Regarding acceptance of previous service for retirement महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील प्रकरण-5 अहर्ताकारी सेवा नियम 30 ते 59 मध्ये सेवानिवृत्तीसाठी अहर्ताकारी सेवा कशी धरावी कोणती सेवा ग्राह्य धरले जाते व कोणती धरल्या जात नाही याबाबत या नियमांमध्ये सविस्तर माहिती प्रदान केली आहे त्या अनुषंगाने एक शासकीय कर्मचारी एका विभागातून दुसऱ्या भागांमध्ये जातो तेव्हा त्याची सेवा कशाप्रकारे ग्राह्य धरले जाते याचे विवेचन केले आहे त्याचे कृपया अवलोकन करावे
ग्राम विकास, शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 1990 नुसार जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग 3, जिल्हा सेवा वर्ग 3, जिल्हा सेवा वर्ग 4 मधील कर्मचारी दिनांक 1 मे 1962 रोजी जिल्हा परिषद अस्तित्वात आल्या तेव्हापासून सदर कर्मचाऱ्याने राजीनामा जरी दिला असेल तरी त्याची सेवा एका जिल्हा परिषद मधून दुसऱ्या जिल्हा परिषद मध्ये हे किंवा राज्यशासनाकडे पदावर त्यांनी नियुक्ती स्वीकारल्या असल्यास त्याची आधीची सेवा ग्राह्य धरला जाईल यामध्ये सदर कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगी किंवा अर्ज हा मार्फत सादर करावा.
महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 46 व 48 नुसार निवृत्तीवेतनासाठी सेवा ग्राह्य धरण्यात येईल.
नाशिक महानगरपालिका, नाशिक यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडील पूर्वीची सेवा जोडून देऊन वेतन संरक्षित करण्याबाबत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य, ग्रंथालय सेवा गट- अ या पदावर नामनिर्देशनाने नियुक्त केलेल्या श्री. यांची पूर्वीची सेवा जोडून देण्याबाबत.
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999