६ वे वेतन आयोगानुसार अंशराशीकरण मिळाले असेल व त्यांचा मृत्यु झाला असल्यास ७ वे वेतन आयोगानुसार कुटूंबनिवृत्तीवेतन धारकास अंशराशीकरणाची रक्कम मिळते.
जे शासकिय कर्मचारी अधिकारी हे दिनांक 01/01/2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त-स्वेच्छा निवृत्त किंवा मयत झाले असेल अशांना जर ६ वे वेतन आयोगानुसार अंशराशीकरण मिळाले असल्यास त्यांचे मृत्यु नंतर कुटूंब निवृत्ती वेतन घेणाऱ्यास किंवा त्यांचे वारसानां अंशराशीकरणाची ७ वे वेतन आयोगानुसार रक्कम मिळतेच.
Pay difference amount of commutation of pension between Sixth Pay Pension and Seventh Pay Pension to the pensioner who have been given earlier commutation benefit on basic pension of Sixth Pay Commission with period from 01 Jan 2016 to 31 Dec 2018 of Commutation of Pension Commutation of Pension Application अर्जाचा नमुना
मधील नियम १० नुसार जर एखादया कर्मचारी यांनी या पुर्वी जर अंशराशीकरण घेतले असेल व शासनाने भूतलक्षी प्रभावाने जर अंशराशीकरणात वाढ झाली असेल तर अशा प्रकरणी कर्मचाऱ्यास नव्याने अर्ज सादर करण्याची गरज असे नमुद केले आहे. त्यामुळे कार्यालयास अर्ज करावयाची आवशकता नाही परंतु कार्यालयातील कामकाज कोणतेही पत्र आल्याशिवाय कोणी करावयास तयार होत नाही त्यामुळे खालील प्रमाणे अर्ज कार्याल्यास सादर करावा. नियम १० मधील उतारा खालील प्रमाणे आहे. Commutation of Pension Commutation of Pension Application अर्जाचा नमुना
Retrospective revision of final pension An applicant who has commuted a fraction of his final pension and after commutation his pension has been revised and enhanced retrospectively, as a result of Government’s decision, the applicant shall be paid the difference between the commuted value determined with reference to enhanced pension and the commuted value already authorized. For the payment of difference, the applicant shall not be required to apply afresh Commutation of Pension
नियम ६ नुसार जर कर्मचारी यांना अंशराशीकरण मुल्य मिळाले असेल वर त्याचा त्यानंतर मुत्यू झाला असल्यास अंशराशीकरण त्यांचे कुटूंबीयांना मिळते.
तसेच महालेखाकार यांचे कडे सेवापुस्तक पाठविण्याची माझ्यामते आवशकता नाही सर्व दस्ताऐवज त्यांचे कडे उपलब्ध असतो त्यामुळे त्यांना पीपीओ क्रमांकानुसार कळवावे लागेल परंतु पुढे काही विलंब होऊ नये म्हणुन आपण कर्मचाऱ्यांचा / वारसांचा अर्ज तसेच यापुर्वी नमुना ६ पाठविला असेल त्याची छायांकित प्रत तसेच आधीचे अंशराशीकरणाचे आदेश एवठेच जोडले तरी चालेल. Commutation of Pension
महागाई भत्त्याचे विवरणपत्र तयार करण्याकरीता Excel Sheet तयार केली असुन त्यानुसार माहीती तयार करावी व या वेळी जुलै ची वेतनवाढ व जानेवारी वेतनवाढीनुसार तयार केले आहे. सर्व माहीती शिट नुसार एकत्रीत करून Abstract करून घ्यावा. व तेथे प्रमाणपत्र द्यावे.
कनिष्ठ लिपीक या पदाची सरळसेवा भरती करीता शासनाच्या दोन अधिसूचना होत्या त्या पैकी एक ही बृहन्मुंबईतील शासकिय कार्यालयातील कनिष्ठ लिपीक व दुसरे बृहन्मुंबईबाहेरील शासकिय कार्यालयातील कनिष्ठ लिपीक असे दोन सेवा प्रवेश नियम होते ते अधिसूचना दिनां 01/11/2022 नुसार अधिक्रमण करण्यात आले आहे.
अधिसूचना दिनांक 6.6.2017 बृहन्मुंबईबाहेरील हा शब्द वगळण्यात आला आहे तसेच बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक गट-क (सेवाप्रवेश) नियम २०१८ हा अधिक्रमीत केला त्यामुळे आता बृहन्मुंबईतील किंवा बृहन्मुंबईबाहेरील असा फरक राहीला नसुन फक्त आता हे सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवड झालेल्या व्यक्तिमधून सेवेत दाखल होईल जसे आतापर्यंत वर्ग ब व वर्ग अ यांची निवड होत होती त्या नुसार या पुढे कनिष्ठ लिपीक यांची निवड होईल.
लिपिक टंकलेखक गट क सेवाप्रवेश नियम. 2017 या मधील नियम ३ (क) नुसार गट ड मधील पदा धारण करणाऱ्या व गट ड मधील पदावर किमान तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी नियमित सेवा पुर्ण केलेल्या व खंड (ख) त्या उपखंड दोन नुसार पदवी धारण केली आहे असा होता तो या अधिसूचने नुसार ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली असुन ज्यांनी मराठी ३० किंवा इंग्रजी ४० उत्तीर्ण केली अशा पात्र गट ड मधील कर्मचाऱ्यास 1/11/2022 चे अधिसूचनेपासुन ५ वर्षाकरीता म्हणजेच दिनांक 1/11/2027 पुर्वी 10 वी उत्तीर्ण गट ड मधील कर्मचाऱ्यांची पदोन्नती होईल.
बृहन्मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक, गट-क (सेवाप्रवेश)(सुधारणा) नियम, 2022
जे कर्मचारी सेवानिवृत्त-मय्यत किंवा राजीनामा देवुन शासन सेवेत नाहीत त्यांचे वेतन कसे काढावे? या बाबतचा हा व्हिडीओ असुन या मध्ये MTR 19 मधील देयक तयार करणे व BEAMS मधुन BDS कसे काढावे या बाबत माहीती दिली आहे.
Income Tax Financial Year 2022-23 & Assessment Year 2023-24
आयकर सन 2022-23 चे विवरणपत्र तयार कसे करावे? आपणास आयकर भरावा लागतो का? लागत असल्यास त्याची कपात कशी करावी? आयकर सन २०२२-२३ ची गणना कशी करावी? आयकर कोणास लागतो? आयकर दर महीन्याला कपात करावा, जेणे करून कपातीची एकदम जाणीव होणार नाही.
गट ड मधील कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी देयक सेवार्थ मधुन कसे तयार करावे या बाबत संपुर्ण माहीती.
वर्ग 4 चे भविष्य निर्वाह निधी मधून अग्रीम यामध्ये परतावा ना-परतावा कसे काढावे याकरिता या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली असून प्रथम DDO लॉगिन करून त्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे परतावा किंवा ना परतावा काढायचे आहे त्यांचे सेवार्थ वर्क लिस्ट मध्ये जाऊन जीपीएफ डी मध्ये जाऊन त्या ठिकाणी Assign Deassing रोल फोर जी पी एफ अँड लोन अँड ऍडव्हान्स मध्ये जाऊन त्या ठिकाणी कोणाकोणाते कर्मचारी अधिकाऱ्यांना ddo व्हेरिफायर केले आहे ती यादी दिसेल ती यादी मधील कर्मचारी अधिकारी बदलून गेले असेल तर ते सर्व नाव काढून नव्याने दुसरे नाव तेथे टाकावे ज्यांचे नाव काढायचे असेल त्यांना सिलेक्ट करून त्यांची सेवार्थ आयडी टाकून त्यांना drsssing करावे व ज्यांना ऍड करायचे आहे त्यांना assign करावे. त्यानंतर जर त्या कर्मचाऱ्याची यापूर्वी ऑनलाईन अग्रीम काढला असेल तर डाटा एन्ट्री ऑफिसर या लॉगिन मधून माहिती भरावी.
जर त्यांचे प्रथमच ऑनलाइन काम करत असाल तर ddo लॉगिन मध्ये जाऊन वर्क लिस्ट इनिशियल डाटा एन्ट्री न्यू रिक्वेस्ट मध्ये माहिती भरून सेव करून फॉरवर्ड करावी. डाटा एन्ट्री ऑफिसर हे लॉगिन ओपन करून त्यामध्ये वर्क लिस्ट ग्रुप डी मध्ये जाऊन न्यू रिक्वेस्ट मध्ये सेवार्थ आयडी टाकून त्या ठिकाणी जो advance प्रकार असेल तो निवडून सबमिट करावे
सबमिट केल्यानंतर त्यांचे ओपनिंग बॅलन्स रेगुलर subcribtion आणि नेट बॅलन्स दाखविते त्यानंतर एम्प्लॉईज टाईप निवडून त्यांना आपणास 90 टक्के 75 टक्के जे द्यायचं असेल ते निवडावे त्यानंतर आजची तारीख टाकून रक्वम दिनांक टाकून अग्रीम नियमाची निवड करावी व त्यानंतर कीती Instalment टाकून करंट व्हॅल्यू टाकावी व डाटा फॉरवर्ड करावा तो डाटा व्हेरिफायर यांच्याकडे जाईल तेथे वर्क लिस्ट जीपीएफ डी व्हेरिफिकेशन ऑफ रिक्वेस्ट मध्ये कर्मचाऱ्यांचे नाव दिसेल त्याला क्लिक करून माहिती तपासून फॉरवर्ड करावी सदरची माहिती ही व्हेरिफायर यांचेकडून ddo ला जाईल.
ddo login वर्क लिस्ट gpf d मध्ये aproved ऑफ रिक्वेस्ट मध्ये जाऊन कर्मचाऱ्याचे नाव दिसेल त्याला क्लिक करून ओके करावे ओके केल्यानंतर माहिती दिसेल ती सर्व चेक करून अप्रू रिजेक्ट करावे त्यानंतर ऑर्डर डिटेल्स मध्ये आजची तारीख टाकून अपलोड करावे त्यानंतर आपल्याला सक्सेसफुलीचा मेसेज येईल त्यानंतर dro login ला जाऊन worklist ऑर्डर जनरेट मध्ये जाऊन ऑर्डर जनरेट होईल त्यानंतर वर्क लिस्ट gpf d view approved delete bill मध्ये जाऊन रेडिओ बटन ला क्लिक करून Vr.No व डेट टाकायचे आहे त्या ठिकाणी बिल नंबर व आजची तारीख टाकावी त्यानंतर सर्व नमुने काढावे व्हिडिओ लॉगिन मधून रिपोर्ट्समधून सर्व नमुने ची प्रिंट आऊट घ्यावी व सर्व झाल्यानंतर भीमस मधून बीडीएस काढावे
या वेबसाईट वरून जातीचे प्रमाणपत्र कसे ऑन लाईन काढावे?
जे विद्यार्थी / उमेदवार हे महाराष्ट्र राज्य सोडुन दुसरी कडे जातीचा फायदा घेवून परीक्षा देऊ ईच्छीतो त्यांना महाराष्ट्राबाहेर खुल्या मधुनच अर्ज करावा लागेल जे भटक्या जमाती-जाती, विमुक्त जाती मधील आहेत त्यांना UPSC/ IBPS/SSC/IIT/AIIMS किंवा इतर ठिकाणी अर्ज करावयाचा असल्यास खुल्या मधुनच करावा लागतो, परंतु त्यांनी जर केंद्रशासनाचे इतर मागस वर्गीय चे प्रमाणपत्र काढले तर मग त्यांना खुल्यातुन अजर् भरावा लागणार नाही त्या करीता ONLINE अर्ज कसा सादर करावा या बाबतची माहीती या व्हिडीओच्या माध्यमातुन देण्याचा प्रयत्न करीत आहे.
आपले सरकार पोर्टल
जातीचे प्रमाणपत्राचे नाव Caste Certificate for GOI posts
Form of Caste Certificate for Other Backward Classes person applying for Appointment to post under the Government of India(GOI) or for the purpose of education under the Government of India.
(Service Migrant Caste Certificate)
लागणारे प्रमाणपत्र
Income Certificate for the last 3 years issued by the Tahsildar (Father)
Caste Certificate of the Father (Father)
School Leaving Certificate (Son -Daughter or Beneficiary)
Photo ID of Beneficiary (Son -Daughter or Beneficiary)
Salary Certificate or Form 16 (Father)
Caste Certificate of the Relative (Father)
Copy of School Leaving Certificate of beneficiary (Son -Daughter or Beneficiary)
Copy of School Leaving Certificate of Grandfather
Caste Validity (Son -Daughter or Beneficiary)
सदरचे जात प्रमाणपत्र हे दरवर्षीच काढावे लागते किंवा आपणास ज्या वर्षात काम असेल त्या वर्षी काढावे परंतु upsc करीत असल्यास दरवर्षी काढणेच योग्य राहील.
फार्म भरतांना दोन पर्याय आहेत एक मराठी मध्ये व दुसरा ईंग्रजी मध्ये आपणास जो योग्य वाटत असेल तो निवडावा.
आता प्रतिज्ञलेख तयार करण्याची आवश्यक्ता नसुन स्वयंघोषणापत्र व स्वयं साक्षांकन करीता एक फोटो लावून त्यावर स्वाक्षरी करून अपलोड करावे.
शासकीय सोयी /सुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारणे. File opening link
7 वे वेतन आयोगानुसार पदोन्नती-10,20,30 ची वेतन निश्चिती कशी करावी
7 वे वेतन आयोगानुसार झालेली पदोन्नती-आश्वासित प्रगती योजना 10,20,30 वर्षाची लागू झाल्यानंतर पदोन्नतीचा विकल्प कसा द्यावा? व विकल्पानुसार वेतन निश्चिती कशी करावी.
तसेच आधी वेतन पडताळणी मंजुर झाली असेल तर काय करावे?
या बाबतची माहीती सदर व्हिडीओ मध्ये देण्यात येत आहे. तसेच ज्यांचे वेतन 1.1.2016 पुर्वी बदल होत असेल त्यांनीच वेतन पडताळणी पथकास मेल करावा अन्यथा नाही.
तसेच revised मध्ये ज्यांचे बेसीक 1.1.2016 ते 1.7.2016 या कालावधीत वाढले असेल कमी झाले असेल 10,20,30 चा लाभ मिळाला असेल त्यानीच revised tab मध्ये काम करावे.
तसेच 2.7.2016 पासुन वेतन निश्चिती मध्ये सुधारणा झाली असल्यास वेतन पडताडणी कडे पाठवू नये महालेखाकार यांचे कडे पाठवावे.
सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे निवृत्ती वेतन- कुटूंब निवृत्ती वेतन या वरून महागाई भत्ता याची थकबाकी विवरणपत्र आज पर्यंत कोठेही पाहण्यात आले नाही, व तसे सॉफ्टवेअर सुध्दा पाहण्यात आले नाही परंतु आता या पुढे या व्हिडीओ मुळे त्यांचा करण्याची प्रेरणा व करण्याची पद्धत समजेल व त्यावरून ते करतील.
सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे निवृत्ती वेतन- कुटूंब निवृत्ती वेतन या वरून महागाई भत्ता याची थकबाकी कशी काढावी.
या व्हिडीओ मध्ये Excel sheet मध्ये Micro,व formula व vlookup कसा लावावा या बाबत माहीती देण्यात आली आहे त्यामुळे Excel वर काम करणाऱ्यांनी व ज्यांना Excel बाबत माहीती पाहीजे असेल त्यांनी याचा लाभ घ्यावा.
Excel sheet डाउुनलोड करण्याकरीता खाली क्लिक करावे.
जे कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले आहे त्यांचे महागाई भत्ता विवरणपत्र आतापर्यंत तरी माझ्या पाहण्यात आले नाही त्यामुळे आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा सात महिन्याचे महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम किती मिळते याकरिता तयार केली आहे यामध्ये आपणास आज रोजी मिळत असलेले निवृत्तीवेतन ची पूर्ण रक्कम टाकावी तसेच जर आपण पेन्शन विक्री केली असेल तर त्या ठिकाणी Yes किंवा No टाकावे. आपले महागाई भत्त्याची विवरणपत्र दिसून येईल.
महागाई भत्त्याचे विवरणपत्र तयार करण्याकरीता Excel Sheet तयार केली असुन त्यानुसार माहीती तयार करावी व या वेळी जुलै ची वेतनवाढ व जानेवारी वेतनवाढीनुसार तयार केले आहे. सर्व माहीती शिट नुसार एकत्रीत करून Abstract करून घ्यावा. व तेथे प्रमाणपत्र द्यावे.
या ठिकाणी माझे कडे असलेले सर्व माहीती जसे शासन निर्णय, पुस्तके, कायदे, नियम, नमुने, Excel Files, Word File या मध्ये असुन ती आपण विषयानुसार पहावी. सद्या त्याचे वर्गीकरण करणे बाकी आहे परंतु आपणास अडचण येवून नये म्हणुन सदरची लिंक देण्यात येत आहे.