शासकीय कर्मचाऱ्याच्या /निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्यु नंतर Family pension after death of pensioner कुटुंबनिवृत्तिवेतन 1964 मंजुर करण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना-12 सुधारित करण्याबाबत
जेव्हा निवृत्तीवेतनधारक यांचा मृत्यु होतो तेव्हा त्याचे कुटूंबास कुटूंब निवृत्ती वेतन मिळते जसे की, पती किंवा पत्नी यांना निवृत्तीवेतनधारकाचे मृत्युनंतर लगेच सुरू होते. (परंतु निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यु नंतर जर पती किंवा पत्नी नसेल व मुलगा किंवा मुलगी लहान असेल तर त्यांना त्यांचे वयाचे अनुक्रमे १८ व २१ वर्षा पर्यंत कुटूंब निवृत्ती वेतन मिळते.)
कुटूंब निवृत्तीवेतन मिळण्यास काय करावे लागेल?
सर्व प्रथम निवृत्तीवेतनधारकाचा मृत्यु झाल्यानंतर लगेचच कोषागार कार्यालयास माहीती व लेखी अर्ज मृत्युच्या दाखल्यास सादर करावा. ज्यामुळे ते जिवंत असलेल्या तारखेपर्यतचे निवृत्ती वेतन देईल. जर मृत्यु नंतर पेन्शन खात्यात जमा झाली तर ती कोषागार कार्यालयास परत करावी लागते व त्यानंतरच कुटूंब निवृत्तीवेतन सुरू होईल.
कोषागार कार्यालयास कोणते कागदपत्र घेवुन जावे?
1.निवृत्तीवेतनधारक PPO क्रमांक असलेले पत्र
2. निवृत्तीवेतनधारकाचा मृत्युचा दाखला
3. ज्यांना कुटुब निवृत्तीवेतन मिळेल त्यांचे आधार कार्ड , पॅन कार्ड, बचत खाते धनादेश किंवा पासबुक,खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक,E-Mail address,जन्म तारखेचा पुरावा, फोटो
नमुना १२
नमुना १२ दिला असुन तो पुर्णपणे भरावा व त्यावर जेथे आपले बँक खाते आहे तेथील बँक मॅनेजर यांची सही व शिक्का घ्यावा किंवा निवृत्तीवेतनधारक जेथुन सेवानिवृत्त झाले असेल त्या कार्यालयातुन किंवा कोणत्याही राजपत्रित अधिकाऱ्याची सही व सिक्का घ्यावा. (पेन्शन बँक खाते संयुक्त असल्यास दोघांचा फोटो असलेला पुरावा त्यांना दाखवावा जेणे करून ते सहज स्वाक्षरी करेल. )
नमुना-12 (सुधारित)
[महाराष्ट्र नागरी सेवा (सेवानिवृत्त) नियम 1982 मधील नियम 136 (3)(ए) व (बी) आणि 144(2 ) (बी) (एक) सी (तीन) व डी (एक)] Family pension after death of pensioner
शासकीय कर्मचा-यांच्या /निवृत्तीवेतनाधारकाच्या मृत्युनंतर कुटुंब निवृत्तीवेतन 1964 मंजूर करण्यासठी करावयाच्या अर्जाचा नमुना.
[महाराष्ट्र नागरी सेवा (सेवानिवृत्त) नियम 1982 मधील नियम 136 (3)(ए) व (बी) आणि 144(2 ) (बी) (एक) सी (तीन) व डी (एक)]
शासकीय कर्मचा-यांच्या /निवृत्तीवेतनाधारकाच्या मृत्युनंतर कुटुंब निवृत्तीवेतन 1964 मंजूर करण्यासठी करावयाच्या अर्जाचा नमुना. Family pension after death of pensioner
प्रतिज्ञापत्र
प्रति,
अधिदान व लेखा अधिकारी/कोषागार अधिकारी, जिल्हा ………………………….
(1) मी, असे प्रतिज्ञापन देतो/देते की पुनर्विवाह केल्यास त्याची माहिती त्वरीत अधिदान व लेखा अधिकारी/कोषागार कार्यालयास कळविण्याची जबाबदारी माझी राहील. (फक्त विधुराच्या बाबतीत) Family pension after death of pensioner
(2) मी, असे प्रमाणित करतो/करते की मी राज्य/केंद्रीय सेवेत/शासन प्राप्तानुदान संस्था/महामंडळ इत्यादी च्या सेवेत नियुक्ती /पुनर्नियुक्त नाही.
किंवा
(3) मी असे कळवितो/कळविते की मी दिनांक ………………………… पासुन खालील कार्यालयाचे सेवेत नोकरी करतो/करते
(कार्यालयाचे संपुर्ण नाव व पत्ता देण्यात यावा)……………………………………………………..
(4) मी वरील क्र.(2) मधील कोणत्याही कार्यालयात नोकरी करीत नाही.
(5) दरवर्षी माहे नोव्हेंबर मध्ये हयातीचा दाखला, पुनर्विवाह पुनर्नियुक्ती/नियुक्ती याबाबतची वार्षिक /सहामाही प्रमाणपत्रे देण्यासंबधीच्या सर्व अटी मला मान्य आहेत Family pension after death of pensioner
(6) मी याव्दारे कुटुंब निवृत्तीवेतनाकरीता सादर केलेल्या अर्जातील अ.क्र.10 मध्ये नमुद केलेल्या बँकेला माझ्या वतीने माझी निवृत्तीवेतनाची रक्कम बँकेतील माझ्या एकाच नावाच्या बचत खात्यावर जमा करण्यासाठी, स्वीकारण्याचा प्राधिकार देत असून त्याशिवाय बँकेने माझ्या वतीने निवृत्तीवेतन स्विकारल्याबद्दल दिलेली पावती म्हणून बँकेने पासबुक किंवा बँक स्टेटमेंट मधील दिलेली नोंद ही कायद्याने ग्राहय समजण्याचाही प्राधिकार देत आहे Family pension after death of pensioner
(7) मी कुटुंब निवृत्तीवेतनाकरीता यसउा केलेल्या अर्जातील अ.क्र.11 मध्ये नमुद केलेले खाते परस्पर इतर बँकेत किंवा शाखेत ट्रान्सफर करून घेणार नाही. मला माझे निवृत्तीवेतन इता बँकेत/बँक शाखेत /इतर कोषागारामार्फत हवे असल्यास विहित पध्दतीने योग्य त्या कागदपत्रांसह अधिदान व लेखा कार्यालय / कोषागार कार्यालयास अर्ज सादर करीन.
(8) मी कुटुंब निवृत्तीवेतनाकरीता सादर केलेल्या अर्जातील अ.क्र.11 मध्ये नमुद केलेल्या बँक खाते क्रमांकात बदल किंवा सुधारणा झाल्यास तसेच अर्जात सादर केलेल्या इतर माहितीत बदल किंवा सुधारणा झाल्यास विहित पध्दतीने योग्य त्या कागदपत्रांसह अधिदान व लेखा कार्यालय / कोषागार कार्यालयास अवगत करीन.
(9) मी याव्दारे प्रतिज्ञापित करतो/करते की मला काही जादा रक्कम दिली गेली तर ती रक्कम मी आणि माझे वारस आणि उत्तराधिकारी यांना शासनाला परत करण्याचे दायित्व पत्करलेले आहे. तसेच निवृत्तीवेतन हे केवळ हयातीतच देय असल्याने माझ्या मृत्युची माहिती अधिदान व लेखा कार्यालय / कोषागार कार्यालयास व अ.क्र.11 मध्ये नमुद केलेल्या बँकेला लवकरात लवकर व कोणत्याही परिस्थितीत मृत्युच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत कळविण्याची जबाबदारी माझ्या वारस आणि उत्तराधिकारी यांची राहील.
(10) कुटुंब निवृत्तीवेतनातून आयकर भरणा करण्याची जबाबदारी माझी असल्याने कुटुंब निवृत्तीवेतनातून उगम आयकर कपात करण्यात आलेली नाही. ही बाब माला ज्ञात आहे.
(11) निवृत्तीवेतनविषयक सर्व सुचना नियम अटी व शर्ती प्रतिज्ञापन माल मान्य आहेत. मी कुटुंब निवृत्तीवेतनाकरीता सादर केलेल्या अर्जात सादर केलेली सर्व माहिती खरी आहे, ती चुकीची अथवा खोटी असल्यास मी कुटुंब निवृत्तीवेतनाकरीता अपात्र समजूर कारवाईस पात्र राहील.
Family pension after death of pensioner
दिनाक : आपला /आपली
ठिकाण :-
कुटुंब निवृत्तीवेतनधारक अर्जदाराची सही/अंगठा
पूर्ण नाव :
सुचना/नियम Family pension after death of pensioner
(अ) कुटुंब निवृत्तीवेतनाकरीता अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्युबाबत नोंदणी दाखल्याच्या मुळ प्रतीसह अर्ज सादर करणे अनिवार्य राहील.
(ब) मुळ निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्युनंतर त्यास अतिप्रदानित झालेल्या रकमेची वसुली होईपर्यंत कुटुंब निवृत्तीवेतनाकरीता केलेल्या अर्जावर कार्यवाही केली जाणार नाही.
(क) कुटुंब निवृत्तीवेतनाकरीता अर्ज सादर करण्यापूर्वी कुटुंब निवृत्तीवेतनधारक अर्जदारांनी त्यांचे एकाच नावाचे बचत खाते संबंधीत कोषागार कक्षेतील महाराष्ट्र शासनाने निवृत्तीवेतन प्रदानास प्राधिकृत केलेल्या बँकेच्या शाखेत उघडावे. (यात राष्ट्रीयकृत बँका, काही खाजगी व सहकारी बँकांचा समावेश आहे)
(ड) सर्व स्तंभामधील माहिती भरणे अनिवार्य आहे. अपात्र अवैद्य खोटया अपूर्ण चुकीच्या दिशाभुल करणा-या आणि फाटलेल्या अर्जावर कार्यवाही केली जाणार नाही. तसेच असे अर्ज अस्विकार करण्याचा अधिकार अधिदान व लेखा अधिकारी/कोषागार कार्यालयास राहील. या अर्जासोबत कागदपत्रे अथवा त्याच्या छायांकित प्रती जोडण्याची आवश्यकता नाही.
(ई) कुटुंब निवृत्तीवेतनधारक अर्जदारांनी त्यांचे नाव त्यांच्याकडील मुळे निवृत्तीवेतन प्रदान आदेशात कुटुंब निवृत्तीवेतनाकरीता नामांकित असल्याची खात्री करावी. तसेच नाव नसल्यास/नावात तफावत असल्यास योग्य दुरूस्तीनंतरच अर्ज सादर करावा.
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999