DCPS/NPS Scheme Member who died before completing 10 years of service
शासन निर्णय क्र. अनियो-२०१७/प्र.क्र. २९/सेवा-४/वित्त विभाग, मंत्रालय मुंबई/दिनांक २९/०९/२०१८ नुसार ज्या अधिकारी कर्मचारी यांना सेवेची १० वर्ष पुर्ण होण्यापुर्वीच निधन झाले अशांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान रूपये 10,00,000/- रूपये दहा लाख मिळतात
त्या करीता मृत कर्मचाऱ्यांचे कायदेशिर वारसदार यांनी कार्यालयास खालील प्रमाणे दस्ताऐवज पुरवावा. जेणे करून प्रस्तावात शासनाकडुन काही त्रुटी येणार नाही व रक्कम जलद गतीने आपणास मिळु शकते. या करीता Word मध्ये तयार केलेली संपुर्ण प्रकरण आपणास पुरविण्यात येत असुन त्यानुसार कार्यवाही योजावी.
मयत कर्मचाऱ्यांचे नामनिर्देशित व्यक्ती / कायदेशीर वारसदार यांनी परिशिष्ट-1 मध्ये सर्व माहीती भरुन सदरचा अर्ज हा कर्मचारी जेथे काम करीता होता तेथे द्यावा.
- त्यासोबत मृत्युचा दाखला,
- वारसा प्रमाणपत्र,
- तसेच आपणाकडे जर शासन सेवेतील नियुक्ती आदेश, तसेच डिसीपीएस / एनपीएस सभासद असल्याचे प्रमाणापत्र जर असेल तर ते अर्जासोबत जोडावे. ज्यामुळे कार्यालयास सर्व तयार दस्ताऐवज मिळाल्यास वेळ लागणार नाही. तसे सर्व दस्ताऐवज कार्यालयाकडे असतेच.
- कार्यालयाने मयत कर्मचाऱ्यांचे वारसदार यांचे कडुन आलेल्या अर्जाची तपासणी बारीकेने करावी जेणे करून शासनाकडुन प्रस्ताव आक्षेप लागुन येणार नाही.
- वासरदार यांचे कडुन परिशिष्ट १ बरोबर भरले की नाही ते पहावे नाव सर्व ठिकाणी सारखेच नोंदविले की नाही ते पहावे. जसे राव असेल तर सर्व ठिकाणी लावावे सोडु नये राम तर कोठे रामराव असे करू नये.
- परिशिष्ट १ व परिशिष्ट २ मध्ये सारखीच माहीती भरावी.
- वारसाचे मुळ प्रमाणपत्र जोडावे.
- नियुक्ती आदेश साक्षांकित करावी.
- शासकिय येणे नसल्याचे प्रमाणपत्र जोडावे.
- तसेच नामनिदेर्शन केले असल्यास त्याची प्रत व सेवापुस्तकातील नोंद सोबत जोडावी.
- नामनिर्देशित व्यक्ती / कायदेशीर वारसदाराचा अर्ज- परिशिष्ट-1 (मुळ प्रत)
- मृत्यूचा दाखला (मुळ प्रत)
- वारस प्रमाणपत्र (मुळ प्रत)
- कर्मचा-यांच्या शासन सेवेतील नियुक्ती आदेशाची सांक्षांकित प्रत
- कर्मचा-यांच्या सेवापुस्तकाचे प्रथम पान तसेच प्रथम नियुक्तीची नोंद असलेलया पानाची साक्षांकीत प्रत
- डिसीपीएस / एनपीएस सभासद असल्याचे प्रमाणापत्र
- कर्मचा-याकडून शासकीय येणे बाकी नसल्याचे प्रमाणपत्र
असे केले तर आपला प्रस्ताव शासनाकडुन मंजुर होईलच.
- WORD FILE करीता येथे क्लिक करावे. व त्यामध्ये दुरुस्ती करावी.
सानुग्रह अनुदान १० लक्ष
ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला असेल अशांही ही माहीती पोहचवावी. कर्मचाऱ्यांनास बऱ्याच गोष्टी माहीत नसतात तर त्यांचे कुटूंबीयांना कसे माहीत राहणार याची जाणीव ठेवून आपल्या बांधवांना मदत करावी.
Order Received From Government
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999