सेवार्थ मध्ये कर्मचाऱ्यांचा तपशिल कसा बदलावा.
जसे आधार, पॅन, जन्म तारीख, रूजू तारीख, नाव, पदनाम ई-मेल,भ.नि.नीधी क्रमांक, पोस्ट, पत्ता,अपंगत्व,सही, फोटो व ईतर बाबी कशा व त्याचा कोणास अधिकार आहे?
A Blog on welfare and information for employees of Maharashtra State Government.
सेवार्थ मध्ये कर्मचाऱ्यांचा तपशिल कसा बदलावा.
जसे आधार, पॅन, जन्म तारीख, रूजू तारीख, नाव, पदनाम ई-मेल,भ.नि.नीधी क्रमांक, पोस्ट, पत्ता,अपंगत्व,सही, फोटो व ईतर बाबी कशा व त्याचा कोणास अधिकार आहे?
End Service in Sevaarth
सेवार्थ मधील सेवा एन्ड कशी करावी?
तसेच एका विभागातुन दुसऱ्या विभागात नव्याने रूजु झाले असतांना काय कार्यवाही करावी?
किंवा कर्मचारी यांनी विभागाची परवानगी न घेता वरिष्ठ पदाची किंवा इतर पदाची परीक्षा दिली असता ते जर दुसऱ्या विभागात रूजु झाले असेल किंवा होणार असेत तर काय करावे?
जेव्हा कर्मचारी हा कार्यालयाची परवानगी न घेता परीक्षा पास होवून ईतर विभागात किंवा आपलेच विभागात जातो तेव्हा बरेचसे कार्यालय हे त्यांची सेवा एंन्ड करतात परंतु हे योग्य नाही, सेवा न संपविता End Service in Sevaarth न करता त्यांची बदली L.P.C. मध्ये Other Treasury दाखवावी. असे जर केले नाही तर सदर कर्मचाऱ्यास नविन विभागात रूजु झाल्यानंतर त्याचे वेतन निघत नाही व त्याला बराच कालावधी लागतो. व हे आपल्या एका छोटयाश्या माहीतीच्या अभावामुळे होते.
जर आपण एखादया कर्मचाऱ्याची सेवा संपवीली End Service in Sevaarth तर काय होईल, तो जेव्हा दुसऱ्या कार्यालयास आपला सेवार्थ आयडी तयार करेल तेव्हा त्यांस आपण यापूर्वीच रजिस्टर आहात असा मेसेज येईल. त्यामुळे काही काही कर्मचारी त्यांचे नावासमोर एखादा a लावतात किंवा काढतात परंतु हे करणे योग्य नाही. त्यामुळे आपले आजचे काम होत असेल तरी पुढे त्या कर्मचाऱ्यास अडचण निर्माण होते.
1. जुन्या कार्यालयाने सेवाEnd Service in Sevaarth न संपविता त्यांना Other Treasury LPC तयार करतांना करावे किंवा तसे न करता सेवा संपविल्यास नविन कार्यालयातुन एक कोषागार कार्यालय व सेवार्थ यांना मेल करावा. ई-मेल आय डी. helpdesk.mum-mh@gov.in व आपले कोषागार करीता mum चे ठिकाणी आपल्या कोषागार कार्यालयाचे जिल्हाचे ३ अक्षर घ्यावेत. व मेल करतांना आपले कार्यालयाचा युझरआडी व पासवर्ड Assi & DDO यांचा द्यावा व जुन्या कार्यालयाचा सुद्या द्यावा.
2. जर जुने कार्यालय त्यांचे पासवर्ड देत नसेल तर सेवार्थ यांना मेल करावा व संपर्क साधावा ते सदर कर्मचाऱ्यास आपल्या कार्यालयास जोडून देईल. व त्यांनी पासवर्ड दिला तर सेवार्थ हे जुन्या कार्यालयास सदरचा कर्मचारी यांची सेवा समाप्त End Service in Sevaarth केलेली परत करेल व जुने कार्यालय हे त्याची LPC other Treasury किंवा आपल्या ddo क्रमांकावर पाठविल.
प्रशासकिय-विनंती बदली झाल्यानंतर अधिकारी कर्मचारी यांना सेवार्थ मध्ये कसे रूजू किंवा रिलीव्ह कसे करावे या बाबत या व्हिडीओ मध्ये माहीती सांगण्यात आली असुन त्या नुसार स्टेप बाय स्टेप करावे जेणे करून अडचण येणार नाही.
Revenue Stamp Deduction in Salary
वित्त विभाग मंत्रालय मुंबई , यांचे पत्र दिनांक 27 जुलै 2020 नुसार वेतन अदा करताना घेण्यात येणाऱ्या रुपये किमतीच्या मुद्रांकाची रक्कम सेवार्थ प्रणालीतुन शासन खाती जमा करण्यास मान्यता देणेबाबत पत्र दिले असून त्या अनुषंगाने सेवार्थ प्रणाली मध्ये मुद्रांक रक्कम एक रुपयाची सेवार्थ मध्ये कसा टाकावा याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार आपण सुरुवातीला DDO मध्ये जाऊन यापूर्वी अदर रिकव्हरी मध्ये एक रुपया मुद्रांक रेव्हेन्यु शुल्क घेतला असून ती टॅब रद्द करावी व डिडक्शन मध्ये जाऊन रेव्हेन्यु स्टॅम्प याला निवडावे .
work list payroll ┘employees eligibility for allowances and deduction┘ in bulb select type of component┘ deduction select pay┘ revenue stamp┘ select pay bill group┘ and apply to to employees in Bill group┘ and select in group employees name and save.
सेवार्थामध्ये Income Tax व संपुर्ण वर्षाचा पगार कसा पहावा.