास सुट मिळते.
      हिन्दी व मराठी हे विषय १०० गुणाचेच असले पाहीजे, हिन्दी भाषा कोठूनही उत्तीर्ण केली तरी ती १०० गुणाची असली म्हणजे सुट मिळू शकते.

      Delete
    2. एतदर्थ हिन्दी मंडळ परीक्षा

      Delete
  30. माझी प्रथम नियुक्ती गट-ड पदावर (वेतनश्रेणी 4440-7440, ग्रेड वेतन रु.1400) दि.05.03.2009 रोजी झालेली आहे. तद्नंतर माझी नियुक्ती त्याच विभागात दि.05.11.2017 रोजी गट-क पदावर (वेतनश्रेणी 5200-20200, ग्रेड वेतन रु.1900) करण्यात आली. सदर पदावर मला पदोन्नती नसुन नियुक्ती दर्शविण्यात आलेली आहे. सध्या मला गट-ड पदावर वेतन 6030+1400 वेतन आहे. कृपया माझ्या वेतननिश्चितीबाबत मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपली वेतन निश्चीती ही 6030 व ग्रेड पे 1900 या प्रमाणे दिनांक 5/11/2017 पासुन होईल. या ठिकाणी आपली नियुक्ती जरी झाली असेल तरी आपली वेतन निश्चिती जुन्या वेतनानुसारच होईल. त्यामुळे आपणास कनिष्ट लिपीक चा 5830/- चा आपणास काहीही संबंध येत नाही. आपली सेवा आधीच्या पदापासुन सुरू असल्यामुळे तसे करता येत नाही.

      Delete
  31. नमस्‍कार सर, मी कृषी विभागात दि. २३/०५/२००८ ला सरळसेवेने रुजू झालो. गुणवत्‍तेनुसार मी तिसरा मेरीट होतो. परंतु माझयापेक्षा कमी गुण असलेली A व्‍यक्‍ती दि. १२/०५/२००८ ला रुजू झाली. त्‍यांनतर दुसरा मेरीट असलेली B व्‍यक्‍ती दि. १३/०५/२००८ला रुजू झााली त्‍यांनतर माझयापेक्षा कमी गुण असलेली C व्‍यक्‍ती दि १४/०५/२००८ला रुजू झााली. त्‍यांनतर जी व्‍यक्‍ती पहिला मेरीट होती ती D व्‍यक्‍ती दि २१/०५/२००८ ला रुजू झाली. तर मला मला माणिव दिनांक कोणता मिळायला हवा व माझयापेक्षा गुणवत्‍तेनुसार जास्‍त, जे दोन व्‍यक्‍ती आहेत त्‍यांना कोणता माणिव दिनांक मिळेल, याबाबत कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. या ठिकाणी आपणापेक्षा जास्त गुण असल्यांना व आपणास मानिव दिनांक ही 12/05/2008 ही मिळेल व त्यामध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावर असाल. त्या करीता आपण शासन निर्णय हे आपणास भाग २० जेष्ठता सुची पान क्र. 225 वर मिळेल. (दिनांक 21 जून 1982 पहावे. )

      Delete
    2. खुप खुप धन्‍यवाद सर, मी, आपण सांगितल्‍याप्रमाणेच डिपार्टमेंटला कळविले पण मानत नाही. स्‍वतःचीच लावतात.

      Delete
  32. नमस्कार सर अनुकंपा तत्वावर गट क प्रवर्गात नियुक्त कर्मचाऱ्यास त्याने टंकलेखनाचे प्रमाणपत्र दोन वर्षाचे आत सादर न केल्यामूळे त्याची सेवा समाप्त केली असेल व त्यास गट ड मधील पदावर नियुक्ती द्यावयाची असल्यास परंतु गट ड प्रवर्गात जागा रिक्त नसल्यास काय करावे

    ReplyDelete
  33. मी अनुकंपा तत्वानुसार महाराष्ट्र राज्य महामंडळात रीतसर अर्ज केला परंतु माझ्या वडिलांची सेवा ५ वर्षाची सेवा होत नसल्यामुळे मला सेवत सामावून घेतले नाही अशी काही अट आहे का

    ReplyDelete
  34. मी अनुकंपा तत्वानुसार महाराष्ट्र राज्य महामंडळात रीतसर अर्ज केला परंतु माझ्या वडिलांची सेवा ५ वर्षाची सेवा होत नसल्यामुळे मला सेवत सामावून घेतले नाही अशी काही अट आहे का

    ReplyDelete
  35. नमस्कार सर
    मी तंत्र शिक्षण अनुदाति पदविका संस्थेत गट- ड मधील खुल्या प्रवर्गातील सेवाजेष्ठता यादी मधील क्रं. 01 चा कर्मचारी असुन शासन निर्णय वित्त्‍ विभाग संकीर्ण 2015/प्र.क्र.57/2015/विसु-1दिनांक 14 जोनवारी 2016 नुसार गट-ड मधील कर्मचाऱ्यांना गट- क मध्ये पदोन्नतीने नियुक्तीची मर्यादा 25 टक्के वरुन 50 टक्के करण्यात आली. त्यानुसार संस्थेत दि.3 मे 2016 पदोन्नती समितीची बैठक होऊन त्यामध्ये रोष्टर व मागासवर्ग अनुशेषाचे कारण सांगुन सेवाजेष्ठता यादी मधील क्रं. 03 च्या अनुसूचित जाती मधील कर्मचाऱ्यास कनिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आली. सदर जी.आर. मध्ये कोठेही आरक्षणा बाबत उल्लेख नाही. तसेच सदरची बिंदुनामावली नोंद वही 08 वर्षापुर्वी मगासवर्ग कक्षाने प्रमाणीत केली होती. आता बिंदुनामावली नोंद वही अद्यावत करताना मा.व.क. च्या सुचनेनुसार सदर अनुसूचित जाती कर्मचाऱ्यास बिंदु व्यतिरिक्त कर्मचारी +1 असे नोंदविण्यात आले आहे. पदोन्नतीने गट-ड मधुन कनिष्ठ लिपीकाची 50% पदे भरली असता 25% असे रोष्टर मध्ये नोदविण्यात आले आहे मागासवर्ग कक्षाने सांगीतले आहे की सदर जी.आर चे सेवा प्रवेश नियम नाहीत. याबाबत खुल्या प्रवर्गातील सेवाजेष्ठ कर्मचाऱ्यावर अन्याय झाला असे वाटते त्याबाबत मार्गदर्शन व्हावे हि विनंती..
    तसेच तक्रारीस कालमर्यादा असते का? या बाबत मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
    Replies
    1. या बाबत मी चौकशी करून आपणास सांगतो मला या बाबत माहीत नाही.

      Delete
  36. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे कि परिवर्तित रजा घेतेवेळी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे का ?

    ReplyDelete
    Replies
    1. नाही, परंतु जेव्हा आपण कार्यालयास अर्जाद्वारे कळवितो की, माझी प्रकृती ठिक नसल्यामुळे मी कार्यालयास येवु शकत नाही, मी रूजू होण्याचे वेळी डॉ. यांचे प्रमाणपत्र कार्यालयास सादर करेल अशी हमी द्यावी. किंवा आपली ज्या डॉ. कडे औषधोपचार सुरू असेल त्यांचे बेड रेस्ट चे प्रमाणपत्र अर्जा सोबत सादर केले तर ते योग्य राहील. प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचारी positive असतोच असे नाही त्यामुळे या ठिकाणी अधिकारी आपला हेटो पॉवर वापरतात त्यामुळे आपण नीयमानुसार अर्जासोबत डॉ. चे बेड रेस्ट चे प्रमाणप सादर करणे ठिक होईल परंतु याची सक्ती नाही.

      Delete
  37. वर्ग – 4 च्या सेवानिवृत्त कर्मचा-यांना त्यांचे भ.नि.नि. खातेमध्रील रक्कम अंतिमत: प्रदान करणेसाठीच्या आदेशाचा नमुना कोणता आहे, तसेच कोषागार कार्यालयामध्ये देयक सादर करणेसाठी कोणकोणते कागदपत्रे देयकासोबत जोडणे आवश्यक आहे याची कृपया माहिती मिळावी.

    ReplyDelete
  38. कृपया पेन्शन या टॅब वर जावून पेन्शन देयकाचे नमुने व आदेश याला क्लिक करून g.p.f या टॅबवर CLASS iv BHAGWAT यांचे आदेश व mtr 52 पहावा. बिला सोबत g.p.f. SLEEP, MTR 52 व ,एक प्रमाणपत्र ज्यामध्ये हे दिनांक … रोजी सेवानिवृत्त होत असुन त्यांचे कडे कोणतीही थकबाकी नाही तसेच तिन महीन्याअगोदर अभिदान बंद करण्यात आले असुन माहे ----- मध्ये रूपये…… इतकी रक्कम भ्.नि.निधी नियम २३ नुसार प्रदान करण्यात आली आहे व भविष्य निर्वाह निधीची व्याजाची गणना महाराष्ट्र शासन अधिसुचना दिनांक नुसार करण्यात आली आहे असे प्रमाणपत्र दयावे.

    ReplyDelete
  39. वर्ग-4 च्या कर्मचा-यांना त्यांचे भविष्य निर्वाह निधीमधून अंतिम रक्कम प्रदान करणेचे अधिकार कार्यालय प्रमुखांनाच आहेत का किंवा कसे, देयक कोषागार कार्यालयामध्ये देयक सादर करण्यापूर्वी खात्यामध्ये जमा असणा-या रकमेचे विवरणपत्र मा. महालेखापाल मुंबई यांना सादर करणे आवश्यक आहे का आणि त्यांचेकडून मंजुरी आलेनंतरच देयक कोषागारात सादर करता येते का, तसेच यासंबंधीचे नियम कोठे पाहावयास मिळतील.

    ReplyDelete
  40. वर्ग-4 च्या कर्मचा-यांना त्यांचे भविष्य निर्वाह निधीमधून अंतिम रक्कम प्रदान करणेचे अधिकार कार्यालय प्रमुखांनाच आहेत का किंवा कसे, देयक कोषागार कार्यालयामध्ये देयक सादर करण्यापूर्वी खात्यामध्ये जमा असणा-या रकमेचे विवरणपत्र मा. महालेखापाल मुंबई यांना सादर करणे आवश्यक आहे का आणि त्यांचेकडून मंजुरी आलेनंतरच देयक कोषागारात सादर करता येते का, तसेच यासंबंधीचे नियम कोठे पाहावयास मिळतील.

    ReplyDelete
    Replies
    1. वर्ग ४ चे भविष्य निर्वाह निधीचे बाबतीत जो अधिकारी वर्ग ४ चा भ.नि.निधीचा लेखा ठेवतो तोच अधिकारी अंतिम रक्कम प्रदान करतो. त्यामुळे महालेखाकार यांचा काहीही संबंध नाही. जसे वर्ग ३ चा लेखा हा महालेखाकार ठेवतो त्याप्रमाणे अंतिम प्रदानाचा आदेश सुद्धा महालेखाकार काढतो त्याप्रमाणे वर्ग ४ चा अंतिम आदेश लेखा ठेवण्याऱ्यांनीच काढावयाचा असतो. व त्यानंतर देयक कोषागारात तो सेवानिवृत्त होणाचे पुर्वी १५ दिवस आधी टाकावे म्हणजे त्यांचे अंतिम भविष्य निर्वाह निधी मंजुर होवून ते त्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतरचे दुसरे दिवशी अदा करावेत. व तसे कोषागार सुद्धा शेरा नमुद करतात.

      Delete
  41. सर ,
    मी सचिन नारायण तुपे ,माझे वय 32 चालू असून ,माझे वडील कै नारायण तुपे हे एका खाजगी अनुदानित शिक्षण संस्थेत शिपाई या पदावर कार्यरत असताना 14 /2/2002 साली आकस्मित निधन झाले ,आईला पेन्शन सुरू आहे ,
    तर मला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळेल का?
    त्या साठी मी या आधी कोणतेही प्रयत्न केले नाही ,मी मी अनुसूचित जाती या प्रवर्गातील आहे,मी या आधी खाजगी नोकरी करत होतो ,
    कृपया या साठी मला मार्गदर्शन करावे .
    मोबा 9702930241

    ReplyDelete
    Replies
    1. अनुकंपा तत्वावर नियुक्ती करीता वडील वारल्यानंतर १ वर्षाचे आत रितसर अर्ज करावा लागतो. व त्याप्रमाणे अनुकंपा त्तवावर नियुक्ती होते. आपण १ वर्षाचे आत अर्ज न केल्यामुळे आपला आता हक्क राहीला नाही.

      Delete
  42. hi sir , me social welfare deparment madhi aahi. maji papa chy medical bill banva chi aahi .pan te seal tax deperment madun retir jhali aahit . tyna ata 15000/- rs pension milat aahi . tar mala medical bill pass houn milel ka.

    ReplyDelete
  43. नाही., दिनांक 11/11/2011 चा शासन निर्णय पहावा. Blog वर आहे. मर्यादा रू 3500/-

    ReplyDelete
  44. नमस्कार सर, मी सुजित पारवे, माझा प्रश्न आहे कि, जस कि महिला कर्मचारी यांनी प्रसूती रजा मिळते तशी पुरुष कर्मचारी यांना संगोपन किंवा पितृत्व रजा मिळते का?

    ReplyDelete
    Replies
    1. नाही. परंतु विकलाांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱयाांना विशेष बाल सांगोपन रजा ही वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 21/09/2016 नुसार 730 दिवसाची एकुण सेवा कालावधीत घेता येते.

      Delete
  45. सर नमस्कार
    अनुदानित संस्थेवर प्राथमिक शिक्षक असलेल्या उमेदवारास 4 अपत्य असतील तर तो नौकरीत राहु शकतो का ?
    त्याची ही अपत्य कोणत्या वर्षी च्या पूर्वी ची असणे गरजेचे आहे. चार अपत्य उघडकीस आल्यास त्यास काय शिक्षा मिळेल. या संदर्भात काही शासन निर्णय असल्यास मार्गदर्शन करावे ही विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. नोकरीवरून काढता येत नाही. परंतु सवलत देता येत नाही, जसे LTC/ Medical Rembursment/HBA Advance all type advance याची सवलत मिळत नाही. लहान कुटूंबाचा शासन निर्णय हा दिनांक सामान्य प्रशासन विभागाची अधिसुचना क्र. एसआरव्ही-2000/प्र.क्र. (17/2000)/बारा, दि. 28.03.2005 नुसार अमलात आला आहे. दिनांक 13/06/2006 नंतर जर दोन अपत्यानंतर तिसरे अपत्य झाले असल्यास सवलत मिळत नाही. व शासकिय नोकरी मिळणेस पात्र राहणार नाही.

      Delete
  46. मी जिल्हा परिषद पालघर सेवेमधून विस्तार अधिकारी (शिक्षण)या पदावरून दि.30/04/2008 रोजी सेवानिवृत्त झालेलो आहे.दि.09/12/2016 चा शासन निर्णयानुसार दि.01/10/2006 ते दि.31/03/2010 या दरम्यान सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांना अश्वशीत प्रगती योजना अंतर्गत दुसरा लाभ फक्त निवृती वेतन प्रयोजनार्थ मंजूर करून त्यावर आधारित वेतन निश्चिती करून निवृती वेतन लागू करावे असे स्पष्ट दिलेले आहे.त्यानुसार दुसरा लाभ साठी विहित अटी व शर्थीची पूर्तता मी करीत आहे.त्यासाठी पदोन्नती निवड समितीची मान्यतेची अट आवश्यक आहे का?
    तसेच माझे मूळ गोपनिय अहवाल प्रति उपलब्ध नाही असे कार्यालयाने लेखी दिलेले आहे.फक्त सरासरी प्रतवारी उपलब्ध करून दिलेली आहे.माझी सरासरी प्रतवारी चांगला B+ अशी आहे.सदर गोपनिय अहवाल निश्चित चांगला असा होतो काय?
    अश्वशीत प्रगती योजना दुसरा लाभ साठी गोपनिय अहवालाचे निकष के आहेत ते कळविणे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! दिनांक 01/01/2006 नंतर जे अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झालेत अशा सर्वांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देय आहे. पहील्या आश्वासित करीता गोपनीय अहवाल B पाहीजे व दुसऱ्या आश्वासित करीता गोपनीय अहवाल B+ पाहीजेत. आपण सेवानिवृत्त झाले असल्यामुळे कार्यालयाने गोपनीय अहवालाचा आग्रह न धरता आपली प्रतवारी त्यांचे कडे उपलब्ध असल्यामुळे व आपले गोपनीय अहवालाची प्रतवारी ही B+ असल्यामुळे आपणास आश्वासित प्रगती योजना देण्यास काहीही अडचण नाही. तसेच पदोन्नती निवड समीतीची या करीता काहीही आवश्यक्ता नाही, आश्वासित प्रगती योजना मंजुर प्राधीकारी यांना असा अधिकार असतो. या करीता आपण वित्त विभागाचा दिनांक 01/04/2010 व 5/07/2010 चा शासन निर्णय पहावा.

      Delete
    2. महोदय, मी शिक्षणाधिकारी यांना सांगितले की माझे गोपनिय अहवालाची प्रतवारी B+चांगला अशी आहे.परंतु त्यांनी निश्चित चांगली असे नमूद केले नाही त्यामुळे दुसरा लाभ मंजूर करीत नाही.वास्तविक गोपनिय अहवाल B+ आहे असे असूनही मान्य करीत नाही.त्यासाठी मी कोणा कडे अपील करावे याचे मार्गदर्शन होणेस विनंती आहे.

      Delete
    3. या करीता आपण माहीतीच्या अधिकारात 1.दुसऱ्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे करीता गोपनीय अहवालाची प्रतवारी कोणती असावयास पाहीजे व त्या बद्दल शासन निर्णय पुरविण्यात यावा अशी माहीती शिक्षणअधिकारी यांना मागावी. 2.तसेच सन 20XX ते सन 20xx पर्यत सेवानिवृत्त झालेल्यांचे दुसऱ्या आश्वासित प्रगती योजने करीता अर्ज प्राप्त झाले आहे व त्यापैकी कितींना दु.आ.योजनेचा लाभ दिला व किती अधिकारी कर्मचारी यांना लाभ प्रदान करणे बाकी आहे व न देण्याची कारणे या बाबतची त्यांना माहीती मागावी. 3. सन ते सन पर्यतच्या गोपनीय अहवालाची प्रत मागावी.
      या ठिकाणी आपण संशयाचा फायदा म्हणून B+ चांगाला असा लिहीला असेत तरी B+ निश्चित चांगला याचा फायदा घेवू शकता.
      आपण दिनांक रोजी अर्ज केला असेल त्या अर्जाचे अनुषंगाने कार्यालयाने काय कार्यवाही केली याची स्वतंत्र माहीती मागावी. व हे सर्व माहीती प्राप्त झाल्या नंतर आपण लेबर कोर्टात जावे. येथे मॅट मध्ये जाण्याची आवशक्ता नाही व ते आपणास वयानुसार शक्य होणार नाही.

      Delete
  47. सर मी बांधकाम विभागात गट ड मद्ये माळी या पदावर कार्यरत आहे मला शासन सेवेत ३ वर्ष पूर्ण झालेली आहेत
    मला दि ०६/०६/२०१७ च्या R. R नुसार पदोन्नती मिळेल का

    ReplyDelete
  48. दि १४/०१/२०१६ च्या शासन निर्णयानुसार गट ड च्या सेवाप्रवेशात सुधारणा करण्यात येतील असे म्हटले होते व दि ०६/०६/२०१७ च्या सेवाप्रवेश नियमात तर गट ड म्हणजे गट ड मध्ये येणारी पदे असा उल्लेख केला आहे.

    ReplyDelete
  49. दि १४/०१/२०१६ च्या शासन निर्णयानुसार गट ड च्या सेवाप्रवेशात सुधारणा करण्यात येतील असे म्हटले होते व दि ०६/०६/२०१७ च्या सेवाप्रवेश नियमात तर गट ड म्हणजे गट ड मध्ये येणारी पदे असा उल्लेख केला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आतापर्यत सार्वजनिक बांधकाम विभागात महाराष्ट्रात माळी हे पद फक्त C.R.T. चेच आहे त्यामुळे त्यांना पदोन्नती नाही. परंतु नव्याने ३४ संवर्गाचे पुढील पद सरळसेवेने जर आपली नियुक्ती गट ड मध्ये करण्यात आली असेल तर जेथे जेष्ठता याची तयार होते त्यांनी गट ड ची एकत्रीत यादी करून त्याचे जेष्ठतेनुसार व शैक्षणीक अर्हतेनुसार पदोन्नती करीता यादी तयार करून ते पदोन्नती देऊ शकते.

      Delete
    2. मी 2015 या वर्षी सरळसेवने भरती झाली आहे व आमचे पद हे R.T मध्ये येते आमच्या विभागात माळी, सफाई कामगार, कक्षसेवक, चौकीदार, खानसामा इ.पदे 2015 मध्ये सरळसेवा भरती झाली आहे. आम्ही पदोन्नतीसाठी पात्र ठरु का

      Delete
  50. वर्ग 2 चे अधिकारी मुळ आस्‍थापने वरुन त्‍यांचेच अस्‍थापनेच्‍या वरीष्‍ठ कार्यालयात प्रति नियुक्‍तीने कार्यरत असेल तर अशा प्रकरणात गोपनिय अहवाल प्रति नियुक्‍त ठिकाणी कार्यरत असलेल्‍या अधिकारी यांनी प्रतीवेदन करावे किंवा कोणी या संबधी शासनाचे कांही निर्णय अथवा परिपत्रक आहे काय असल्‍यास rgkulkarni1962@gmail.com.in या मेल आय डी वर पाठवावे ही विनंती.

    ReplyDelete
  51. वग 2 चा अधिकारी जर त्‍यांचेच आस्‍थापनेच्‍या वरीष्‍ठ कार्यालयात कार्यरत असेल तर त्‍यंचे गोपनीय अहवाल त्‍यांचे मुळ आस्‍थापना कार्यालयाने प्रतिवेदन करावे किंवा कोणत्‍या कार्यालयातील अधिकारी प्रतिनविेदन करतील या बाबत शासनाचे निर्णय आहेत काय१ विनंती की सदर माहिती मिळणेस विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. वर्ग 2 चे अधिकारी मुळ आस्‍थापने वरुन त्‍यांचेच अस्‍थापनेच्‍या वरीष्‍ठ कार्यालयात प्रति नियुक्‍तीने कार्यरत असेल तर अशा प्रकरणात गोपनिय अहवाल प्रति नियुक्‍त ठिकाणी कार्यरत असलेल्‍या अधिकारी यांनी प्रतीवेदन करावे किंवा कोणी या संबधी शासनाचे कांही निर्णय अथवा परिपत्रक आहे काय असल्‍यास rgkulkarni1962@gmail.com.in या मेल आय डी वर पाठवावे ही विनंती.

      Delete
  52. मी 2015 या वर्षी सरळसेवने भरती झाली आहे व आमचे पद हे R.T मध्ये येते आमच्या विभागात माळी, सफाई कामगार, कक्षसेवक, चौकीदार, खानसामा इ.पदे 2015 मध्ये सरळसेवा भरती झाली आहे. आम्ही पदोन्नतीसाठी पात्र ठरु का

    ReplyDelete
    Replies
    1. Yes, तुम्ही पात्र ठरता, परंतु माळी या पदाचा सेवाप्रवेश नियम काय म्हणतो हे पहावे लागेल. त्यामध्ये आपणास Gardening मध्ये पदोन्नती मिळु शकते काय हे सुद्धा पहावे लागेल. त्याचे गे्रड पे जास्त आहे. या करीता आपण उद्यान विभागाशी संपर्क साधावा.

      Delete
  53. नमस्कार सर,
    शिपाई या पदासाठी एकस्तर वेतनवाढ चे गणित कसे आहे ?
    यासाठी GR आहे का ?

    ReplyDelete
  54. माझे वडील जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक २.परभणी येथे कालवा निरीक्षक या पदावर कार्यरत अस्ताना ना .दिनांक २ सप्टेंबर २००६ रोजी त्यांचा आकस्मित मृत्यू झाला .मी अज्ञान म्हणजे चौदा वर्षाचा असल्या कारणाने अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी माझ्या आईनेे आईच्या नावे एक वर्षाच्या आत रितसर अर्ज सादर केलेला होता परंतु आई आजारी असल्यामुळे मला माझ्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर माझ्या नावाचा विचार करणेबाबत विनंती अर्ज दि ७ डिसेंबर २००७ आईने दिलेला होता .पण मी २०११ ला जेव्हा अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर अर्ज सादर केला तेव्हा माझा अर्ज फेटाळण्यात आला आपला अर्ज बऱ्याच कालावधीनंतर आल्या कारणाने आपण अनुकंपातत्वावर नियुक्तीसाठी अपात्र आहात अशा आशयाचे पत्र मला देण्यात आले .
    मला अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळू शकेल
    का कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
    Replies
    1. कार्यालयाने आपला अर्ज सन 2011 ला फेटाळला हे नियमबाह्य आहे. शासन निर्णय सा.प्र.वि. दिनांक 11/09/1996 नुसार अज्ञान वारसदाराचे बाबतीत तो सज्ञान झाल्यानंतर त्याने एका वर्षाच्या आत नोकरीसाठी अनुकंपातत्वावर मिळण्याकरीता अर्ज करणे गरजेचे आहे. त्यामुळे सज्ञान झाल्यानंतर अर्ज केल्यास तो स्विकारणे क्रमप्राप्त आहे.
      या करीता शासन निर्णय मधील भाग ११ ते १७ मधील भाग १७ पहावा, येथे सर्व अनुकंपा तत्वाचे शासन निर्णय जतन केलेले आहे कृपया त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद! Best Of Luck

      Delete
    2. धन्यवाद सर

      Delete
  55. सरजी मी दिनांक 12/2/2018 रोजी कक्षसेवक गट ड (4440-7440) या पदावर विमाप्र संवर्गातून आरोग्य विभाग मध्ये कामाला लागलो आहे. तर माझा प्रश्न असा आहे की. कक्षसेवक पदाला पदोन्नती आहे का. आणि मला पदोन्नती तरी पण किती वर्षांनी भेटेल. माझा शिक्षण कला पदवीधर आहे. धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. शासन निर्णय दिनांक 06/06/2016 नुसार गट ड मधील सर्व कर्मचारी हे वर्ग क मध्ये पदोन्नतीस पात्र आहेत. त्यामुळे आपली ३ वर्षानंतर पदोन्नती होउु शकते, या करीता आपण कक्षसेवकाचा सेवाप्रवेश नियम पहावा. तसेच आपल्या विभागात कोणकोणत्या पदावर कक्षसेवाकाची पदोन्नती होते ते सुद्धा पाहून घ्यावेत.

      Delete
  56. सर नमस्ते.
    या कार्यालयामधील वर्ग-4 चे निलंबित कर्मचारी यांनी या कार्यालयाकडे Cheek Absess या आजारासाठी उपचार घेतलेचे वैद्यकिय देयक सादर केले आहे.यामध्ये आंतररूग्ण म्हणून एक दिवस उपचार घेतले आहेत तरी सदर देयक मंजूर होऊ शकते का? याबाबतच्या तरतूदी कोठे पहावयास मिळतील याबाबत कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

    ReplyDelete
  57. आपण नमुद केलेला आजार जर २८ आजारामध्ये मोडत असेल तर त्यांना आंतररूग्ण कालावधीतील वैद्यकिय प्रतिपुर्ती मिळेल. तसेच निलंबीत कालावधीत सुद्धा वैद्यकिय प्रतिपुर्ती मिळते. रुग्ण याची व्याख्या ही शासकिय कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक असा असल्यामुळे मिळते.

    ReplyDelete
  58. सर माझ्या विभागात मी 8 वर्षा पासुन शासन मान्य सहाय्यक प्राध्यापक पदावर पुर्ण वेळ काम करत आहे. माझ्या विभागातील सहयाेगी प्राध्यापक पद नवनिर्मित असुन ते आता सरळसेवेत महिलासाठी आरक्षण सुचवून भरण्याची प्रक्रीया करत आहेत. तर हे नियमात आहे किंवा कसे. यावर मार्गदर्शन करावे ही विनंती सदर सहयाेगी प्राध्यापक पद एकाकी स्वरूपाचे आहे

    ReplyDelete
    Replies
    1. सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक बीसीसी-2009/प्र.क्र.291 /09/16-ब दिनांक 05/11/2009 मधील प्रपत्र ब नुसार एकाकी पदा करीता आरक्षण नाही आहे. तसेच महीला करीता 30% समांतर आरक्षण आहे व ते मिळण्याकरीता कमीत कमी ४ जागा जर रिक्त असेल तरच एक पद महीलाचे आरक्षणाद्वारे पद भरती करू शकतो. परंतु आपल्या संस्थेमध्ये एकुण पदांची संख्येच्या अनुषंगाने रिक्त पदामध्ये महीलांचे पदे कमी असल्यामुळे त्यांनी महीलाचे पद भरण्याचा निर्णय घेतला असेल परंतु तसे करता येणार नाही. या बद्दल आपण न्यायालयात जावू शकता. पदोन्नती या टॅब मध्ये पदोन्नती / नियुक्ती बाबतचे शासन निर्णय असुन कृपया त्याचे अवलोकन करावे.
      धन्यवाद!

      Delete
  59. माझे वडील महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात होते त्यांचे आकस्मित निधन झाले परंतु तांच्या पश्चात मी रीतसर अर्ज केला परंतु वडिलांची सेवा हि ५ वर्षा पेक्षा कमी होत असल्यामुळे माझा अर्ज दप्तरी जमा केला तरी मला अनुकंपा नुमार नोकरी मिळे का?

    ReplyDelete
    Replies
    1. अनुकंपा ही दिवंगत कर्मचाऱ्यांचे कुटूंबीयांना आर्थिक संकटातुन बाहेर काढण्याकरीता आहे त्यामुळे सेवेचा प्रश्न उद्भवत नाही. कार्यालयास माहीतीच्या अधिकारात आपल्या अर्ज कोणत्या कारणामुळे नाकारला त्याचा शासन निर्णय पुरविण्यात यावा अशी माहीती मागावी. या करीता आपण अनुकंपा या टॅब वरील दिनांक 17/11/2016 चा शासन निर्णय पहावा. धन्यवाद!

      Delete
  60. नमस्कर सर, मला औरंगाबाद महसूल विभाग निर्मातीचा शासन निर्णय किंवा परिपत्रक हवे आहे. कृपया, कुठे मिळेल ते सांगावे हि विनंती

    ReplyDelete
  61. नमस्कार सर मी भाऊसाहेब नारायण वाघमारे आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही सर्व्यांनी निर्णय घेऊन मोठा भाऊ ह्याला वडिलांच्या जागी कामाला लावले परंतु तो आता काहीच जवाबदारी पार पाडत नाही त्याला काही बोललो तर तो बोलतो कि मला काही सांगू नका मग आम्ही त्याच्या ऑफिस वर जाऊन तक्रार केली तर तिथे तो काहीही खोटे सांगतो व आम्हाला वकिलाची धमकी देतो
    सर आता तर त्यांनी वकील करून आम्हाला लेटर पाठवले आहे आणि त्याच्यात नाही ते खोटे लिहले आहे सर तुम्हीच आम्हाला काय ते उपाय सांगा धन्यवाद
    आपला विश्वासू -भाऊसाहेब नारायण वाघमारे

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार! सामान्य प्रशासन विभाग, यांचे दिनांक 21/09/2017 च्या शासन निर्णयातील परिशिष्ठ अ मधील 5 इ प्रमाणे कार्यालयास कळवावे तसेच सामान्य प्रशासन विभाग 26/10/1984 मधील ७ ब नुसार कार्यालयास कळवावे. आपल्या ना हरकत प्रमाणपत्रानुसारच आपले मोठया भावाला शासकिय नोकरी लागलेली आहे व त्या मध्ये त्यांनी एक बॅन्ड लिहुन दिला असेल ज्यामध्ये मी माझ्या कुटूंबातील व्यक्तींच्या उदरनिर्वाहाची काळजी घेईल या मुद्दयावर आपण न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ठ करू शकता. किंवा आपले नातेवाईक मिळून त्यांना समजविण्याचा प्रयत्न करावा अन्यथा न्यायालयात दाद मागावी.

      Delete
    2. धन्यवाद साहेब आपण मला मार्गदर्शन दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे

      Delete
  62. सर मी राज्य परिवहन महामंडळात सहाय्यक(कनिष्ठ) या पदावर नुकताच रुजू झालो आहे त्या पदाची वेतनश्रेणी 4350-15600 अशी आहे तर कृपया मला सुरुवातीला एकूण पगार किती असेल याबद्दल मार्गदर्शन करावे, आणि वेतनश्रेणी वरून पगार कसा काढला जातो याबद्दलही मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  63. मला राज्य परिवाहन मधील वेतन श्रेणी बाबत माहीती नाही आपणाकडे वेतन आयोग नसल्यामुळे नक्की सांगु शकत नाही परंतु अंदाजे मुळ वेतन 4350/- + 5742/- महागाई भत्ता +10/20 टक्के घरभाडे व ईतर भत्ते असे मिळुन आपले अंदाजे वेतन होऊ शकते.

    ReplyDelete
  64. सर, कनिष्ठ सहा या पदावर कर्मचारी सहावे वेतन आयोग मध्ये प्रथम रुजू झाल्यावर त्या कर्मचाऱ्याचे एकस्तर वेतन श्रेणी मध्ये वेतन किती रु. वर निश्चित होईल?कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती।

    ReplyDelete
    Replies
    1. एकस्तर बाबतीत कनिष्ठ सहाय्यकाचे वेतन 5830/- + 1900 यावर ३% ची एक वेतनवाढ व ग्रेड पे २४००/- प्रमाणे वेतननिश्चीती होईल.

      Delete
  65. नमस्कार सर, रचना व कार्यपद्धती नुसार विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत प्रादेशिक कार्यालयाची निरीक्षणे याबात शासन निर्णय आहे काय? कृपया माहिती द्यावीविनंती

    ReplyDelete
  66. या बाबत सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक दिनांक 26/06/2014, 14/08/87, व 23/04/1985 चे पहावेत.

    ReplyDelete
  67. मी दि.30/04/2008 रोजी नियत वयोमानानुसार विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावरून पंचायत समिती मोखाडा जिल्हा परिषद पालघर येथून निवृत झालेलो आहे.मी सेवानिवृत्त झालो तेव्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन झालेले नव्हते.1 आगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे.माझे सेवापुस्तक व पेन्शन पंचायत समिती जव्हार जिल्हा परिषद पालघर येथे आहे.
    दि.09/12/2016 चा शासन निर्णयानुसार दि.01/10/2006 ते दि.31/03/2010 दरम्यान सेवानिवृत्त कर्मचारी यांना अश्वशीत प्रगती योजनांचा दुसरा काल्पनिक लाभ मंजूर करण्याबाबत शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे.
    मी सेवानिवृत्त झालो ती पंचायत समिती जव्हार जिल्हा परिषद पालघर मध्ये असूनही पालघर प्रशासन सदर लाभ पूर्वीच्या म्हणजे ठाणे जिल्हा परिषद यांनी मंजूर करावा असा आक्षेप घेत आहे.वास्तविक शासन निर्णय दि.09/12/2016 रोजी पारित झालेला आहे.तर सध्या ज्या जिल्हा परिषद कडून पेन्शन घेत आहे.त्यांनी दुसरा लाभ काल्पनिक मंजूर करणे आवश्यक आहे.केवळ वेळकाढू पणा करण्यासाठी असे निर्थक कारणे देऊन दिरंगाई करीत आहे.तरी त्याबाबत मला मार्गदर्शन मिळणेस विनंती आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. या बाबत आपण जिल्हाधिकारी ठाणे व पालघर यांना माहीतीच्या अधिकारीत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत चे लाभ हे विभाजन पुर्वीच्या तारखेतील कोणी द्यावे या बाबतचा शासन निर्णय मागावा.
      या बाबत शासनास यांना माहीतीच्या अधिकारीत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत चे लाभ हे विभाजन पुर्वीच्या तारखेतील कोणी द्यावे या बाबतचे शासन निर्णय मागावेत.
      तसेच आपण जेथुन सेवानिवृत्त झालेत तेथील उच्च कार्यालयास आपला प्रस्ताव सादर करावा (जिल्हा जरी वेगळा झाला असेल तरी आपले कार्यालय जेथे संलग्न झाले असेल त्यांनीच करावे)व मला माझे फायदे एका महीन्यात न मिळाल्यास मी व्याजाची मागणी करील असे लिहावे.

      Delete
  68. सर एखादा कर्मचारी 7 ते 8 वर्षांपासून कार्यालयीन कामे खूपच हळूवारपणे करीत आहे, म्हणजे 1 पत्र टाईप करायला सांगितले तर ते काम पूर्ण करण्यासाठी 3 तास एवढा वेळ लावतो एवढ हळूवारपणे काम करतो तर सदर कर्मचारी यांना कामामध्ये वारंवार हलगर्जीपणा करीत आहे म्हणून त्यांना सेवेतून काढून टाकता येते का सर कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. कामावरून काढून टाकता येत नाही. या करीता प्रथम संबंधीतास वारंवार लेखी सुचना द्यावा लागतात. कारणे दाखवा नोटीस द्यावी लागेल. विभागीय चौकशी करावी लागेल व त्यामध्ये त्याचे वेतन वाढ रोखणे, ताकीद येणे ईत्यादी करावे लागतात व त्यानंतर ही जर संबंधीत कर्मचाऱ्याचे कामात सुधारणा न झाल्यास त्याला 50-55 चे रिव्हू मध्ये नोकरीवरून सक्तीने सेवानिवृत्त करता येते.

      Delete
    2. सदर कर्मचारी यांची १० वर्षाची सेवा झालेली आहे त्‍याना कारणे दाखवा नोटीस वारंवार दिल्‍या जातात व त्‍यांचा ३ वार्षीक वेतनवाढी बंद आहेत सदर कर्मचारी यांच्‍या कामात मुळीच सुधारणा होत नाही व आपण सांगितल्‍या प्रमाणे ५०-५५ चे रिव्‍हू मध्‍ये नोकरीवरुन सक्‍तीने सेवानिवृत्‍त करता येते याबाबतची कार्यपध्‍दती कोणती आहे सर कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

      Delete
  69. सर माझे प्रश्‍न खालील प्रमाणे आहेत कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
    १.कार्यालय प्रमुखाला कर्मचारी यांचे वार्षिक वेतनवाढ कायम स्‍वरुपी रोखण्‍याचे अधिकार आहेत काय?
    २.कार्यालय प्रमुख किती वेतनवाढी बंद करु शकतो?
    ३.विभागीय चौकशी न करता फक्‍त प्राथमीक चौकशीच्‍या आधारे वार्षिक वेेेेतनवाढ कायमची बंद करता येते का?
    कृपया कायद्यातील तरतुदीसह मार्गदर्शन करावे हि विनंती.

    ReplyDelete
  70. आदरणीय सर, एखादे कर्मचारी यांची कनिष्‍ठ लिपीक संवर्गातुन वरिष्‍ठ लिपीक संवर्गात पदोन्‍नती झाली आहे पदोन्‍नतीचा दिनांक-२०/५/२०१८ हा आहे मग सदर कर्मचारी यांना येणा-या १ जुुुलै ची वार्षिक वेतनवाढ देेता येईल काय. योग्‍य मार्गदर्शन करावे हि विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. जेव्हा आपली पदोन्नती / आश्वासित प्रगती ही दिनांक 2 जानेवारी ते 30/06/2018 या दरम्यान येत असेल तर आपण वेतन निश्चीती ही माहे जुलै 2018 ला होणेबाबत विकल्प द्यावा. (आपली पदोन्नती जरी दिनांक 20/05/2018 रोजी होत असेल तरी वेतन निश्चितीचा विकल्प द्यावा. ) जर आपण विकल्प दिला नाही तर आपणास एक वेतनवाढ ही दिनांक 20/05/18 ला देण्यात येवुन त्या पुढील वेतनवाढ ही दिनांक 01/07/2019 ला मिळेल त्यामुळे आपले नुकसान होईल करीता विक्लप द्यावी.

      Delete
  71. आदरणीय सर जेव्‍हा एखाद्या कर्मचा-याची पदोन्‍नती होतेे तेव्‍हा पदोन्‍नतीच्‍या पदावर पदस्‍थापनेच्‍या ठिकाणी रुजू होण्‍याकरीता किती दिवसाचा कालावधी मिळतो. कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी अधिनियम मधील कृपया नियम 14 पहावे.

      Delete
  72. सर माझी नियुक्ती दिनांक. 20-7-2014 ही आहे मी 4 वर्षात 3 प्रयत्न मध्ये विभागीय परीक्षा उत्तीर्ण केली आहे माझ्या समोर एक कर्मचारी आहे त्यांना दिनांक. 18-7-2014 रोजी वयाची 45 वर्षे पूर्ण केल्या मुळे त्यांना विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली आहे. पदोन्नती देतांना त्यांचा आधी विचार होईल की माझा आधी विचार होईल कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. 18/07/2014 यांचा विचार केला जाईल. या बाबत शासन परिपत्रक आहेत, परंतु ते मला सद्या दिसत नाही आहे. तरी आपण सा.प्र.वि. यांचे परिपत्रक दिनांक 11/09/1975, 7/04/1979 मिळाल्यास पहावे. तसेच दिनांक 10/04/1981 चे पहावे.

      Delete
  73. नमस्कार, मी नवीन आहे. कॅश बुक चे महिना अखेरचे प्रमाणपत्र नमूना कृपया द्यावा

    ReplyDelete
    Replies
    1. Certificate
      Certified that closing balance on Dated 31/05/2018 is Rs 500/- For the Revenue Stamp Charges Rs 300/- and ...... Charges is Rs 200/-

      Stamp and Sing

      Delete
  74. niyamanusar medical leave upabhoglyavar rajecha arj sada karta yeto kay?
    mi whats app var pahile hote tase karta yete
    pan tyababatcha niyam/ adhiniyam / G.R. nahi disla
    krupaya aplyala mahit aslyas kalwa.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण जर मुख्यालयाबाहेर जावून आजारी पडले असेल तर आपणास कार्यालयात असतांना व बाहेरगावी जाणेचे आधीकिरकोळ रजाकिंवा मुख्यालय सोडण्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. या साठी की आपण आपले गावी गेले व तेथे आपली प्रकृती खराब झाली. या ठिकाणी आपण साधा अर्ज करू शकता, व त्या अर्जासोबत डॉ. यांनी Bed Restदिली असल्यास ते प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे. व अर्ज कार्यालयास कोणामार्फतकिंवा पोस्टाने / ईमेल ने पाठवावा. जेव्हा डॉ. यांचे कडुन Fit For Duty चे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्याल तेव्हाविहीत आवेदन व डॉ. प्रमाणपत्र कार्यालयास सादर करावे व वैद्किय कारणास्तव परावर्तीत रजा असे अर्जात नमुद करावे. या बाबत आपण मन.से. रजा पहावे. वैद्यकीय मंडळासमोर जो नेहमी वैद्यकीय रजेवर जातो त्याचे बाबतीत त्याला पाठवीतात परंतु जो खरोखरच आजारी पडला असेल त्यालाविनाकारण कार्यालय त्रास देत नाही. परंतु ते अधीकाऱ्याचे मर्जीनुसार वैद्यकीय मंडळासमोर ३दिवसाचे वर रजेवर असल्यास ते पाठवू शकतात.

      Delete
  75. tasech medical leave upabhogtana karmacharyas medical board samor tapasni karnyababatche konte nikash aahet tyababat mahiti aslyas kalwa. for example- kiti kalawadhisathi medical leave upabhoglyas medical board samor karmacharyas ubhe kele jau shakte etc.

    ReplyDelete
  76. वैद्यकीय खर्चाची प्रती परताव्यासाठी कोण कोणत्या आजारांचा समावेश होतो

    ReplyDelete
    Replies
    1. या बाबत आपण वैद्यकीय प्रतीपुर्ती अधीनियम मधील शासन निर्णय दिनांक 19 mar 2005 शासकीय कर्मचा-यानी व त्‍याच्‍या कुटूंबियांनी आकस्मिक निकडीच्‍या प्रसंगी घेतलेल्‍या खाजगी रुग्‍णालयातील आंतररुग्‍ण उपचाराच्‍या वैदयकिय खर्चाच्‍या मंजूरीबाबत चा शासननिर्णय पहावा.

      Delete
  77. नसमस्कार सर मी भाऊसाहेब नारायण वाघमारे आपणास सांगू इच्छितो की,मोठया भावाला वडिलांची अनुकंपा नौकरी दिली परंतु नौकरी मिळाल्यापासून तो स्वतःचेच बगतो आणि आईला काहीही देत नाही व घरात दोन लग्न जाले त्यास पण काहीही हातभार जवाबदारी पार पाडली नाही,बाहेरून व्याजाने पैसे घेऊन कार्यक्रम पार पाडला, त्याला काही विचारले तर तो बोलतो कि मि काहीच देणार नाही तुम्हाला जे करायचे ते करा, त्याचा कंपनीत पण तक्रार केली पण तिथेही काहीही निर्णय घेत नाही, तर आपणच मला सर योग्य मार्गदर्शन करा हि मी आपणास विनंती करतो

    धन्यवाद




    ReplyDelete
    Replies
    1. या ठिकाणी आपण सामंज्याने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला परंतु आपणास यश आलेले नाही. करीता आपण त्यांचे कार्यालयास पत्र लिहावे. त्यामध्ये संपुर्ण बाब कार्यालयाचे व त्यांचे वरीष्ठ कार्यालयाचे निर्देशनास आणुन द्यावी. व आपण जी ना हरकतदिली त्याचे अनुषंगाने त्यांनी संपुर्ण कुटूंबाचे पालन पोषण करणे आवश्यक आहे त्यामुळे या धरतीवर आपण या बाबत न्यायालयात खटला दाखल करावा व आपणास लग्नास जो खर्च आला त्याच्या खर्चाच्या पावत्याही न्यायालयात सादर करावे. न्यायालय आपले बाजुने न्याय देईल. या बाबत मी माझ्या परीचयातील एखादा वकिल किंवा न्यायाधीश् यांचेसी संपर्क करून पुढील माहीती आपणास पुरविण्याचा प्रयत्न करील.

      Delete
    2. सर आपण मला लवकरात लवकर आपल्या परिचयातील वकील किंवा न्यायाधीश यांच्याशी सम्पर्क करून द्या कारण कि त्याने वकील करून आम्हाला लेटर पाठविले आणि त्यामध्यें काहीही खोटे खोटे लिहिले आहे म्हणून सर आपण माजी परिस्थिती समजून मला योग्य मार्गदर्शन कराल हि मी आपना कडून अपेक्षा करतो
      धन्यवाद

      Delete
    3. आपण माहीतीचा अधिकार अंतर्गत आपण जेथे अनुकंपातत्वावर भावास नोकरी मिळणेबाबत अर्ज केला त्या कार्यालयात त्या अर्जाच्या प्रती / प्रस्ताव मागवुन घ्यावा तसेच ज्या कार्यालयाने अनुकंपावर लावले त्या कार्यालयातुन सुद्धा माहीती मागावी. या माहीतीमध्ये जर तुमच्या भावाने हमी घेतली असल्यास आपणास न्यायालयातुन नक्कीच न्याय मिळेल.

      Delete
    4. सर आपण मला मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद

      Delete
  78. सर, माझा प्रश्न असा आहे कि शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. ०९ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी समुपदेशनाचे धोरण अवलंबायचे ठरले आहे ते खरोखरच त्याप्रमाणे पारदर्शी पद्धतीने राबविले जाईल असे वाटते का? कि बदल्या नेहमीच्याच पद्धतीने होतील?
    कारण ग्रामविकास विकास विभागातील बदल्या पोर्टलच्या माध्यमातून होतात पण वरील कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी समुपदेशनाचे धोरणाच्या शासनाच्या निर्णयावरून कर्मचाऱ्यांकडून विकल्प मागविले जाणार असले तरी वाटपाची पद्धत मॅनुअलच आहे. त्यामुळे निकष पाळले जातील असे वाटते का?

    ReplyDelete
    Replies
    1. बदली समुपदेश हा निर्णय फार चांगला आहे. वरीष्ठांनी जर या मध्ये काही कमी जास्त केले व त्याबाबत तक्रार केल्यास सबंधीत अधीकाऱ्याची चौकशी होवु शकते त्यामुळे ते जरा संभाळूनच करेल. या ठिकाणी कमीत कमी ३० टक्के तरी फायदा होईल.

      Delete
  79. भाऊसाहेब, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.._/\_
    आशा करूयात कि ग्रामविकास विभागाप्रमाणे इतर सर्व शासकीय विभागांसाठीची समुपदेशनाचे धोरणाने होणारी बदली प्रक्रिया पारदर्शी होईल..
    धन्यवाद..!!

    ReplyDelete
  80. मानीव दिनांक मंजूर झाल्यानंतर वेतन निश्चिती करण्याबाबत मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
    Replies
    1. मानिव दिनांक मिळाल्या नंतर वेतन निश्चीती होत नाही. मानिव दिनांक हा फक्त जेष्ठता यादी मध्ये नाव समाविष्ठ करणे तसेच पदोन्न्ती करीता मानिव दिनांकाचा लाभ मिळतो.

      Delete
    2. एका कर्मचाऱ्यास अंधारखोली सहायक या पदावर 2002 मध्ये प्रत्यक्ष पदोन्नती मिळालेली आहे व नंतर क्ष.कीरण तंत्रज्ञ या पदावर 2009 मध्ये पदोन्नती मिळालेली आहे.परंतू आता त्या कर्मचाऱ्यास अंधारखोली सहायक पदाचा मानिव दिनांक 05.06.1993 हा मंजूर केलेला आहे व अशा वेळे त्या कर्मचाऱ्यास वेतनाचा लाभ द्यावा लागेल का

      Delete
    3. कृपया मानिव दिनांक कशा करीता मीळाला या आदेशाची प्रत WHATS APP वर पाठवावी. त्या नंतर योग्य ते सांगण्यात येईल.

      Delete
    4. आपणास जो मानिव दिनांक मिळाला तो बरोबर आहे. आपणास मानिव दिनांकाचा फायदा फक्त पदोन्नती करीताच मिळणार आहे या मध्ये आपली वेतन निश्चीती होणार नाही. दुसऱ्या कर्मचाऱ्यास जी पदोन्नती मिळाली ते तेथे पद असल्यामुळे मिळाली व आपल्याला नविन पद निर्माण झाल्यामुळे पदोन्नती मीळाला. त्यामुळे आपली वेतन निश्चीती होणार नाही. या मध्ये आपल्यावर काहीही अन्याय झालेला नाही.

      Delete
  81. सर, अनुकंपा तत्वावर मला एका दुसऱ्या खाजगी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेने ऑर्डर दिली,प्रस्ताव शिक्षण अधीकारी कार्यालयाला पाठवला असता,कार्यालयाने आपला सेवाजेष्ठता प्रमाणे आत्ता क्रमांक लागत नसल्याने पदाला मंजुरी देत येणार नाही असे सांगितले.माझ्या पुढे BA Bed 3 क्रमांक आहेत, पण मला नोकरीची अत्यावश्यकता असल्याने संस्थेने माजा विचार करून प्रस्ताव पाठवला होता,तो परत केला गेला, यावरती मला मार्गदर्शन मिळावे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या संस्थेने जरी आपला प्रस्ताव शिक्षण विभागाकडे जरी पाठविला असेल तरी तेथील जेष्ठता यादीला अनुसरूनच नियुक्ती होईल करीता संस्थेने प्रस्ताव पाठविल्यानंतर आदेश निघणार नाही त्या करीता आपणास काही काळ तरी प्रतीक्षा करावी लागेल. परंतु आपण सतत कार्यालयाचे संपर्कात रहावे.

      Delete
  82. सर एक मुलगी मध्‍यप्रदेश राज्‍याची रहिवासी आहे त्‍यांच शिक्षण मध्‍यप्रदेश राज्‍यातील बी.ए. उत्‍तीर्ण एवढ आहे. त्‍यांच लग्‍न महाराष्‍ट्र राज्‍यातील एका व्‍यक्‍तीसोबत झालेले आहे. मग ती मुलगी महाराष्‍ट्र राज्‍याची रहीवासी झालेली आहे. सदर मुलगी यांच संपुर्ण शिक्षण मध्‍यप्रदेश राज्‍यातील आहे तर सदर मुलगी महाराष्‍ट्र राज्‍यातील सरळसेवा भरती व्‍दारे महाराष्‍ट्रात नोकरी मिळविण्‍याकरीता तलाठी या पदासाठी अर्ज करु शकते काय. कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र जर प्राप्त झाले असेल तर ते महाराष्ट्रातील पदांसाठी अर्ज करू शकतात. अधिवास प्रमाणपत्र मिळण्यासाठी ज्या अटी असेल त्या ते जर पुर्ण करीत असेल तर मिळू शकते, तसेच गॅझेट मध्ये नाव बदलुन घ्यावे त्यामुळे बराच फायदा होईल. या बाबत तहसिल कार्यालयाशी संपर्क करून माहिती प्राप्त करून घ्यावी.

      Delete
  83. नमस्कार सर
    माझे वडील सरकारी कर्मचारी होते पण त्यांनी अचानक नोकरी सोडली आता त्यांचे भविष्य निर्वाह निधी मधील रक्कम काढायची आहे आता त्यांच्या ऑफिस वाले कर्मचारी सहकार्य करत नाहीत मला त्यांच्या भ.नी.नी. च्या खात्यातील शिल्लक कशी काय काढता येईल

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या वडीलांचे भविष्य निर्वाह निधीतील रक्कम मिळण्याबाबत आपणास या ब्लॉग वरील पेन्शन या टॅब वर जावून पेन्शन देयकाचे नमुने व आदेश या मध्ये जावून GPF या फोल्डर मध्ये जावून GPF NAMUNS FINAL BAGDE SDO हा डाऊन लोड करून त्यामध्ये माहीती सदरचा अर्ज कार्यालयास दिनांक न चुकता टाकून दयावा.
      परत 8 दिवसानी या पत्राचा संदर्भ देवून अर्ज करावा व त्यामध्ये विलंब झाल्यास व्याजाची मागणी करण्यात येईल असे नमुद करावे.
      आपल्या वडीलांनी नोकरी किती वर्षाची सेवा केल्यानंतर सोडली या बाबत सविस्तर लिहावे त्यांना कोणकोणते फायदे मिळाले / मिळाले नाही या बाबत मला सांगीतल्यास माझ्या कडुन काही मदत झाल्यास मी नक्की करील.

      Delete
    2. तिन प्रतीत अर्जा कार्यालयास द्यावा. त्यापैकी दोन महालेखाकार व एक प्रत कार्यालयास लागेल.

      Delete
  84. नमस्कार सर,
    माझा प्रश्न विभागीय परीक्षेसाठी मिळणाऱ्या प्रवास भत्ता व दैनिक भत्ता संधार्भी आहे. विभागीय परीक्षेकारिता मागील पहिल्या प्रयत्नाकरिता अधिकाऱ्यांनी प्रवास भत्ता व दैनिक भत्ता बिले टाकली होती . ती मंजूर होऊन त्यचे पैसे सुद्धा संदर्भीय अधिकार्यांना मिळाले आहेत . परंतु पहिल्या प्रयत्नान ते उत्तीर्ण झालेले नाहीत. दुसऱ्या प्रयात्नाकरिता परीक्षा दिल्यावर त्यांनी पुन्हा प्रवास भत्ता व दैनिक भत्ता मिळनेकारिता बिले सादर केलेली आहेत. तरी हि बिले त्यांना अनुदनेयआहेत का ? सर या संदर्भात काही शासकीय निर्णय किंवा काही असल्यास त्या बाबत आपले मार्गदर्शन लाभावे. धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. या ठिकाणी आपणास स्पष्ट करू ईच्छितो की, प्रवास भत्ता व प्रशिक्षण संधी याचा काहीही संबंध नाही. कर्मचारी अधिकारी यांनी शासकिय कामाकरीता किंवा कार्यालयाचे परवानगी प्रवास केला असेल तर त्यास प्रवासभत्ता हा द्यावाच लागतो, त्यामुळे त्यांना परिक्षेत कितीही वेळा जावोत त्यांना प्रवासभत्ता देय राहील. प्रवासभत्ता व परीक्षा संधी या बाबत कोणताही शासन निर्णय नाही. एका महीन्यापर्यत पुर्ण प्रवासभत्ता व त्यानंतर दर कमी होतो.

      Delete
  85. सर नमस्कार

    ReplyDelete
  86. नमस्कार सर,
    श्री.अबक यांची नियुक्ती दिनांक 1/8/2014 आहे. त्यांचा 2 वर्षाचा परिविक्षा कालावधी दिनांक 01/08/2014 ते 31/07/2016 असा आहे. तद्नंतर त्यांची सेवा असमाधानकारक असल्याने दिनांक 20 फेब्रुवारी, 2017 (म.नं.) पासून सेवा समाप्त केली व पुन्हा त्यांची सेवा समाधानकारक असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना सेवेत दिनांक 29.6.2017 (म.पू.) पासून पुर्नस्थापना करून परिविक्षा कालावधी दि.31 डिसेंबर, 2017 पर्यंत वाढविण्यात आला.
    सदर कालावधीत 1) दि.22/2/2016 ते 26/2/2016 = 5 दिवस अर्जित रजा, 2) दि.21/2/2017 ते 28/6/2017 = 128 दिवस विनावेतन व भत्ते असाधारण रजा व 3) दि.23/10/2017 ते 27/10/2017 = 5 दिवस अर्जित रजा अशा उपभोगलेल्या आहेत.
    आता श्री.अबक यांचा 2 वर्षाचा परिविक्षा कालावधी दि.1/1/2018 रोजी संपेल कि 138 दिवस पुढे वाढवून 17/5/2018 रोजी संपेल किंवा कसे ? कृपया याबाबत आपले मार्गदर्शन व्हावेत, हि विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. परिविक्षाधिन कालावधी हा 2 वर्षाचा आहे. त्यामुळे सदर अधिकाऱ्यास ज्या तारखेला रजा वजा जाता 2 वर्ष पुर्ण होतात त्या तारखेला त्याची परिविक्षाधिन कालावधी पुर्ण होतो. त्यामुळे त्यांना दिनांक 17/05/2018 ही तारीख अगदी बरोबर आहे. तसेच सेवेतील खंड 128 दिवसाचा शासनाकडुन क्षमापित करावा लागेल. कारण त्यांना सेवेतुन काढून टाकले व नंतर घेतले या बाबत योग्य ती खबरदारी घ्यावी.

      Delete
  87. सर परावर्तित रजेला जोडून बदली रजा घेऊ शकतो का?

    ReplyDelete
    Replies
    1. नाही. अर्जित रजा / परावर्तित रजा याला जोडुन नैमित्तीक रजा किंवा बदली रजा जोडुन घेता येत नाही. नैमित्तीक रजा व अर्जित रजा या मध्ये आपण ½ दिवस तरी उपस्थीत असने आवश्यक आहे. जसे कि आपण दिनांक 4 व 5 ला नैमित्ती रजेवर आहात व आपली अर्जित रजा दिनांक 6/6/2018 पासुन सुरू होत असेल तर आपणास दिनांक 5 ची अर्धा दिवसच रजा घ्यावी लागेल. व त्यानंतर आपणास गमन अहवाल सादर करावा लागेल.

      Delete
  88. सर नमस्कार,
    जर आपल्याला आपल्या गोपनीय अहवालात वरिष्ठांनी काय शेरा दिला आहे हे जर बघायच असेल तर कशा प्रकारे उपलब्ध करु शकतो कृपया मार्गदर्शन व्हावे

    ReplyDelete
    Replies
    1. गोपनीय अहवाल आता गोपनीय राहीलेले नाही. कार्यालयास अंदाजे सन 2013 पासुन गोपनीय अहवालाची छायांकित प्रत कर्मचाऱ्यास देवून त्यांची स्वाक्षरी घ्यावी लागते. जर आपणास गोपनीय अहवालाची प्रत जुलै 2018 पर्यत न मिळाल्यास आपण विभागीय आयुक्त यांचे कडे तक्रार करू शकता. सर्वांचे गोपनीय अहवाल लिहील्यानंतरच जुलै ची वेतनवाढ अधिकाऱ्यास देय आहे. आपणास जर मिळाले नसेल तर कार्यालयास अर्ज करावा व त्याची प्रत विभागीय आयुक्त यांना द्यावी.

      Delete
  89. महसुल खात्‍यातील वेतन वाढी रोखण्‍यासाठी अनु जाती जमाती च्‍या उमेदवारासाठी ि‍विभागीय दुसम सेवा परीक्षा संधीत सुट आहे काय1 शासन निर्णय व दिनांक

    ReplyDelete
    Replies
    1. कर्मचारी ज्या पदावर नियुक्त होतो ते पदास विभागीय परीक्षा आहे किंवा अर्हताकारी परीक्षा आहे हे पहावे लागेल. जर विभागीय परीक्षा असेल वर ते पास नाही झाले तर त्यांचे वेतनवाढ वयाचे ४५ पर्यत रोखुन आता ५० वर्ष झाले आहे रोखुन धरणे व रिलीज करणे थकबाकी नाही.

      Delete
  90. नमस्कार सर, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती मधील कृषी विस्तार अधिकारी एकाकी पद आहे का

    ReplyDelete
  91. सर नमस्कार,
    आमच्या निमशासकीय कार्यालयात कंत्राटी पध्दतीवर कार्यरत असलेले 10 शिपाई संवर्गातील कर्मचा-यांना कायमस्वरुपी समायोजन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. सदर कर्मचा-यांना देकार पत्रामध्ये वैद्यकीय अहवाल व पोलीस पडताळणी अहवाल सादर करणेबाबत कळविले होते. त्यानुसार त्यांनी दोन्ही अहवाल सादर केले असून त्यांना अहवाल सादर करण्याच्या दिनांकापासून नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत. सदर कर्मचा-यांमधील सेवाज्येष्ठता कंत्राटी पध्दतीवरील रुजू दिनांकानुसार राहील की नियुक्तीचे आदेश दिल्याच्या दिनांकानुसार सेवाज्येष्ठता राहिल. कृपया मार्गदर्शन व्हावेत, ही विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण शासन निर्णय हे आपणास भाग २० जेष्ठता सुची पान क्र. 225 वर मिळेल. (दिनांक 21 जून 1982 पहावे. ) बहुधा या ठिकाणी नियुक्तीच्या दिनांकापासुन धरण्यात येईल. कारण येथे परीक्षा घेण्यात आली नाही. यादीमध्ये नाव असेल त्या नुसार घेणे हे नियमानुसार आहे परंतु येथे नियुक्तीवर सुद्धा करू शकतात.

      Delete
  92. नमस्कार सर

    नवीन शासकीय सेवेत रुजू झाल्यावर येणारे काही प्रश्न कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती.

    १) एखादा कर्मचारी (वर्ग ३) हा शासकीय सेवेत नवीन रुजू झाला त्याचा प्रोबेशन २ वर्षाचा आहे तर त्याला अर्जित रजा
    पहिल्या वर्षापासून लागू होते की दुसर्या वर्षापासून? जर दुसऱ्या वर्षापासून असेल तर पहिल्या वर्षाच्या अर्जित रजा खात्यावर कधी जमा होतात? याबाबतचा नियम अथवा शासन निर्णय कोणता आहे?

    २) नवीन नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यास स्वग्राम आणि महाराष्ट्र दर्शन कधी घेता येऊ शकते? दोघांसाठी अर्ज करता येऊ शकतो का? अर्ज कसा करायचा? याबाबत शासन निर्णय कोणता आहे?

    ३) रक्तदान केल्यावर विशेष रजा मिळते का? मिळत असल्यास कोणत्या नियमानुसार व शासन निर्णयानुसार?

    ReplyDelete
    Replies
    1. 1.कर्मचारी ज्या दिवशी शासकिय सेवेत रूजू होतो तेव्हा पासुन सर्व प्रकारचे फायदे सुरू होतात. दिनांक 01/01/2018 रोजी व 01/07/2018 रोजी प्रत्येकी १५ दिवस अर्जीत व 10 दिवस अर्धवेतनी रजा ह्या 6 महीन्याकरीता असतात त्यामुळे कालावधी नुसार रजा धरावी. त्यामुळे आपणास पहील्या वर्षापासुन व रूजू दिनांकापासुन सूरू होईल.
      2. स्वगा्रम व रजा प्रवास सवलत या करीता सेवेची अट नाही फक्त गट वर्षात एकदाच मिळते.
      3. रक्त दान केल्यावर एका दिवसाची रजा मिळते. महाराष्ट नागरी सेवा रजा पहावे.

      Delete
    2. धन्यवाद सर

      Delete
  93. नमस्कार सर

    शासकीय कर्मचारी जर पती-पत्नी असतील व दोघे एकाच घरात भाड्याने राहत असतील तर अश्या परिस्थितीमध्ये घरभाडे भत्ता कोणास द्यावा? याबाबत शासन निर्णय अथवा नियम असेल तर माहिती मिळावी हि विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. ५ वे वेतन आयोगात आपण म्हणता तसे होते परंतु 6 वे वेतन आयोगानुसार दोघांनाही घरभाडे भत्ता मिळते. शासन निर्णय मिळाल्यानंतर पुरविण्यात येईल.

      Delete
  94. नमस्कार सर
    1) सर एखादा शासकीय कर्मचारी सेवेत कार्यरत असतांना इतर ठिकाणी सोसायटीची निवडणुक करणे, Audit करणे इ. कामे करु शकतो का जर करु शकत नसेल तर त्यावर काय कार्यवाही होऊ शकते

    ReplyDelete
  95. Hello Sir
    My question is What is the GPF interest Rates after june 2017

    ReplyDelete
    Replies
    1. Please go to Maharashtra.gov.in GR Mukhya prustha and go tlo kayde and niyam and surch vitta vibhag all GPF Rate recived

      Delete
  96. Income Tax सन 2016-2017 साठीची Excel Sheet मिळेल का
    Form no 16 तयार करणेसाठी हवी होती.

    ReplyDelete
  97. नमस्कार सर
    1) सर एखादा शासकीय कर्मचारी सेवेत कार्यरत असतांना इतर ठिकाणी खाजगी सोसायटीची निवडणुक करणे, निवडणूक अधिकारी म्हणून पेपर वर किंवा धनादेशावर स्वाक्षरी करणे, Audit करणे इ. कामे करु शकतो का जर करु शकत नसेल तर त्यावर काय कार्यवाही होऊ शकते

    ReplyDelete
    Replies
    1. जर एखादा शासकिय कर्मचारी हा खाजगी सोसायटी मधील पदावर असुन तो जर कोणत्याही प्रकारचे मानधन घेत नसेल तर मग तो काम करू शकतो, तपासणी करू शकतो. खाजगी अनुदानीत शिक्षक सर्व प्रकारे भाग घेऊ शकतात. या करीता म.ना.सेवा शिस्त व अपिल पहावे.

      Delete
  98. नमस्कार सर

    नवीन नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यास वैद्यकीय प्रतिपूर्तीचे नियम कधीपासून लागू होतात? तसेच याबाबत काही नियम अथवा शासन निर्णय आहे का? याबाबत मार्गदर्शन मिळावे हि विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. वैद्यकिय प्रतीपुर्ती या टॅब वर महाराष्ट्र वैद्यकिय प्रतिपुती अधिनियम 1961 मधील पहीले ५ पाने वाचावीत.

      Delete
    2. धन्यवाद सर

      Delete
  99. नमस्कार सर,
    आमच्या निमशासकीय कार्यालयात श्री.अबक यांचे दिनांक 17/10/2009 रोजी सेवेत असताना निधन झालेले आहे. त्यांचे नामनिर्देशन (Nomination) म्हणून पत्नी-50% व आई-50% आहेत. सध्या त्यांच्या आईला 50% ग्रॅज्युअटी देवू शकतो का ? आईच्या अर्जाची आवश्यकता आहे का ? तसेच दोन जामीनदारांचे क्षतिपूर्ती बंधपत्र घ्यावे का ? कृपया मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
    Replies
    1. कर्मचारी यांनी नामनिदेशनाद्वारे ज्यांची नावे टाकली असेल त्यांना GPF / GIS/Leave inchashment हे नमुद केलेल्या प्रमाणत (%) द्यावे लागेल. त्या साठी बंधपत्राची आवशक्ता नाही ही कार्यालयाने करावयाची कार्यवाही आहे. परंतु कुटूंब निवृत्ती वेतन हे फक्त पत्नीस द्यावे लागेल. बाकीच्यांनी हक्त दाखविल्यास त्यांनी न्यायालयातुन हक्त साबित करावा व न्यायालयाचे आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी. परंतु तो पर्यत पत्नीस द्यावेत.

      Delete
  100. नमस्कार सर

    एका कर्मचाऱ्यास एक मुल व त्यानंतर जुळे मुलं झालेले असल्यास जुळे मुले आजारी पडल्यास दोन्ही मुलांचे वैद्यकीय देयक कार्यालयास सादर करता येऊ शकतील का? कृपया नियम/शासन निर्णयासह मार्गदर्शन मिळावे हि विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. छोटे कुटूंब या व्याखेत दोन मुले आहे. ज्यांना पहीले एक मुल असेल व नंतर जुळे झाले असल्यास त्यांना आर्थिक सर्व फायदे मिळतात. शासन निर्णय या मध्ये छोटे कुटूंब ची अधिसुचना कृपया पहावी.

      Delete
  101. Namskar,Sir,
    1.sir 6 month chi prasuti raja purn zalyananatr pudhe rja vadhvn havi aslyas gheta yeil kay?
    2.ekhadya karnane sadar office ne varil rja denyas nakar dilyas tya babat takrar karta yeil ky
    3.garodar pani government hospital madhe treatment ghetli nahi pan 6 vya month madhe trust chya hospital madhe ragistrestion kele aslyas vaidyakiy pratipurti milel ky
    4.prasuti raja purn zalyas office madhe join vyayche aslyas tyasathi vaidyakiy certificate jodave lagel ky ani aslyas sadar certificate gov. hospital chech asne garjeche ahe ky


    ReplyDelete
    Replies
    1. 1. होय.
      2.नियमाप्रमाणे रजा द्यावीच लागेल
      3.होय
      4.होय परंतु प्रमाणपत्र हे जेथे आपण ईलाज केला त्या दवाखान्याचेच हवे, कार्यालयास वाटल्यास त्या प्रमाणपत्रावर Counted Sing जिल्हा शल्यचिकीत्सकाची मागवू शकतात.
      शासन निर्णय या टॅब मध्ये प्रसुती रजा पहावी.

      Delete
  102. सर नमस्कार
    अबक यांच्या पहिल्या पत्नीच निधन झाले आहे त्यांनी दुसर लग्न केल आहे. परंतू दुस-या पत्नीच नाव त्यांनी सेवापुस्तकात नोंदविलेल नाही. तर त्यांच्यावर काय कार्यवाही करण्यात येईल किंवा कसे याबाबत मार्गदशन व्हावे.

    ReplyDelete
    Replies
    1. पत्नी वारल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले असल्यामुळे कोणतीही कार्यवाही होणार नाही. व नामनिर्देशन हे ते सेवानिवृत्त पुर्वी करेल त्यामुळे कार्यालय काहीही करू शकत नाही. नामनिर्देशन करणे किंवा नाही करणे हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे.

      Delete
  103. नमस्कार सर

    मूल झाले की ज्या प्रमाणे महिला कर्मचाऱ्याला सुट्टी मिळते त्याप्रमाणे पुरुष कर्मचाऱ्यास पण सुट्टी मिळू शकते का? असल्यास कोणती सुट्टी मिळू शकते व कोणत्या नियम/शासन निर्णय द्वारे मिळू शकेते याबाबत मार्गदर्शन मिळावे हि विनंती.

    ReplyDelete
  104. संगोपन रजा ही फक्त मतीमंद मुलांचे बाबतीत मिळते

    ReplyDelete
  105. सर नमस्कार,
    जर एखादया कर्मचा-यांवर पोलीस स्टेशनला अदखपात्र गुन्हयाची नोंद झाली असेल तर कार्यालयात काही त्याबाबत फरक पडतो का कृपया मार्गदर्शन व्हावे

    ReplyDelete
    Replies
    1. अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यास त्याची बाधा शासकिय कर्मचाऱ्यास होत नाही, जसे की, एखादयाने तक्रार केली की मला शिवीगाळ केली / गाडी चालान झाली . ज्या मुळे त्या कर्मचाऱ्यामुळे त्याच्या विभागाची बदनामी होणार नाही असे कृत्य असेल तर कोणतीही कार्यवाही अपेक्षीत नाही. परंतु बदनामी होत असल्यास विभागीय चौकशी नेमु शकतात.

      Delete
    2. दि.२१-२-२०१८ ची अधिसुचना केव्हा पासुन लागु म्हणजे तारखे पासुन लागु आहे. जुने कर्मचारी यांना लागु आहे का? शासनाने स्पष्ट काही अधिसुचनेत दिले नाही .

      Delete
    3. दि.२१-२-२०१८ ची अधिसुचना केव्हा पासुन लागु म्हणजे तारखे पासुन लागु आहे. जुने कर्मचारी यांना लागु आहे का? शासनाने स्पष्ट काही अधिसुचनेत दिले नाही .

      Delete
  106. नमस्कार 🙏 सर
    मी अनुदानित आश्रमशाळेत प्रयोग शाळा परिचर या पदावर कार्यरत असून मला बारा वर्षा नंतर वरीष्ठ वेतन श्रेणी लागु होईल का?

    ReplyDelete

Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999

Pmo sep