NPS राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील त्रुटीची पूर्तता करण्याबाबत
NPS महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, परिपत्रक दिनांक 4 डिसेंबर 2020 मध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन मध्ये बर्याचश्या त्रुटी राहून गेलेले आहे काही अपडेट व्हायचे आहे कर्मचाऱ्यांची माहिती अपूर्ण आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना लाभ देण्यास विलंब होते किंवा त्यांची रक्कम नोंदणीकृत खात्यामध्ये जायला पाहिजे त्याकरता उशीर होतो त्याअनुषंगाने शासनाने सदर चा शासन निर्णय काढलेला आहे,
NPS यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी त्वरित लाभ मिळावा या अनुषंगाने माहे फेब्रुवारी च्या वेतन देयका मध्ये प्रमाणपत्र दिल्याशिवाय देयक कोषागार घेणार नाही त्याकरिता शासनाने 14 बाबी निदर्शनास आणून दिले असून त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे, अन्यथा माहे फेब्रुवारी चे देयक अदा होणार नाही
1.सभासद नोंदणीस विलंब delay in subscriber registration.
जेव्हा कर्मचारी शासन सेवेत नियुक्त होतो तो रूजू झाल्यानंतर लगेचच त्याचा डीसीपीएस क्रमांक प्राप्त करून घ्यावा व त्यानंतर त्याचा प्रथम NPS DCPS क्रमांक करिता ऑनलाईन सेवार्थ मधून अर्ज कोषागारात सादर करावा व कोषागार ऑनलाईन अर्ज एन एस डी एल ला पाठवेल़,
आता NPS ही प्रोसेस ऑनलाइन झाल्यामुळे लवकरच प्राण क्रमांक पंधरा दिवसाच्या आत मिळेल या अनुषंगाने आपली माहिती निरंक असेल किंवा पेंडिंग असेल ते कोणत्या स्तरावर आहे याबाबत नमूद करावे
2. 30 सप्टेंबर 2020 अखेर नान आयआरए प्रान Non-IRA PRANS
मुद्दा क्रमांक सात मधील लॉगिन प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये प्राण डिटेल्स पाहिले असता त्यामध्ये जर काही कर्मचाऱ्यांच्या नावासमोर Non-IRA Decative असे दाखवत असेल तर त्याबाबतची माहिती या ठिकाणी कळवावी NPS
3. निरंक जमा प्रान Nil credit
कर्मचारी रुजू झाला असेल व त्याची आतापर्यंत रक्कम प्राण मध्ये जमा झाली नसेल तर त्याबाबतची माहिती या ठिकाणी द्यावी
4. नामनिर्देशन नसलेले प्रान PRANS without nomination details
सदर कर्मचाऱ्यांनी प्राण बाबत माहिती भरताना नामनिर्देशन केले किंवा नाही हे तपासून पाहत राहावे व जर केले नसेल तर त्यांचा फॉर्म s2 मध्ये माहिती भरून कोषागार कार्यालयात सादर करावा NPS
5. क्रमांक नसलेले प्रान PRAN without mobile number
कर्मचाऱ्याचा मोबाईल क्रमांक राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली जोडण्यात यावा व ईमेल आयडी सुद्धा जोडण्यात यावी ज्यामुळे त्यांना वेळोवेळी या बाबतची माहिती मिळेल
6. बँक तपशील नसलेले प्रान PRAN without bank details
त्यांच्या PRAN नंबर मध्ये जर बँकेचा तपशील नसेल IFSC CODE नसेल बँक अकाउंट डिटेल नसेल तर तो फॉर्म s2 मध्ये भरावा तसेच cra-nsdl यामधून भरता येते. NPS
7. आहरण व संवितरण अधिकारी यांचा लोगिन तपशील login details of reduce in functionally available in the NSDL system NPS
आहरण व संवितरण अधिकारी यांनी कोषागर आस मेल करून किंवा पत्र पाठवून त्यांच्याकडून राष्ट्रीय निवृत्ती प्रणालीची लॉगिन प्राप्त करून घ्यावी ती प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये बरेच माहिती आपल्या पाहण्यात येईल व त्यानुसार कारवाई करता येईल याबाबतची माहिती व्हिडिओद्वारे टाकण्याचा प्रयत्न केला जाईल.
8. अंशता रक्कम काढणे प्रलंबित प्रकरणे Number of pending partial exit cases
जर काही कर्मचाऱ्यांनी रक्कम काढणे करिता अर्ज केला असेल व तो पूर्णपणे निकाली निघाला नसेल तर याबाबतची माहिती या ठिकाणी भरावी
9. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतून बाहेर पडणे numbers of pending online exist cases
जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन इथून बाहेर बाहेर पडले असेल व त्यांची रक्कम अद्याप पर्यंत मंजूर झाली नाही त्यामुळे सदर चा डाटा पटलावर दिसत आहे त्यामुळे त्रुटीची पूर्तता करून त्वरित कागदपत्रे सादर करावी
10. नियत वय मर्यादा सेवानिवृत्त प्रकरणात दावा क्रमांक प्राप्त परंतु प्रत्यक्ष कार्यवाही नाही Claim ID generated but subscribers to be superannuated
ऑनलाइन पद्धतीने क्लेम आयडी जनरल झालेली आहे परंतु सदर कर्मचाऱ्यास अद्याप पर्यंत रक्कम मिळाली नाही त्यामुळे सदर प्रकरण हे पटलावर प्रलंबित दिसत आहे
11. नियत वयोमर्यादा सेवानिवृत्ती प्रकरणात सेवानिवृत्तीनंतर प्रकरण सादर न करणे non intiation station of online withdrawal even after superannuation
जे कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहे त्यांच्या निवृत्तीपूर्वी 180 दिवसा च्या आधी ऑनलाइन प्रक्रिया करावी क्लेम आयडी प्राप्त करावा व दस्तऐवज कोषागार कार्यालयास सादर करावे
12. नवीन प्रकरणात कागदपत्रे सादर नसलेली प्रकरणे Non submission of documents post authorisation of online withdrawals
दस्तऐवज कोषागार कार्यालयास सादर करावे
13. नियत सेवानिवृत्ती मधील विलंब झालेली प्रकरणे delay in subscriber exit under superannuation data व
विलंब बाबत त्वरित कारवाई करावी
14. वरील राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या व्यतिरिक्त दिनांक 31 मार्च 2015 पूर्वी सेवा समाप्त झालेल्या सभासद कर्मचारी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन बाबत
वरील प्रमाणे काम कसे करावे? NPS
सर्व प्रथम आपण कोषागार कार्यालयास पत्र पाठवून त्यांचे कडुन NSDL LOGIN प्राप्त करून घ्यावे व ते झाल्यानंतर येथे क्लिक करावे. https://cra-nsdl.com/CRA/
कोषागार कार्यालयाकडुन प्राप्त झालेला आयडी व पासवर्ड टाकावा व सबमिट करावे. NPS
ओपन झाल्या नंतर VIEW Subscriber List मध्ये जावून Subscriber List DOWNLODE करावे. व त्या नंतर EXCEL FILE सेव होईल ती उघडावी व त्या मध्ये कोणकोणती माहीती अपुरी आहे ती पहावी.
त्यानंतर TRANSACTION मध्ये जावुन Bank Detail Update करावेत. व त्यानंतर चेकबुक ची प्रत अपलोड करावी व माहीती सेव करावी. व त्याचीप्रिन्ट काढून कोषागार कार्यालयास सादर करावी.
तसेच सेवार्थ डीडीओ लॉगीने उघडुन तेथुन एस २ फार्म काढावा व तो कर्मचारी यांचे कडुन भरून त्यावर स्वाक्षरी घेवुन कोषागार कार्यालयास सादर करावा. NPS
उपरोक्त प्रमाण पत्र वेतन देयक सादर न केल्यास माहे फेब्रुवारी 2019 मार्च 2021 पासून ची देयके स्विकारले जाणार नाहीत
प्रमाणपत्र
प्रमाणित करण्यात येते की, शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक अनियो-1007/18/सेवा 4/ दिनांक 7 जुलै 2007 मधील परिच्छेद क्रमांक ६ (ड) अन्वये
1. या देयकात वेतन आहरीत केलेल्या ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू आहे त्यांचे प्रान क्रमांक प्राप्त झाले असून त्यांच्या वेतनातून योग्य दराने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची वर्गणी कपात करण्यात आली आहे
2. ज्या कर्मचाऱ्यांचे प्रान नॉन आयआए होते असे सर्व प्रान आयआए करून घेण्यात आले आहेत.
3. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत कपात केलेल्या सर्व सभासदांचे नामनिर्देशन, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी तसेच बँकेचा तपशील प्राप्त करून घेऊन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अद्यावत करण्यात आले आहेत.
4. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या डॅशबोर्डवर या महिन्यात लॉग-इन केले आहे व सभासदांची माहिती तपासली आहे.
जावक क्रमांक: का-4(1)/2021/ /दिनांक
प्रति,
वरिष्ठ कोषागार अधिकारी कोषागार कार्यालय, अमरावती.
विषय :- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील त्रुटींची पुर्तता करण्याबाबत.
संदर्भ :- महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, परिपत्रक क्र अंनियो-2020/प्र.क्र.37/सेवा-4 दिनांक 4/12/2020
---000---
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, या कार्यालयात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील ----- अधिकारी कर्मचारी कार्यरत असुन त्यापैकी https://cra-nsdl.com/ मध्ये ७ कर्मचाऱ्यां पैकी ------- कर्मचाऱ्यांची माहीती अद्यावत असुन -------- कर्मचाऱ्यांची माहीती पोर्टल मध्ये भरण्यात आली असुन ते आपणाकडे मंजुरीस्तव पाठविण्यात आली आहे.
तसेच जी माहीती आपणास अद्यावत करणेस्तव पाठविण्यात आली आहे ती खालील प्रमाणे अद्यावत करावयाची असुन त्या अनुषंगाने सदर कर्मचारी यांचे रद्द केलेला धनादेश, पॅन कार्ड या सोबत पुरविण्यात येत आहे तरी सदरची माहीती अद्यावत करावी ही विनंती. तसेच संदर्भिय परिपत्रकातील एकुण १४ मुद्दे पैकी मुद्दा क्र. ५ व ६ अद्यावत होणे बाकी आहे.
Sr. No. | PRAN | Name | अद्यावत | करावयाची | माहीती | ||
E-mail ID | PAN No | Mob. No | Bank A/C | IFSC Code | |||
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 |
सहपत्र:- वरिल प्रमाणे
आहरण व संवितरण अधिकारी
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999