शासन अधिसूचना दिनांक 6 जून 2017 नुसार वर्ग 4 मधून वर्ग 3 मध्ये जाण्याची पात्रता ही पदवी अशी अर्हता ठेवण्यात आली होती परंतु त्यानंतर काही संघटनांनी शासनाशी पत्रव्यवहार करून सदर शासन निर्णय मध्ये बदल करण्याबाबत विनंती केल्यानुसार त्यानुसार शासनाने सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक 11 जून 2019 नुसार लिपिक टंकलेखक गट क सेवा प्रवेश सुधारणा नियम 2019 केला असून सदरच्या नियमाची अंमलबजावणी ही दिनांक 6 जून 2017 पासून लागू केली आहे त्या अनुषंगाने सर्वांना कळविण्यात येते की, दिनांक 6 जून 2017 चे अधिसूचना मधील खंड क मध्ये पदवी अह्रता दिली असून ती 11जुन 2019 च्या अधिसूचनेनुसार नियम खंड क च्च्या उपखंड तीन मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे अशा व्यक्तींना नियम प्रसिद्ध होण्याच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षापर्यंत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अंतर्गत पदोन्नतीचा विचार करण्यात यावा असे स्पष्ट केले आहे.
बहुतांश कार्यालय हे दिनांक 11 जून 2019 या तारखेपासून पुढील पाच वर्षांकरिता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असे धरून त्यांना 11 जून 2019 पूर्वी जेष्ठता यादी मध्ये घेत नाही. परंतु सदरच्या निर्णयांमध्ये हा लागू दिनांक 6 जून 2017 पासून अमलात येईल असे म्हटले आहे त्यामुळे यावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा चुकीचा निर्णय घेऊ नये.
अतिरिक्त संवर्ग कक्षाच्या आदेशानुसार समायोजनाने दुसऱ्या विभागात पदस्थापना झाल्यानंतर समायोजन झालेल्या दिनाकापासून पदोन्नती स पात्र असतो का?? व सेवा 10 वर्षापेक्षा जास्त झालेली असल्यास??
ReplyDeleteबरोबर आहे,सर
ReplyDeleteनमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की गट ड कर्मचाऱ्यांना त्यांच्या शिक्षणा प्रमाणे पदोन्नती मिळेल का असेल तर तसा शासन निर्णय द्या प्लीज
ReplyDeleteमी वर्ग चार शिपाई पदी दहावी उत्तीर्ण या पात्रतेवर दि 1/9/2008 रोजी शासकीय सेवेत भरती झालो, दि 31/08/2011 रोजी तीन वर्षे सेवा पूर्ण व एमएससीआयटी प्रमाणपत्र धारण करीत असताना आणि टंकलेखन परीक्षा दिलेली असताना परंतु मे 2012 मध्ये घेण्यात आलेली टंकलेखन परीक्षा शासनाकडून पुढे ढकलण्यात आल्याने टंकलेखनाचे प्रमाणपत्र प्राप्त नसल्याने विभागीय पदोन्नती समितीकडून जून 2012 मध्ये मला वर्ग-3 लिपिक पदी पदोन्नतीसाठी डावलण्यात आले.
ReplyDeleteपरंतु माझ्यापेक्षा सेवा कनिष्ठ वर्ग-4 पदावरील कर्मचाऱ्यांना वर्ग-3 पदी पदोन्नती त्यावेळी देण्यात आलेली होती. तद्नंतर मला ऑक्टोंबर 2012 मध्ये टंकलेखनाचे प्रमाणपत्र प्राप्त होताच मार्च 2013 साली लिपिक-टंकलेखक पदी पदोन्नती देण्यात आली. माझ्यासोबत भरती झालेले आणि मला सेवा कनिष्ठ असलेले वर्ग चार पदावरील कर्मचारी हे सध्या वरिष्ठ लिपिक पदावरती कार्यरत असून मी सध्या कनिष्ठ लिपिक म्हणून काम करीत आहे. मला माझ्यासोबत भरती झालेले आणि मला सेवा कनिष्ठ असलेले वर्ग चार पदावरील कर्मचारी जे वरिष्ठ लिपिक पदावर आहेत, त्या पदाचा लाभ किंवा मानीव दिनांक अनुदेय आहे का
सर मला शासकीय सेवेत लागून पुढच्या महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहे तरी माझा नावाचा प्रस्ताव पदोन्नतीसाठी पाठवला जाऊ शकतो का किंवा आता निवड करून ठेऊन तीन वर्षे पूर्ण झाल्यावर पदोन्नती देण्यात यावी अशी अट टाकून समितीला माझ्या नावाचा विचार करता येऊ शकतो का कृपया माहिती द्यावी
ReplyDeleteकोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती करता कमीत कमी तीन वर्षाची सेवा, विभागीय परीक्षा असल्यास ती उत्तीर्ण, गोपनीय अहवाल, व जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास असणे आवश्यक आहे
ReplyDeleteनमस्कार सर,
ReplyDeleteमला सा.प्र.वि. च्या दि.3.6.2011 च्या शासन निर्णयान्वये मुळ विभागातील कनिष्ठ लिपिक पदाची 4 वर्षांची सेवा बजावून आंतरविभागीय बदलीने दूसऱ्या विभागात समकक्ष पदावर शुन्य ज्येष्ठतेवर रुजू होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. नवीन विभागाची खातेपरीक्षाही उत्तीर्ण केली आहे. तरी मला पदोन्तीन साठी निम्नमदावरील सलग 3 वर्षांची सेवा पुर्ण असण्याची अट लागू होईल काय किंवा कसे त्याबाबत मार्गदर्शन करावे.
namaskar sir
ReplyDeletemi 2017 sli shaskiya sevet ruju zalo asun mala 07/08/2020 roji 3 varsh zale ahet mazyakde 12vi chi pariksha uttirn pramanpatra mscit che pramanpatra ahe tr mi lipik padasati patra rahu shakto ka ki nhi , lipik padasati padavidhar asava lagto ki nhi
6-6-2022 paryant 12vi base var padonnati hou shakte
ReplyDelete