सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तसेच कार्यालयातील जो कर्मचारी पेन्शन तयार करतो त्यांनी कोणती काळजी घ्यावी? तसेच कोणते कागदपत्रे द्यावीत.
निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरीता सुधारणा करुन एकत्रित नमुना
A Blog on welfare and information for employees of Maharashtra State Government.
सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तसेच कार्यालयातील जो कर्मचारी पेन्शन तयार करतो त्यांनी कोणती काळजी घ्यावी? तसेच कोणते कागदपत्रे द्यावीत.
निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरीता सुधारणा करुन एकत्रित नमुना
दिनांक एक नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 31 ऑक्टोबर 2005 अन्वये नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे व या योजनेची अंमलबजावणी दिनांक 17 जुलै 2007 अन्वये ठरविण्यात आली आहे. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना - राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत जे कर्मचारी 2005 नंतर लागले आहे त्यांना सेवानिवृत्ती वेतन नसल्यामुळे त्यांची जमा झालेली रक्कम ही त्यांचे एनपीएस अकाउंट मधून कशी काढावी याबाबत काय पद्धत आहे व ही रक्कम काढण्याचा कोणाला अधिकार आहे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तपशिलासह रक्कम cra-nsdl मधुन NPS कशी काढावी याबाबतची माहिती पाहू या.
सर्वप्रथम आपण कोषागार कार्यालयात एक पत्र लिहावे व त्यामध्ये नोडल ऑफिसर किंवा पी ओ पी एस पी यांचे पासवर्ड मिळण्याबाबत अर्ज करावा व त्यामध्ये आपला डी डी ओ कोड व कार्यालयाचे नाव नमूद करावे सदरचे पत्र ईमेल करावे. त्यानंतर आपणास कोषागार कार्यालयाकडून cra-nsdl चा यूजर आयडी मिळेल व त्यासोबत पासवर्ड मिळेल हा मिळालेला पासवर्ड सी आर ए एन एस डी एल या वेबसाईटवर जाऊन तेथे टाकावा व तेथे कशाप्रकारे काम करावे याबाबत या व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे कृपया त्याप्रमाणे करावे.
Interest rate for the DCPS Contribution for the year 2016-17 and 2017-18.