Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे

July 5, 2026

८ वा वेतन आयोग: महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक विश्लेषणात्मक दृष्टिकोन

 ८ वा वेतन आयोग: महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक विश्लेषणात्मक दृष्टिकोन

महाराष्ट्राचा ८ वा वेतन आयोग कसा राहील. (8th Pay Commission at Maharashtra)

८ वा वेतन आयोग बाबत माहीती संकलीत केली असुन त्या नुसार अदांजे कसा राहील याची माहीती सादर करण्याचा प्रयत्न आहे हे माझे वैयक्तीक अभ्यासावरूनचे मत आहे. आपणास फक्त माहीती करून घ्यायची आहे, हा फक्त अंदाजच आहे. प्रत्यक्षात सन 2029 लाच समजेल तो पर्यंत आपल्या बुद्धीस तर्क वितर्क करण्यास चालना मिळावी व 2029 पर्यंतचा वेळ असाच निघुन जावा या करीता एक प्रयत्न.

८ व्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) सध्याची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:

८ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी १ जानेवारी २०२६ पासून अपेक्षित आहे. केंद्र सरकारने या संदर्भात १७ जानेवारी २०२५ रोजी अधिकृत अधिसूचना काढली होती आणि सध्या या आयोगाचे काम प्रगतीपथावर आहे. व केंद्र सरकारने वेतन आयोग लावल्यानंतर महाराष्ट्रात अंदाजे मे 2029 ला ८ व वेतन आयोग लागु होऊ शकते.

पाचवा वेतन आयोग वरून ६ वे वेतन आयोग लागताना 1.86 नुसार व ६ वे वेतन आयोगावरून ७ वे वेतन आयोग लागतांना 2.57 हा फिटमेंट फॅक्टर लागला होता तर  ७ वे वेतन आयोगावरून ८ वे वेतन आयोगात कीती फिटमेंट फॅक्टर होईल ते पाहू या.

  • ८ व्या वेतन आयोगासाठी तर्क आणि अंदाज
  • आता ७ व्या वेतन आयोगाकडून ८ व्या वेतन आयोगाकडे जाताना, नेमकी किती वाढ होईल, याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. महागाईचा दर, राहणीमानाचा खर्च आणि आर्थिक परिस्थिती यांचा विचार करता, यावर विविध मतप्रवाह असू शकतात.

विश्लेषणाचे मुद्दे:

  • आर्थिक निकष: वाढीव फिटमेंट फॅक्टर निश्चित करताना सरकार महागाई निर्देशांक (CPI) आणि महागाई भत्ता (DA) यांचा आधार घेते.
  • तुलनात्मक अभ्यास: ५ व्या ते ६ व्या (१.८६) आणि ६ व्या ते ७ व्या (२.५७) मधील फिटमेंट फॅक्टर पाहता, ८ व्या वेतन आयोगात ही वाढ कोणत्या पटीत असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
  • संभाव्य स्वरूप: जरी सध्या निश्चित आकडा सांगणे कठीण असले, तरी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आणि आर्थिक महागाई यांचा समतोल राखण्यासाठी सरकार एक योग्य फिटमेंट फॅक्टर निश्चित करेल, अशी अपेक्षा आहे.
  • आपण उदाहरण दाखल एका पदाचाच विचार करू व त्यानुसार ५% + - बदल राहू शकते.

 

  • ५ वे वेतन आयोगात कनिष्ठ लिपीक यांचे बेसीक हे 3050/- होते तर त्यांना ६ वे वेतन आयोगामध्ये रूपये 7730/- (5830+1900) वर निर्धारित केले आहे. या मध्ये 7730-3050=4680/-ची वाढ झाली आहे ती 1.53 ची वाढ झाली होती. तेव्हा पगाराची तपासणी केली असता 3050/- व त्यावरील 125 % महागाई भत्ता 3813/-असे मिळून             6063/- एवढी रक्क्म होत आहे. म्हणजेच 7730-6063=1667/- टक्कवारी मध्ये 27.49%

         Junior Clark यांचे ५ वे वेतन आयोगात 3050-75-3950-80-4590 या मध्ये बेसिक पे 4740/- होता महागाई भत्ता हा 1493/- व डिपी 2370/- असे एकुण 8603/- एवढे होत असुन 4740/- X 1.86 ने गुणुन 8816/- होत असुन पुर्णांकात 8820/- हे होत असुन त्यामध्ये ग्रेड वेतन रूपये 1900/- असे एकुण 10720/- ईतके होते. म्हणजेच 10720/- - 8603/- =2117/- ही 25% नी वाढ झाली आहे.  तसेच तसेच खालील‍ उदाहरणावरुन वाढ पाहू या

Sr No

 

Month

 

Admissible pay and allowancesDrawn pay and allowancediffarance
PayGRADE PAYD.ATotal AmountPayDearness payD.ATotal AmountPayD.ATotal AmountNet Amount% diff 
123456789101112131415 
  PB-1  5200-20200   Grade Pay  24003050-75-3950-80-4590
1Jan-068820190001072047402370149386033610-14932117211725% 
2Dec-0898401900258314323482024103904111344510-13213189318928.64% 

       

  • तर ७ वे वेतन आयोगानुसार कनिष्ठ लिपीक यांचे बेसीक हे 7730/- होते तर त्यांना 7 वे वेतन आयोगामध्ये रूपये 19900 वर निर्धारित केले आहे. या मध्ये 19900-17392=2508/-ची वाढ झाली आहे ती बेसीकचे 2.57 ची वाढ झाली होती. तेव्हा पगाराची तपासणी केली असता 7730/- व त्यावरील 125 % महागाई भत्ता 9663/- असे मिळून  17392/-  एवढी रक्क्म होत आहे. व ७ वे वेतन आयोगानुसार 19900/- व त्यावरील 0% महागाई भत्ता असे मिळून 19900/- एवढी रक्कम होत आहे. 2508/- एवढीच वाढ झाली आहे. ती टक्केवारी नुसार 14.42% एवढीच वाढ झाली आहे.
  • वरिष्ठ लिपीक यांची ७ वे वेतन आयोगात वेतननिश्चिती होतांना त्यांना खालील प्रमाणे वाढ झाली मात्र ७ वे वेतन आयोगात 2.57 ने जरी गुणाकार केला तरी तरी ते मुळ वेतन व ग्रेड वेतन याचेवर झाला असुन तेव्हा महागाई भत्ता हा 125% तर ७ वे वेतन आयोगात महागाई भत्ता हा 125% होता. त्यामुळे फिटमेंट फॅक्टर जरी 2.57 असेल तरी मात्र वाढ ही १३ ते १५ टक्केच वाढते हे खालील नुसार दिसेल.
  • ६ वे वेतन आयोगामधील बेसीक हे 10670/- ग्रेड वेतन 2400/- एकुण 13070/-X 2.57= 33584/- ही रक्कम S-8 - 25500 – 81100 या मध्ये रूपये 34300/- वर ७ व वेतन आयोगाचे नविन बेसिक झाले व त्यावरील 0/- टक्के महागाई भत्ता असे एकुण 34300 होत आहे व ६ वे नुसार बेसीक हे 13070/- व त्यावरील महागाई भत्ता +16338/- असे एकुण =29408/- होत असुन 34300/- -29408/- = 4892/- एवढीच वाढ ही वाढ 13% झाली आहे.
  • बाकी घरभाडे भत्ता हा लागु केला नव्हता तो 2019 ला सुरू केला व जे ६ वे प्रमाणे भत्ते मिळत होते तेच ७ वे वेतन आयोगात दिले त्यामुळे तो फरक येणार नाही. हे खालील उदाहरणावरून दिसुन येते ही रक्कम काल्पनिक नसुन दिलेली-घेतलेली आहे.

Sr No

 

Month

 

Admissible pay and allowancesDrawn pay and allowanceDiffaranceNet Amount% diff
PayD.AH.R.ATotal AmountPayGRADE PAYD.AH.R.ATotal AmountPayD.AH.R.ATotal Amount
1234567891011121314151617
  S-8 - 25500 - 81100PB-1  5200-20200   Grade Pay  2400  
1Jan-163430002614369141067024001633826143202221230-1633804892489213.25%
2Dec-183750033752860437351190024002030628603746623200-16931626912538626914.33%
   S-23 - 67700 - 208700 PB-3  15600-39100   Grade Pay  6600    
1Jan-168840006872952722776066004295068728418254040-4295011090221801109011.64%
2Dec-1896600869475121128063096066005333575129840759040-4464114399287981439912.76%

२.५७ हा गुणाकार केवळ पगार वाढीसाठी नाही, तर तो महागाई भत्ता विलीन करून मूळ वेतन वाढवण्याचा एक फॉर्म्युला आहे."

१. 'फिटमेंट फॅक्टर' चा खरा अर्थ (Composition of 2.57)

अनेक कर्मचाऱ्यांना वाटते की २.५७ ही थेट पगार वाढ आहे. प्रत्यक्षात, सरकारने २.५७ चा आकडा काढताना खालील घटक एकत्र केले होते:

  • ६ व्या आयोगातील मूळ वेतन + ग्रेड पे (१००%)
  • त्यावेळचा महागाई भत्ता (सुमारे १२५%)
  • सुधारणा/वाढ (साधारण ३२% च्या आसपास)

जेव्हा हे सर्व घटक एकत्र केले जातात, तेव्हा तो २.५७ चा 'मल्टिप्लायर' मिळतो. त्यामुळे, तक्त्यात दाखवल्याप्रमाणे, जेव्हा आपण ६ व्या आयोगातील १२५% महागाई भत्त्याची (जो 'Total' मध्ये मोजला जायचा)  त्यावर ७ व्या आयोगातील ०% महागाई भत्त्याशी करतो, तेव्हा 'निव्वळ वाढ' (Net Hike) ही १३ ते १५ टक्क्यांच्या दरम्यानच येणे हे गणितीदृष्ट्या अनिवार्य आहे.

तुम्ही ज्या प्रकारे 'Admissible Pay' आणि 'Drawn Pay' ची तुलना केली आहे, ती पगार तपासणीसाठी (Pay Verification) सर्वात योग्य पद्धत आहे.

  • १३.२५% ते १४.३३% (वरिष्ठ लिपीक) आणि ११.६४% ते १२.७६% (उच्च वेतन श्रेणी) या आकड्यांमधून एक गोष्ट स्पष्ट होते: ७ व्या वेतन आयोगाचा मूळ उद्देश 'पगार वाढवणे' हा नसून 'वेतन रचना सुटसुटीत करणे' (Restructuring) हा होता.
  • महागाई भत्ता १२५% वरून ०% वर आल्यामुळे, मूळ वेतनात मोठी वाढ होऊनही 'हातात येणारा पगार' (Take Home) यावर सुरुवातीला फारसा मोठा परिणाम झाला नाही.

३. हा परिणाम का जाणवतो?

याचे मुख्य कारण म्हणजे, ६ व्या वेतन आयोगात महागाई भत्ता (DA) हा मूळ वेतनापेक्षा जास्त (१२५%) होता. ७ व्या आयोगाच्या सुरुवातीला महागाई भत्ता शून्यावर आल्यामुळे, जुन्या 'Total' ची बरोबरी करायलाच नवीन 'Basic' ला खूप मोठा प्रवास करावा लागला.

टेबल आणि विश्लेषण हे केवळ एका कनिष्ठ किंवा वरिष्ठ लिपीकाचे नसून, हे वेतन निश्चितीतील (Pay Fixation) विसंगतींचे एक उत्तम दस्तऐवजीकरण (Documentation) आहे. अशा प्रकारचे विश्लेषण मुळे  वाढ समजून घेणे सोपे होईल.

तर आता महत्वाचा मुद्दा हा आहे की, ८ वा वेतन आयोगा कसा असेल?

प्रथम कमीत कमी वेतन किती राहील हे पाहूया

महाराष्ट्र शासनात ७ वे वेतन आयोगानुसार  कमीत कमी वेतन हे 15000/- होते. दिनांक 01/01/2026 रोजीचा महागाई भत्ता हा 62% आहे असे धरुन खालील प्रमाणे सुत्र होईल

मुळ वेतन रू 15000/-  महागाई भत्ता रू 9300/- एकुण 24300/- यावर घरभाडे भत्ता 1800/- प्रवास भत्ता 1250/- असे मिळून एकुण 27450/- एवढी रक्कम होत आहे.

27450/- यावर 16.50% वाढ धरली तर ती रूपये अंदाजे 32000/- एवढे कमीत कमी वेतन असुन शकते. याचाच अर्ध 32000/- - 15000 = 17000/- एवढी वाढ होत असुन ती  फिटमेंट फॅक्टर मध्ये 2.13 एवढी होते.

आता आपणाकडे फिटमेंट फॅक्टर  2.13 हा मिळालेला आहे त्यावरून ८ वे वेतन आयोगातील वेतनात वाढ पाहू या?

 

Sr No

 

Month

 

Admissible pay and allowances

 

Drawn pay and allowance

 

Diffarance% diff
PayD.AH.R.ATotal AmountPayD.AH.R.ATotal AmountPayD.AH.R.ATotal Amount
1234567910111213141516
1Jan-2632000018003380015000930018002610017000930007700

 

22.78%

2Dec-261074000108001174805040031248100809172857000-3124802575228.00%

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=bFwq7B55ztE[/embedyt]

या वरून असे दिसते की, ८ व्या वेतन आयोगात अंदाजे २५% सरसकट वाढ होऊ शकते. या मध्ये ५% कती किंवा जास्त होऊ शकते या पेक्षा जास्त नाही होणार.

या मध्ये वित्तीय संबंधीत स्लाईट मध्ये फोटो टाकावा

या मध्ये संकलन व कल्पना प्रमोद महादेव पुरी, शासकीय कर्मचारी सेवार्थ

Website :- https://pramodpuri.com

Blog :- https://pwamt.blogspot.com

Youtube Chanel :- https://www.youtube.com/c/PramodPuri/videos

Instagram :- https://www.instagram.com/shaskiya_karmachari_sevaarth/

Telegram :- https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl

८ वा वेतन आयोग - प्रमोद पुरी विश्लेषण

८ व्या वेतन आयोगाबाबत

No comments:

Post a Comment

Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999

Pmo sep