Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे

April 4, 2026

सेवार्थ प्रणालीतील अधिकारी कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणे बाबत

 सेवार्थ प्रणालीतील अधिकारी कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणे बाबत

सेवार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत ...27/03/2026

 

ई-केवायसी ही फक्त अधिकारी कर्मचारी यांना स्वत:च करावयाचे आहे.

ई-केवायसी ही पुर्ण आहे हे केव्हा समजायचे

  1. जर आपले गॅस ची सबसीडी ही आपले पगाराच्या खात्यात जमा होत असेल तर ई-केवायसी झाली.
  2. जर आपण 2-3 महीन्याआधी बँकेत जाऊन जर सॅलरी खात्याची केवायसी केली असल्यास करावयाची गरज नाही.
  3. जर आपण आयकर पात्र असुन जर आपणास सॅलरी खात्यात जर आयकर विभागाकडुन रि फंड आले असल्यास आपली पॅन खात्यासोबत ई-केवायसी जोडणी झाली आहे.

ई-केवायसी ही झाली नाही हे केव्हा समजायचे

  1. जर आपले गॅस ची सबसीडी ही आपले पगाराच्या खात्यात जमा होत न होता ईतर खात्यात होत असल्यास बँकेत जाऊन ई-केवायसी करावी.
  2. जर आपण आयकर पात्र असुन जर आपणास सॅलरी खात्यात जर आयकर विभागाकडुन रि फंड आले नसुन ते दुसऱ्या खात्यात जमा झाले असल्यास ई-केवायसी करावी लागेल.

 

 

1. आधार मॅपिंग स्टेटस तपासण्याची प्रक्रिया:
​१. वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये 'NPCI' सर्च करा आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) अधिकृत वेबसाइटवर जा.
२. पर्याय निवडा: होम पेजवर गेल्यावर 'Consumer' या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तिथे दिसणाऱ्या पर्यायांपैकी 'Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE)' हा पर्याय निवडा.
३. आधार तपशील भरा: आता एक नवीन पेज उघडेल. तिथे 'Aadhaar Mapped Status' या पर्यायावर क्लिक करा. तुमचा १२ अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा.
४. कॅप्चा कोड: स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड अचूकपणे भरा आणि 'Check Status' वर क्लिक करा.
५. OTP पडताळणी: तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. तो OTP प्रविष्ट करा आणि 'Confirm' बटणावर क्लिक करा.
६. स्थिती पहा: त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर आधार मॅपिंगची स्थिती दिसेल. यामध्ये आधार क्रमांक, मॅपिंग स्टेटस (उदा. Enabled for DBT), बँकेचे नाव आणि शेवटची अपडेट तारीख यासारखी माहिती असेल.
https://base.npci.org.in/base/homepage    https://base.npci.org.in/base/mapperStatus
 
2. आधार मॅपिंग स्टेटस तपासण्याची प्रक्रिया:

https://uidai.gov.in/

https://myaadhaar.uidai.gov.in/

https://tathya.uidai.gov.in/access/login?role=resident

Login to Aadhaar via OTP

Pan Details

https://www.incometax.gov.in/iec/foportal/ 

https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/login

 

शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण-2022/प्र.क्र.29/कोषा प्रशा-4 दिनांक 20/03/2026 नुसार ई-केवायसी प्रमाणपत्र

प्रति,

अधीक्षक अभियंता,

दक्षता व गुण नियंत्रण मंडळ,

अमरावती.

 

विषय :- सेवार्थ प्रणालीतील ई-केवायसी (E-KYC) पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणेबाबत.

महोदया,

              महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-2022/प्र.क्र.29/कोषा प्रशा-4, दिनांक 27 मार्च, 2026 अन्वये दिलेल्या सूचनांनुसार, मी याद्वारे प्रमाणित करतो/करते की,

 

  1. मी माझी ई-केवायसी प्रक्रिया वैयक्तिकरित्या पूर्ण केली असुन माझे बँक क्रमांक, आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक हे एकमेकांशी संलग्न केले आहे.

 

  1. ई-केवायसी पडताळणीनुसार माझा तपशिल खालील प्रमाणे आहे.

 

 

अ.क्र.नावबँक खाते क्रमांकIFSC कोडआधार क्रमांकपॅन कार्ड क्रमांकशेरा
1प्रमोद महादेव पुरी12345678901SBIN000001234567890112AAAA1234Aबँक, आधार व पॅन हे एकमेकांशी संलग्न आहे.
       

 

दिनांक :-     /       / 2026

ठिकाण :-

 

 

(कर्मचाऱ्याची सही व नाव)

पदनाम :-

PDF FILE

ई केवायसी प्रमाणपत्र

 

No comments:

Post a Comment

Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999

Pmo sep