OPS-NPS-RNPS-UPS comparison table
OPS निवृत्तीवेतन 1982, NPS राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली, RNPS सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना व UPS एकीकृत निवृत्तीवेतन योजना या पैकी आपणास OPS निवृत्तीवेतन 1982 सोडुन एकाची निवड करावी लागेल ही करतांना आपला आपल्या कुटूंबाचा व आपल्या पुढील आकांशा याचा विचार करूनच विकल्प द्यावा.
ज्यांची सेवा कमी झाली आहे त्यांना मी एक्सेल चे माध्यमातुन सांगीतले आहे. की कोणास कसा फायदा होतो, आपण भविष्यात होणाऱ्या वाढीचा विचार करीत आहो, ते एक मृगजळ आहे. आपले पैसे हे शेअर मार्केट मध्ये गुंतविले जातात त्या मुळे जोखीम आहे तसेच फायदा पण आहे, त्यामुळे आपणास दुसरा जर काही सांगत असेल तर ते निट तपासुन पहावे. त्याची व आपली दोघांची तुलना करावी व मगच निर्णय घ्यावा.
आपण काय निवडले तर कसे होईल ते पाहू या.
मिळणारे निवृत्ती वेतन
Sr.No | Deails | Amount |
1 | Last Basic | 44400 |
2 | Pension Basic | 22200 |
3 | D.A | 43068 |
4 | Pension | 65268 |
मिळणारे कुटूंब निवृत्ती वेतन
Family Pension Calculation after 10 or 7 or 65 years | |
Family Pension | 13320 |
D.A | 25841 |
Total Family Pension | 39161 |
NPS मध्ये जमा होणारी अंदाजित रक्कम
40% वर पेन्शन | 3830901.6 |
60% मिळालेली रक्कम गुंतवणुक केल्यास | 5746352.4 |
100% आपली एकुण जमा रक्कम | 9577254 |
जर आपण NPS हे निवडले तर आपणास मिळणारे निवृत्ती हे RNPS/UPS चे तुलनेत अंदाजे २५% कमी मिळू शकते असे धरावे. जास्त पण होईल परंतु ते लक्षात घेऊ नये.
परंतु या मध्ये एक असा फायदा आहे की, जर आपण आत्ता पासुन बचत करण्यास तयार असेल व पुढचे नियोजन करीत असाल तर आपणास मिळणारी 60 टक्के रक्कम रूपये अंदाजे ५७ लाख ही आपले जवळ राहील व त्याचे जर चांगले नियोजन केले तर त्यावर चांगला परतावा मिळू शकते. व पती पत्नी यांचे मृत्यु नंतर आपल्या मुलांना ४० टक्के रक्कम रूपये ३८ लाख मिळेल. परंतु हे RNPS/UPS मध्ये होणार नाही परंतु निवृत्ती वेतन हे ops प्रमाणे मिळेल. परंतु या मध्ये आपणास अंदाजे ९५ लाख रूपये सोडावे लागेल. जे उदाहरणावर दिले आहे.
या बाबत मी सविस्तर माहीती व्हिडीओ मध्ये देतो. ती पहावी व विचार करावा. त्यानंतरच विकल्प द्यावा.
आपणास NPS-RNPS-UPS या मधीलच एक पर्याय निवडावा लागेल त्यामुळे फक्त आपण यावरच लक्ष केंद्रीत करावे.
OPS-NPS-RNPS-UPS comparison table G.R.
Excel File for comparison
OPS-NPS-RNPS-UPS comparison table
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999