शासन अधिसूचना दिनांक 6 जून 2017 नुसार वर्ग 4 मधून वर्ग 3 मध्ये जाण्याची पात्रता ही पदवी अशी अर्हता ठेवण्यात आली होती परंतु त्यानंतर काही संघटनांनी शासनाशी पत्रव्यवहार करून सदर शासन निर्णय मध्ये बदल करण्याबाबत विनंती केल्यानुसार त्यानुसार शासनाने सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक 11 जून 2019 नुसार लिपिक टंकलेखक गट क सेवा प्रवेश सुधारणा नियम 2019 केला असून सदरच्या नियमाची अंमलबजावणी ही दिनांक 6 जून 2017 पासून लागू केली आहे त्या अनुषंगाने सर्वांना कळविण्यात येते की, दिनांक 6 जून 2017 चे अधिसूचना मधील खंड क मध्ये पदवी अह्रता दिली असून ती 11जुन 2019 च्या अधिसूचनेनुसार नियम खंड क च्च्या उपखंड तीन मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे अशा व्यक्तींना नियम प्रसिद्ध होण्याच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षापर्यंत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अंतर्गत पदोन्नतीचा विचार करण्यात यावा असे स्पष्ट केले आहे.
बहुतांश कार्यालय हे दिनांक 11 जून 2019 या तारखेपासून पुढील पाच वर्षांकरिता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असे धरून त्यांना 11 जून 2019 पूर्वी जेष्ठता यादी मध्ये घेत नाही. परंतु सदरच्या निर्णयांमध्ये हा लागू दिनांक 6 जून 2017 पासून अमलात येईल असे म्हटले आहे त्यामुळे यावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा चुकीचा निर्णय घेऊ नये.