Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे
Showing posts with label अंशराशीकरण. Show all posts
Showing posts with label अंशराशीकरण. Show all posts

April 16, 2021

Commuted सेवानिवृत्त कर्मचारी यांनी अंशराशीकरण घ्यावे किंवा कसे?

 Commuted सेवानिवृत्त कर्मचारी यांनी अंशराशीकरण घ्यावे किंवा कसे?

Commuted सेवानिवृत्त कर्मचारी यांनी अंशराशीकरण घ्यावे किंवा कसे?

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी अंशराशीकरणाचा लाभ घ्यावा किंवा घेऊ नये? याबाबत बरेच वेळा संभ्रम निर्माण होतो व त्यामुळे कोणी अंशराशीकरण 40 टक्के घेतात तर कोणी घेत नाही. एक प्रश्न असा निर्माण होतो की नेमकं करायचं तरी काय?

याकरिता आपण याबाबतची संपूर्ण माहिती व्हिडीओद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे] त्या अनुषंगाने आपण जर एक्सेल शीट मध्ये आपला डाटा भरला तर आपल्या लक्षात येईल की सदरची रक्कम ही आपल्याला एक रक्कमी मिळते, तसेच जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर ती उर्वरित रक्कम कपात होत नाही त्यामुळे सदरची रक्कम घेणे गरजेचे वाटते तसेच आपण सदरची रक्कम एका वर्षाची जेवढी पेन्शन कमी मिळेल तेवढी काढून फिक्स केली तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल असे वाटते याकरिता आपल्याला excel sheet पुरवण्यात येत आहे

Interest rate

FV formula

 


6 pay to 7 pay अंशराशीकरणाचा सुधारीत लाभ सद्या तरी मिळणार नाही का?

 6 pay to 7 pay अंशराशीकरणाचा सुधारीत लाभ सद्या तरी मिळणार नाही का?

6 pay to 7 pay

दिनांक १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकरणाचा सुधारीत लाभ सद्या तरी मिळणार नाही का?

महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक 15 फेब्रुवारी 2021 नुसार 6 pay to 7 pay  ७ व्या आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्त वेतन धारकांना निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकरणाचा सुधारित लाभ देण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला असून त्या अनुषंगाने वरील कालावधीमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सुधारित अंशराशीकरण चे प्रस्ताव महालेखाकार यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.

महालेखाकार यांनी अंशराशिकरण प्रस्तावामध्ये आक्षेप नोंदविला असुन त्या नुसार कार्यवाही महालेखाकार व महाराष्ट्र शासन योजत आहे.

दिनांक 05/02/2021 चे शासन निर्णय मधील मुद्दा क्रमांक 5 नुसार असे स्पष्ट केले आहे की, “यासंबंधीचा खर्च वर नमूद निवृत्तीवेतनधारक यांचे निवृत्ती वेतन ज्या अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष खाली खर्च टाकण्यात येते त्या शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या त्या शिर्षांअंतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा तथापि आवश्यक असल्यास संबंधित मंत्रालय प्रशासकीय विभागांनी वरील निवृत्तीवेतना संबंधीचा खर्च भागविण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात पूरक मागणी सादर करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, असे स्पष्ट आहे.

तसेच दिनांक 5/02/2021 चे शासन निर्णयाचे अनुषंगाने महालेखाकार व महाराष्ट्र शासन यांचे मध्ये अंशराशीकरणाचा लाभ निवृत्तीवेतन धारकांना मिळण्याकरीता व ते जलद गतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कसा मिळेल या करिता सेवार्थ प्रणाली मध्ये ऑनलाइन माहीती तयार करून एक प्लटफार्म तयार  करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू आहे व त्यानुसार लवकरात लवकर  अंशकराशीकरणाची  प्रकरण निकाली निघेल. 

त्यामुळे जोपर्यत ऑनलाईन सर्व माहीती पोर्टलवर उपलब्ध होणार नाही तो पर्यंत अंशराशीकरण होणार नाही जेव्हा पोर्टल कार्यान्वीत होईल तेव्हा आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येईल व तेव्हा प्रस्ताव महालेखाकार यांना सादर करावा लागेल.  सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास त्वरीत लाभ मिळण्याचे दृष्टीकोणातुन शासनाचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे काही काळ थांबाले लागेल व त्या नंतर त्वरीतच सर्वच प्रकरणे निकाली निघेल.

सेवा पुस्तक अंशराशीकरणच्या प्रस्तावासोबत सादर करायचे नाही .कृपया याकडे लक्ष द्यावे

केंद्र शासनाने काही दिवसापुर्वी बचतीचे दर कमी केले होते व ते २४ तासानंतर पुन्हा जसेच्या तसे केले परंतु ते जर पुन्हा लागु केले तर अंशराशीकरण घ्यावे किंवा नाही या बाबतची माहीती एक दोन दिवसात व्हिडीओ द्वारे सांगण्याचा प्रयत्न करेल.

महालेखाकार यांचे कडुन प्राप्त झालेले पत्र खाली जोडले आहे त्या अनुषंगानेच आपणास माहीती पुरविण्यात आली आहे.  ते पत्र खाली आहे.

 


September 9, 2020

Pension Calculator पेन्शन किती मिळेल?


जे कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले आहे किंवा होणार आहे अशा कर्मचारी अधिकारी यांना आपण सेवानिवृत्त होत असताना आपल्याला किती रक्कम मिळेल अंशराशीकरण याची रक्कम किती मिळेल निवृत्ती वेतन किती बसेल रजा रोखीकरण किती मिळेल याबाबतची माहिती एक्सेल शीट मध्ये तयार करण्यात आली असून त्या अनुषंगाने सर्व माहिती एकत्रित आपणास मिळणार आहे त्याकरिता आपण एक्सेल फाईल ला क्लिक करावे व आपले जन्मतारीख रुजू होण्याचा दिनांक व सेवानिवृत्तीचा दिनांक हा टाकावा तसेच शेवटची बेसिक टाकावे जेणेकरून आपले सर्व कॅल्क्युलेशन दिसून येईल. How Many Amount Received after retirement





ज्या कर्मचारी अधिकारी यांची सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती होऊन निवृत्तीवेतन मंजूर झालेले असेल व पुन्हा सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती होऊन महालेखाकार यांच्याकडे पुन्हा नमुना 6 मध्ये पाठविला असेल तर आपल्याला किती डिफरन्स मिळेल याबाबत एक्सेल शीट मध्ये माहिती मिळेल.









Excel File










Pmo sep