Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे

October 13, 2019

NPS DCPS

भारत सरकारने काही वर्षांपूर्वी Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA) ह्या संस्थेअंतर्गत नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे. ही नवीन का? तर पूर्वी पेन्शन मधील रक्कम ही PF अकाउंट मधेच असायची आणि PF मॅनेजर्स ह्या बॅंकाच असल्यामुळे त्यावर साधारण दराने व्याज मिळायचे. थोडक्यात ते रिकरिंग फिक्स डिपॉझिट्स ह्या स्वरुपात असायचे. पण नवीन योजनेत मात्र ह्यातील रक्कम शेअर मार्केट मध्ये गुंतवली जाईल. थोडक्यात हे आता म्युच्युअल फंड च्या SIP सारखे असेल पण म्युच्युअल फंडासारखे कधीही पैसे मात्र काढता येणार नाहीत. ही योजना सर्वांना खुली असून ह्यात भाग घेणे हे ऐच्छिक आहे. (voluntary). पण प्रत्येक सेन्ट्रल गव्हर्न्मेंट नौकराला मात्र ही योजना बंधनकारक आहे.
योजना अशी काम करेल.
१. PFRDA संस्था बँकांना व पोस्ट ऑफिसना ही योजना चालवायला उद्युक्त करेन.
२. बँकेत जाऊन कोणीही (सरकारी, निम सरकारी, प्रायव्हेट, दुकानदार, व्यावसायिक इ इ) दोन प्रकारचे अकाउंट उघडू शकते. ( टियर १ आणि टियर २)
३. अकाउंट उघडल्यावर प्रत्येकाला त्याचा PRAN Happy (Permanent Retirement Account Number) मिळेल. नौकरी बदलली /सोडली तरी हा नंबर कायम राहील.
४. अकाउंट उघडल्यावर दरमहा धारक पैसे जमा करेल. ( दरमहा कमीत कमी ५०० रू टियर १ मध्ये तर १००० रू टियर २ रु ते कितीही).
५. धारकाला अकाउंट उघडतानाच फंड मॅनेजर निवडावा लागेल. उदा आयसिआयसिआय, रिलायन्स, आयडिएफसी, स्टेट बॅन्क इत्यादी )
६. धारकाचे पैसे वरील फंड शेअर बाजारात गुंतवतात.
७. टियर १ ही योजना कधीही बंद करता येते पण खात्यात पैसे मात्र वयाच्या ६० व्या वर्षीच मिळतील. त्या आधी काढता येत नाहीत.
८ टियर २ ही योजना कधीही बंद करता येते व पैसे उचलता येतात.
९ आपली रक्कम दुसर्‍या फंड मॅनेजरकडे वळवता येते.
१० साधी आणि सोपी योजना. म्युचवल फंडाचे फायचे पण फंड निवडायची कटकट नाही.
११. टियर १ मध्ये ६० वर्षानंतर ४० टक्के रक्कम ही विमा कंपनीत परत गुंतवावी लागते व उरलेली रक्कम एकरकमी उचलता येते.
१२. गुंतवणूक करण्यासाठी अ‍ॅटो (म्हणजे लाईफसायकल फंड) व अ‍ॅक्टीव चॉईस ( म्हणजे इक्वीटी, बॉन्ड इ इ) फंड उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment

Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999

Pmo sep